पाकिस्तानचा ४८ तासांचा होता प्लान, भारतीय सैन्याने ८ तासांत चारली धूळ : CDS अनिल चौहान
ऑपरेशन सिंदूरबाबत अजूनही सैन्य आणि राजकीय नेत्यांनकडून माहिती दिली जात आहे. चर्चा सुरू आहे. दरम्यान या ऑपरेशनवरून केंद्र सरकारवर आरोप प्रत्यारोप होत असताना संरक्षण दलप्रमुख (CDS) अनिल चौहान यांनी पुन्हा एकदा यावर भाष्य केलं आहे. पाकिसान ने ४८ तासांचा प्लान बनवलाहोता पण भारतीय सैन्याने फक्त ८ तासांत धूळ चारली आणि पाकिस्तानसमोर चर्चेचा प्रस्ताव ठेवला. तसंच युद्ध म्हणजे फक्त हल्ला नाही तर राजकारणाचाही एक भाग असतो, असंही त्यांनी म्हटलं आहे. पुणे विद्यापीठात “भविष्यातील युद्ध आणि युद्ध” या विषयावर ते बोलत होते.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान युद्ध आणि राजकारण एकाच वेळी सुरू होतं. त्याचवेळी आमच्याकडे एक चांगली काउंटर ड्रोन प्रणाली असल्याचा फायदा मिळाला. सीडीएस म्हणाले की १० मे रोजी पहाटे १ वाजता पाकिस्तानने गुडघे टेकले. आम्ही ४८ तासांची लढाई ८ तासांत पूर्ण केली, त्यानंतर त्यांनी फोन केला आणि या प्रश्नावर बोलायचं असल्याचं सांगितलं.
सीडीएस अनिल चौहान म्हणाले, “आपलं लष्करावर नुकसान आणि अपयशाचा कोणताही परिणाम होत नाही. आपण आपल्या चुका समजून घेतल्या पाहिजेत आणि त्या दुरुस्त केल्या पाहिजेत आणि मागे हटता कामा नये. युद्धात, नुकसानापेक्षा निकाल जास्त महत्त्वाचा असतो. ऑपरेशन सिंदूर हे युद्ध रणनीतीचे एक उदाहरण होते ज्यामध्ये काइनेटिक आणि नॉन-काइनेटिक युद्ध कौशल्य वापरण्यात आलं आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
रांचीमध्ये थरार! ४ हजार फुटांवर प्रवाशांचा जीव धोक्यात; ४० मिनिटे हवेत अडकली Flight, नेमके काय घडले?
या युद्धादरम्यान सेन्सर तंत्रज्ञान खूप महत्त्वाचं होतं. आपल्याकडे नैसर्गिक आणि मानवनिर्मित दोन्ही प्रकारचे सेन्सर आहेत, केवळ रेंजच नाही तर अनेक प्रकारचे मानवनिर्मित सेन्सर आहेत आणि त्यांची तैनाती वेगवेगळ्या गरजांवर देखील केली जाते. तसंच या युद्धात ब्रह्मोससारख्या हायपरसोनिक क्षेपणास्त्रांनी आणि स्टेल्थ तंत्रज्ञानाने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. ड्रोन देखील आहेत, हे सर्व तंत्रज्ञान शत्रूसाठी असे धोके निर्माण करत आहे, ज्याचा शोधही घेता येत नाही. यामध्ये मानवनिर्मित प्रणाली, स्वायत्त प्रणालींचा समावेश आहे. मानवयुक्त टँक आणि मानवरहित टँक महत्त्वाचे सिद्ध झाले आहेत. भविष्यातील युद्धांमध्ये याची गरज भासू शकते ज्यामध्ये मानवी धोका कमी होईल.
“पाकिस्तानने दहशतवादाला आळा घालावा. भारत कोणत्याही प्रकारचा धोका अजिबात सहन करत नाही आणि भारताची ड्रोन क्षमता पाकिस्तानपेक्षा खूपच चांगली आहे. आजचे युद्ध पारंपारिक शक्तीच्या वापरापर्यंत मर्यादित नाही, तर ते विविध राजकीय, माहिती, लष्करी आणि आर्थिक साधनांद्वारे राजकीय उद्दिष्टे साध्य करण्याची प्रक्रिया देखील आहे. मानवी स्वभावाचा एक भाग म्हणून, मला वाटते की कोणत्याही प्रकारच्या युद्धात दोन महत्त्वाचे घटक असतात. ते म्हणजे हिंसाचार आणि हिंसाचार तसेच हिंसाचारामागील राजकारण. म्हणून राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हिंसाचार होतोच, असंही त्यांनी स्पष्ट केलं.