देशात 15-17 वर्षांच्या मुलांचे लसीकरण सुरू झाल्यानंतर आता 12-14 वर्षांच्या मुलांनाही कोरोनाची लस दिली जाणार आहे. कोविड-19 वरील लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाचे (NTAGI) प्रमुख डॉ. एनके अरोरा यांच्या मते, या मुलांना मार्चपासून लस दिली जाईल. सध्या
देशात कोरोनाची तिसरी लाट आहे. गेल्या 24 तासांत 2 लाख 58 हजार 89 नवे कोरोना बाधित आढळले आहेत.
आत्तापर्यंत 15-17 वयोगटातील 45% मुलांच लसीकरण झालं आहे. देशात आतापर्यंत १५-१७ वर्षे वयोगटातील ३.३१ कोटी मुलांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. याचा अर्थ, 45% मुलांना फक्त 13 दिवसात पहिल्या डोस देण्यात आला आहे. 3 जानेवारी 2022 पासून 15-17 वयोगटातील मुलांसाठी लसीकरण मोहीम सुरू झाली. त्यांना कोव्हॅक्सिन देण्यात येत आहे.
जानेवारीच्या अखेरीस 15-17 वर्षे वयोगटातील 7.4 कोटी मुलांना कोरोना लसीचा पहिला डोस मिळेल. यानंतर, फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून या मुलांना दुसरा डोस देणे सुरू केला जाईल. महिन्याच्या अखेरीस या सर्वांना लसीचा दुसरा डोस मिळेल. यानंतर, 12-14 वर्षे वयोगटातील मुलांना फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्चच्या सुरुवातीपासून लस देणे सुरू करता येईल.
अरोरा यांच्या मते, १२-१७ वयोगटातील मुले प्रौढांसारखीच असतात. त्यामुळे लसीकरण करताना या बालकांना प्राधान्य देण्यात येते. त्यांच्या मते, किशोरवयीन मुले खूप गतिमान असतात. ते शाळा आणि महाविद्यालयांमध्ये एकमेकांशी संवाद साधतात, ज्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत, त्यांना शक्य तितक्या लवकर लसीकरण करणे फार महत्वाचे आहे.
इंडियन अॅकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सचे माजी अध्यक्ष डॉ. प्रमोद जोग म्हणतात की, सरकारने 5 ते 14 वयोगटातील कोणत्याही आजाराने ग्रस्त असलेल्या मुलांनाही लसीच्या कक्षेत आणले पाहिजे.
भारत बायोटेकने विकसित केलेल्या कोवॅक्सिनला भारत सरकारने 2 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. मुलांवर केलेल्या चाचण्यांमध्ये ही लस सुरक्षित असल्याचे आढळून आले.
. देशात आतापर्यंत 157 कोटीहून अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत. गेल्या 24 तासांत 39 लाखांहून अधिक नवीन लोकांना लसीकरण करण्यात आले. त्याच वेळी, देशातील 76% लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
[read_also content=”पप्पांसारखं उचलणार?नितेश राणेंना मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला; पोलीसांच्या पुढच्या कारवाईकडे लक्ष https://www.navarashtra.com/mumbai/kokan/mumbai/mumbai-high-court-rejects-nitesh-ranes-bail-plea-attention-to-further-police-action-nrkk-223642.html”]