श्रीनगर: मंगळवारी २२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे टीआरएफच्या दहशतवाद्यानी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यामध्ये २८ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या हल्य्यानंतर भारत चांगलाच आक्रमक झाला आहे. भारताने अनेक धोरणात्मक निर्णय घेत पाकिस्तानची कोंडी केली आहे. तसेच भारताने नौदल, लष्कर, वायुसेनेने ‘आक्रमण’ युद्धाभ्यास देखील सुरु केला आहे. दरम्यान या हल्ल्यानंतर अमरनाथ यात्रा होणार कि नाही असा प्रश्न उपस्थित होत होता. यावर आता केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले, भारत दहशतवाद्यांना घाबरणार नाही. दहशतवाद्यांना योग्य प्रत्युत्तर दिले जाईल. तसेच अमरनाथ यात्रा स्थगिती केली जाणार नाही. अमरनाथ यात्रा रद्द केली जाणार नाही. अमरनाथ यात्रा ३ जुलैपासून सुरु होणार आहे. यासाठी अनेक भाविकांनी रजिस्ट्रेशन केले आहे. काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर पियुष गोयल यांनी अमरनाथ यात्रेबाबत भाविकांना आश्वासन दिले आहे. काश्मीरमध्ये पुन्हा लवकरच पर्यटन सुरु होईल. काश्मीरचा विकास कोणीही थांबवू शकणार नाही.
अमरनाथ यात्रा ३ जुलैपासून सुरु होणार आहे. हि यात्रा अनंतनाग मधून सुरु होणार आहे. पहलगाम ट्रेक आणि गंदेरबल जिल्ह्यातील बालटाल मार्गापासून सुरु होणार आहे. भाविकांच्या भोवती सुरक्षेचें मोठे कडे असणार आहे. यात्रा ९ ऑगस्ट रोजी संपणार आहे. अमरनाथ यात्रेसाठी भारतीय लष्कराने अत्यंत चोख सुरक्षा व्यव्था ठेवली जाणार आहे. पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षेत अधिक वाढ करण्यात आली आहे.
भारताच्या ‘आक्रमणा’ने घाबरला पाकिस्तान
पाकिस्तानचे लष्कररमुख जनरल असीम मुनीर यांनी खासगी एअरक्राफ्टच्या मदतीने आपल्या परिवाराला विदेशात पाठवले आहे. याशिवाय अनेक उच्च अधिकाऱ्यांनी आपल्या परिवाराला युरोपियन देशात पाठवले असल्याचे समजते आहे. त्यामुळे पाकिस्तानला भारत हल्ला करेल अशी भीती वाटत आहे. त्यामुळेच सैन्य अधिकाऱ्यांनी आपल्याला परिवाराला विदेशात पाठवले असल्याचे म्हटले जात आहे.
पाकिस्तानला भारताकडून हल्ल्याची भीती
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आक्रमक झाला आहे. भारत पाकिस्तानवर हल्ला करेल अशी भीती त्यांना सतावत आहे. भारताने लष्कर, वायुसेना आणि नौदलाचा युद्धाभ्यास सुरू केला आहे. त्यामुळे पाकिस्तानचे धाबे दणाणले आहे. भारताने राफेल आणि सुखोई या लढाऊ विमानांचा युद्धाभ्यास सुरू केला आहे. क्षेपणास्त्र चाचणी केली आहे. त्यामुळे भारत काही दिवसांत हल्ला करण्याची भीती पाकिस्तानला वाटत आहे.
आता पाकिस्तानची खैर नाही
पाकिस्तान पुसकरुत दहशतवाद्यांवर भारताने लष्करी कारवाई सुरू केली पाहिजे असे माजी हवाई दल प्रमुख आरूप रहा म्हणाले आहेत. उरी आणि पुलवामा हल्ल्यानंतर दोन आण्विक शक्ती असलेले देश युद्ध करू शकत नाहीत ही व्याख्या भारताने मोडून काढली आहे. भारताने उरी आणि पुलवामा हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना थोकण्याचे काम अधिक प्रभावीपणे केले आहे.