पाकिस्तानला भारत हल्ला करण्याची भीती (फोटो- istockphoto)
नवी दिल्ली: टीआरएफ या दहशतवादी संघटनेने जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. पर्यटकांना ठार मारण्याआधी त्यांना त्यांच धर्म विचारण्यात आला. या भ्याड हल्ल्यात २८ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यानमुले भारत चांगलाच आक्रमक झाला आहे. भारताने अनेक धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. तसेच लष्करी युद्धाभ्यास देखील सुरू केला आहे. त्यामुळे पाकिस्तानची झोप उडाली आहे. त्यातच आता पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांनी एक महत्वाचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे.
पाकिस्तानचे लष्कररमुख जनरल असीम मुनीर यांनी खासगी एअरक्राफ्टच्या मदतीने आपल्या परिवाराला विदेशात पाठवले आहे. याशिवाय अनेक उच्च अधिकाऱ्यांनी आपल्या परिवाराला युरोपियन देशात पाठवले असल्याचे समजते आहे. त्यामुळे पाकिस्तानला भारत हल्ला करेल अशी भीती वाटत आहे. त्यामुळेच सैन्य अधिकाऱ्यांनी आपल्याला परिवाराला विदेशात पाठवले असल्याचे म्हटले जात आहे.
पाकिस्तानला भारताकडून हल्ल्याची भीती
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आक्रमक झाला आहे. भारत पाकिस्तानवर हल्ला करेल अशी भीती त्यांना सतावत आहे. भारताने लष्कर, वायुसेना आणि नौदलाचा युद्धाभ्यास सुरू केला आहे. त्यामुळे पाकिस्तानचे धाबे दणाणले आहे. भारताने राफेल आणि सुखोई या लढाऊ विमानांचा युद्धाभ्यास सुरू केला आहे. क्षेपणास्त्र चाचणी केली आहे. त्यामुळे भारत काही दिवसांत हल्ला करण्याची भीती पाकिस्तानला वाटत आहे.
आता पाकिस्तानची खैर नाही
पाकिस्तान पुसकरुत दहशतवाद्यांवर भारताने लष्करी कारवाई सुरू केली पाहिजे असे माजी हवाई दल प्रमुख आरूप रहा म्हणाले आहेत. उरी आणि पुलवामा हल्ल्यानंतर दोन आण्विक शक्ती असलेले देश युद्ध करू शकत नाहीत ही व्याख्या भारताने मोडून काढली आहे. भारताने उरी आणि पुलवामा हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना थोकण्याचे काम अधिक प्रभावीपणे केले आहे.
भारतीय सुरक्षा दलांनी पुन्हा एकदा अशा प्रकारचे हल्ले करण्याची अधिक गरज आहे. जेणेकरून शत्रू राष्ट्राला कळेल की ते कोणाच्या वाकड्यात जाण्याचा प्रयत्न करत आहेत. पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून उरी आणि बालाकोटसारखे हल्ले करण्याची गरज आहे, असे माजी वायुसेना प्रमुख आरूप रहा म्हणाले.
दरम्यान भारताने काही धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. भारताने वाघा-अटारी बॉर्डर बंद केली आहे. भारताने सिंधु जल करार स्थगित केला आहे. पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर पाकिस्तानने देखील भारतसोबत व्यापार बंद केला आहे. भारतासाठी पाकिस्तानची हवाई सीमा बंद राहणार आहे. भारतीय नागरिकांना पाकिस्तान सोडण्यास सांगण्यात आले आहे.
‘नापाक’ संरक्षणमंत्री पुन्हा बरळले
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पाकिस्तान खवळला आहे. मात्र पाकिस्तानच दशतवाद्यांना खतपाणी घालत असल्याचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी मान्य केले आहे. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्यांनी हे विधान केले.