सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यासंबंधीची गुप्त माहिती काही दिवसांपूर्वीच मिळाली होती. यानंतर एजन्सींनी मिळून पूर्ण तयारीने अंमली पदार्थांची तस्करी थांबवली.
गुजरात मधून एक मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय तटरक्षक दलाने रविवारी गुजरात सागरी सीमेवर एका कारवाई दरम्यान १४ पाकिस्तानींना अटक केली. यातील सात जणांजवळ 90 किलो ड्रग्जसह आढळले आहे. अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB), गुजरात एटीएस (Gujarat ATS )आणि तटरक्षक दलाने (Coast Guard) संयुक्तपणे गुजरातच्या किनारपट्टी भागात ऑपरेशन केल्याची माहिती समोर आली आहे.
सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यासंबंधीची गुप्त माहिती काही दिवसांपूर्वीच मिळाली होती. यानंतर एजन्सींनी मिळून पूर्ण तयारीने अंमली पदार्थांची तस्करी थांबवली.
एनसीबीने या कारवाईसोबत आणखी एका कारवाईमध्ये यश मिळवलं आहे. एनसीबीच्या पथकाने गुजरात आणि राजस्थानमध्ये 4 ठिकाणी छापे टाकले आहेत. अमली पदार्थांच्या तस्करीविरुद्धच्या मोहिमेचा एक भाग म्हणून जालोरच्या भीनमाळ आणि जोधपूरच्या ओसियान आणि गुजरातच्या गांधीनगर आणि अमरेली येथे पहाटे ४ वाजल्यापासून छापे टाकण्यात आले. या अंतर्गत 13 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या चौकशीच्या आधारे आता टोळीच्या मुख्य म्होरक्याचा शोध घेतला जात आहे. तसेच औषधांची निर्मिती करणाऱ्या 4 हायटेक लॅबचाही पर्दाफाश झाला आहे. येथून एकूण 149 किलो एमडी, 50 किलो इफेड्रिन आणि 200 लिटर ॲसिटोन जप्त करण्यात आले आहे. या औषधांची किंमत सुमारे 230 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
Web Title: Coast guard ncb and gujarat ats joint operation pakistani and drugs caught near sea border nrps