Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजधानी दिल्लीत येणाऱ्या तब्बल 250 ट्रेन्स रद्द, इंटरनेटसह 45 मेट्रो स्टेशन्सही बंद; CJP च्या आंदोलनाला बसणार फटका?

शुक्रवार रात्री उशिरापासून रेल्वे आणि रस्त्याने दिल्लीत प्रवेश पूर्णपणे नियंत्रित करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश आणि हरियाणाला लागून असलेल्या दिल्लीच्या सर्व रस्त्यांच्या सीमांवर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 10, 2026 | 07:17 AM
राजधानी दिल्लीत येणाऱ्या तब्बल 250 ट्रेन्स रद्द, इंटरनेटसह 45 मेट्रो स्टेशन्सही बंद

राजधानी दिल्लीत येणाऱ्या तब्बल 250 ट्रेन्स रद्द, इंटरनेटसह 45 मेट्रो स्टेशन्सही बंद

Follow Us
Follow Us:
  • मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी CJP आक्रमक
  • पोलिसांची परवानगी नसताना केले जाणार आंदोलन
  • आंदोलन सुरु होण्यापूर्वीच बंद पाडण्याचा डाव
नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शनिवारी जंतर मंतर येथे कॉक्रोच जनता पार्टी अर्थात सीजेपीकडून आंदोलन केले जाणार आहे. सीजेपीच्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीला घेराव घालण्यात आला आहे. आंदोलकांना रोखण्यासाठी दिल्लीत येणाऱ्या 250 ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. 45 मेट्रो स्टेशन्स बंद करण्यात आली आहेत. याचा फटका सीजेपीच्या आंदोलनाला होण्याची शक्यता आहे.

शुक्रवार रात्री उशिरापासून रेल्वे आणि रस्त्याने दिल्लीत प्रवेश पूर्णपणे नियंत्रित करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश आणि हरियाणाला लागून असलेल्या दिल्लीच्या सर्व रस्त्यांच्या सीमांवर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. गुरुग्राम, फरिदाबाद, पानिपत, गाझियाबाद आणि नोएडा येथून दिल्लीत येणाऱ्या सर्व प्रवेशद्वारांवर पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. शनिवारी रात्री १० वाजेपर्यंत जंतर मंतरच्या चार किलोमीटरच्या परिसरात इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

रेल्वेने जाहीर केले आहे की, शुक्रवारी दुपारी २ नंतर आपल्या मूळ स्थानकांवरून सुटणाऱ्या आणि १० ऑक्टोबर रोजी पहाटे ४ ते दुपारी २ च्या दरम्यान नवी दिल्ली किंवा हजरत निजामुद्दीन स्थानकावर पोहोचणाऱ्या २५० एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात येतील. याव्यतिरिक्त, दिल्लीजवळील शहरांमधून सुटणाऱ्या दैनंदिन पॅसेंजर गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.

दिल्ली पोलिसांच्या पत्रानंतर 45 स्थानके बंद

दिल्ली पोलिसांच्या पत्रानंतर, डीएमआरसीने जनपथ, बाराखंबा रोड, पटेल चौक आणि राजीव चौक यांसह ४५ मेट्रो स्थानके बंद केली आहेत. सुरुवातीला ५७ स्थानके बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते, परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही संख्या कमी करण्यात आली.

आंदोलनास पोलिसांची परवानगी नाही

दिल्ली पोलिसांनी सीजेपीला आंदोलन करण्यास परवानगी दिलेली नाही. सह पोलीस आयुक्त नुपूर प्रसाद म्हणाल्या, “आम्हाला सौरभ दास यांच्याकडून अर्ज मिळाला. तो अगदी अलीकडेच सादर करण्यात आला, तर अर्ज १० दिवस आधी सादर करणे आवश्यक असते. हा विलंब आणि मागील आंदोलनादरम्यान नियमांचे पालन न केल्यामुळे परवानगी नाकारण्यात आली.”

221 कंपन्या तैनात; कनॉट प्लेस बंद

आंदोलने हाताळण्यासाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या २२१ कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. यामध्ये विविध ठिकाणी २३००० ते २६००० जवान तैनात असतील. २०००० दिल्ली पोलीस कर्मचारीही तैनात असणार आहेत.

CJP Protest : दिल्ली राडा होणार ! आंदोलकांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांची 35 हजारांची फौज तैनात; CCTV, ड्रोन आणि FRS चा करणार वापर

Web Title: Cjp protest as many as 250 trains bound for delhi have been cancelled and 45 metro stations shut down nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 07:09 AM

Topics:  

  • CJP Protest
  • Cockroach Janta Party
  • Gyanesh Kumar

संबंधित बातम्या

CJP Protest : दिल्ली राडा होणार! आंदोलकांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांची 35 हजारांची फौज तैनात; CCTV, ड्रोन आणि FRS चा करणार वापर
1

CJP Protest : दिल्ली राडा होणार! आंदोलकांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांची 35 हजारांची फौज तैनात; CCTV, ड्रोन आणि FRS चा करणार वापर

CJP Protest : दिल्ली पोलिसांचा CJP ला झटका! आंदोलनाची परवानगी नाकारली, केंद्राने सर्व राज्यांना दिले महत्वाचे निर्देश
2

CJP Protest : दिल्ली पोलिसांचा CJP ला झटका! आंदोलनाची परवानगी नाकारली, केंद्राने सर्व राज्यांना दिले महत्वाचे निर्देश

Washim News: ‘मत वाचवा, देश वाचवा!’ वाशिममध्ये महाविकास आघाडीचे आंदोलन, निवडणूक आयोगाविरोधात एल्गार
3

Washim News: ‘मत वाचवा, देश वाचवा!’ वाशिममध्ये महाविकास आघाडीचे आंदोलन, निवडणूक आयोगाविरोधात एल्गार

ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याचा मुद्दा आता थेट राष्ट्रपती भवनात! राहुल गांधी, ममता बॅनर्जींसह इतर खासदार घेणार राष्ट्रपतींची भेट
4

ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याचा मुद्दा आता थेट राष्ट्रपती भवनात! राहुल गांधी, ममता बॅनर्जींसह इतर खासदार घेणार राष्ट्रपतींची भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.