Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cockroach Janta Party News: ‘व्यवस्थेविरोधात राग ते आमदार खासदारांना’; अभिजीत दिपकेंची Exclusive मुलाखत

अभिजीत दीपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट करत प्रश्न उपस्थित केला होता. “जर सिस्टीमविरोधात आवाज उठवणाऱ्या तरुणांना ‘कॉकरोच’ समजले जात असेल, तर हे सगळे ‘कॉकरोच’ एकत्र आले तर काय होईल?” या पोस्टनंतर ‘कॉकरोच जनता पार्टी’ची संकल्पना सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाली

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 21, 2026 | 12:58 PM
Cockroach Janta Party, CJP, Abhijeet Deepke, Social Media Viral,

Cockroach Janta Party, CJP, Abhijeet Deepke, Social Media Viral,

Follow Us
Close
Follow Us:

Cockroach Janta Party News: सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ने (CJP) अवघ्या 5-6 दिवसांत डिजिटल विश्वात मोठा प्रभाव निर्माण केला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील अभिजीत दीपके या तरुणाने सुरू केलेल्या या मोहिमेने व्यवस्थेविरोधातील जनभावना व्यक्त करण्यासाठी नवा मंच उभा केल्याचा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे, इन्स्टाग्रामवर अवघ्या सहा दिवसांत १० दशलक्ष (१० मिलियन) फॉलोअर्सचा टप्पा पार केल्याने या पेजची देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

‘कॉकरोच जनता पार्टी’ हा पारंपरिक राजकीय पक्ष नसून व्यवस्थेविरोधातील उपरोधिक आणि आक्रमक डिजिटल आंदोलन म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार, परीक्षा पेपरफुटी, निवडणूक प्रक्रिया, माध्यमांचे स्वातंत्र्य आणि पक्षांतराच्या राजकारणावर टीका करणारे व्हिडिओ, पोस्ट आणि जाहीरनाम्यामुळे युवकांमध्ये या मोहिमेची लोकप्रियता झपाट्याने वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे, या डिजिटल मोहिमेने सोशल मीडियावरील फॉलोअर्सच्या बाबतीत अनेक प्रस्थापित पक्षांनाही मागे टाकल्याची चर्चा आहे. काही सोशल मीडिया विश्लेषकांच्या मते, युवकांमधील असंतोष आणि व्यवस्थेविरोधातील भावना या मोहिमेला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळवून देत आहेत.

Cockroach Janata Party: सोशल मीडियावर ‘कॉकरोच जनता पार्टी’चं वादळ; मस्करीतून सुरू झालेली CJP लाखो तरुणांचा आवाज कशी बनली?

काही तासांत देशभरातील तरुणांचा वाढता प्रतिसाद

एका प्रकरणावरील सुनावणीदरम्यान, सरन्यायाधीश सुर्यकांत यांनी, काही बेरोजगार तरुण आणि बनावट पदव्यांचा वापर करून व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींविषयी बोलताना ‘कॉकरोच’ (झुरळ) आणि ‘परजीवी’ असा उल्लेख केला होता. त्यांच्या या विधानावरून सोशल मीडियावर जोरादर चर्चा सुरू झाली.

NEET पेपर लीक प्रकरण, बेरोजगारी आणि वाढती महागाई यांसारख्या मुद्द्यांमुळे देशातील तरुणांमध्ये आधीच संताप आहे. त्यातच सरन्यायाधिशांच्या या विधानानंतर सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टीची मोहीम सुरू झाली. खास बाब म्हणजे आधीच नाराज असलेल्या तरुणांनी सोशल मीडियावर या मोहिमेला जोरदार प्रतिसाद दिला आहे. फेसबुक इंस्टाग्राम रील्स, मीम्स आणि इतर उपरोधिक पोस्टच्या माध्यमातून ‘कॉकरोच जनता पार्टी’ने काही तासांतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

या सगळ्या घटना क्रमाबाबत कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी एक एबीपी माझा या वृत्तवाहिनीली दिलेल्या मुलाखतीत या मोहिमेवर त्यांची भूमिका मांडली आहे.

कॉकरोच जनता पार्टीची कल्पना कशी सुचली असा सवाल विचारला असता ते म्हणाले की, “ती कल्पना नव्हती, तर तो व्यवस्थेवरचा राग होता. कॉकरोच जनता पार्टी ही कोणत्याही प्रकारे ठरवून केलेली मोहिम नव्हती. तर तो व्यवस्थेविरुद्ध मनात असलेला तीव्र राग होता. देशाच्या एका सर्वोच्च पदावरील व्यक्तीच जेव्हा व्यवस्थे विरोधात आवाज उठवणाऱ्या नागरिकांबद्दल बोलल्यानेच हा राग अनावर झाला होता.

Union Cabinet Meeting : मंत्र्यांना द्यावे लागणार आता ‘रिपोर्टकार्ड’; पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली आज महत्त्वपूर्ण बैठक

“संविधानाच्या रक्षकांकडूनच अशी अपेक्षा नव्हती”

‘कॉकरोच जनता पार्टी’च्या स्थापनेमागील भूमिका स्पष्ट करताना अभिजीत दीपके यांनी न्यायव्यवस्था आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “सरन्यायाधीश हे देशातील संविधानाचे आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे रक्षक असतात. संविधानाने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. अशा परिस्थितीत सामान्य जनता आणि तरुणांना ‘कॉकरोच’ किंवा ‘पॅरासाईट’ म्हणणे ही अत्यंत गंभीर बाब आहे.व्यवस्थेविरोधात आवाज उठवणाऱ्या तरुणांविषयी वापरल्या गेलेल्या भाषेमुळेच अनेक युवकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आणि त्यातूनच ही डिजिटल चळवळ उभी राहिली.” असही त्यांनी सांगितलं.

…आणि सोशल मीडियावर क्रांती झाली!”

अभिजीत दीपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट करत प्रश्न उपस्थित केला होता. “जर सिस्टीमविरोधात आवाज उठवणाऱ्या तरुणांना ‘कॉकरोच’ समजले जात असेल, तर हे सगळे ‘कॉकरोच’ एकत्र आले तर काय होईल?” या पोस्टनंतर ‘कॉकरोच जनता पार्टी’ची संकल्पना सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाली. काही दिवसांतच हजारो युवकांनी या मोहिमेला पाठिंबा दिला आणि ती एक मोठी डिजिटल चळवळ बनली.

पक्षांतर करणाऱ्यांवर २० वर्षांची बंदी?

सीजेपीच्या जाहीरनाम्यात राजकीय पक्षांतरावर कठोर भूमिका घेतली आहे. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्या आमदार किंवा खासदारांना २० वर्षे निवडणूक लढवण्यास आणि कोणतेही सार्वजनिक पद धारण करण्यास बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

तसेच, केंद्र आणि राज्यातील कॅबिनेट मंत्रीपदांपैकी ५० टक्के पदे महिलांसाठी राखीव ठेवण्याची मागणीही करण्यात आली आहे. माध्यम स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर भूमिका घेत अंबानी आणि अदानी समूहांच्या मालकीच्या माध्यम संस्थांचे परवाने रद्द करण्याची मागणी जाहीरनाम्यात करण्यात आली असून तथाकथित ‘गोदी मीडिया’ अँकर्सच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दे

कोणत्याही सरन्यायाधीशांना निवृत्तीनंतर राज्यसभा किंवा राजकीय पद देऊ नये

मतदानाचा हक्क हिरावून घेणे हा गंभीर गुन्हा मानावा

संसद आणि मंत्रिमंडळात महिलांना ५० टक्के प्रतिनिधित्व

माध्यम स्वातंत्र्यासाठी मोठ्या कॉर्पोरेट मीडिया समूहांवर निर्बंध

पक्षांतर करणाऱ्या आमदार-खासदारांवर २० वर्षांची बंदी

कोण आहेत अभिजीत दीपके?

अभिजीत दीपके हे मूळचे छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज परिसरातील रहिवासी आहेत. ३० वर्षीय अभिजीत यांनी पुण्यातून ब्रॉडकास्ट जर्नालिझमचे शिक्षण पूर्ण केले असून सध्या अमेरिकेतील बॉस्टन विद्यापीठ येथे जनसंपर्क विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत.

ते पॉलिटिकल कम्युनिकेशन स्ट्रॅटेजिस्ट म्हणून कार्यरत असून डिजिटल नॅरेटिव्ह, सार्वजनिक संवाद आणि सोशल मीडिया मोहिमांवर त्यांचा विशेष अभ्यास आहे. २०२० ते २०२३ या काळात त्यांनी आम आदमी पार्टीच्या सोशल मीडिया टीममध्ये स्वयंसेवक म्हणून काम केले होते. दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान मीम-आधारित प्रचार मोहिमांमध्येही त्यांचा सहभाग होता.

 

 

Web Title: Cockroach janta party viral news abhijeet deepke digital campaig exclusive intervies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 12:58 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.