Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 23 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जम्मू काश्मीरमध्ये थंडीची लाट वाढली, कडाक्याची थंडी सुरु; बहुतांश ठिकाणी तापमान तर…

काश्मीरमध्ये थंडीची लाट वाढली असून, खोऱ्यातील बहुतांश ठिकाणी तापमान शून्याखाली नोंदवण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, रविवारी रात्री दक्षिण काश्मीरमधील पुलवामा आणि शोपियाँ शहरांमध्ये किमान तापमान गोठणबिंदूपेक्षा 7.4 अंश खाली नोंदवले गेले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 23, 2024 | 03:15 PM
जम्मू काश्मीरमध्ये थंडीची लाट वाढली, कडाक्याची थंडी सुरु; बहुतांश ठिकाणी तापमान तर…
Follow Us
Follow Us:

श्रीनगर : काश्मीरमध्ये थंडीची लाट वाढली असून, खोऱ्यातील बहुतांश ठिकाणी तापमान शून्याखाली नोंदवण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, रविवारी रात्री दक्षिण काश्मीरमधील पुलवामा आणि शोपियाँ शहरांमध्ये किमान तापमान गोठणबिंदूपेक्षा 7.4 अंश खाली नोंदवले गेले. पुलवामा आणि शोपियान ही खोऱ्यातील सर्वात थंड ठिकाणे होती.

श्रीनगर शहरातील किमान तापमान उणे 5.3 अंश सेल्सिअस रविवारी रात्री होते. जे आदल्या रात्री उणे 4.8 अंश सेल्सिअस होते. दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममध्ये किमान तापमान उणे 6.9 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. दक्षिण काश्मीरमधील काझीगुंड शहरात किमान तापमान 5.2 अंश सेल्सिअस तर उत्तर काश्मीरमधील गुलमर्ग येथील स्की रिसॉर्टमध्ये उणे चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. कोकरनाग शहरात किमान तापमान उणे 2.6 अंश सेल्सिअस आणि कुपवाडा येथे उणे सहा अंश सेल्सिअस होते.

हलक्या हिमवृष्टीचा अंदाज

25 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान खोऱ्यात काही ठिकाणी हलक्या हिमवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. काश्मीरमध्ये सध्या 40 दिवसांचा कडाक्याचा थंडीचा काळ ‘चिल्लई-कलान’ सुरू आहे. या दिवसात, परिसरात थंडीची लाट असते आणि तापमान अत्यंत कमी होते. त्यामुळे जलकुंभांमध्ये तसेच पाईप्समध्ये पाणी गोठते. या कालावधीत हिमवर्षाव होण्याची शक्यता जास्त असते आणि बहुतेक भागात, विशेषतः उंच भागात जोरदार हिमवृष्टी होते.

Web Title: Cold wave increases in jammu and kashmir severe cold begins nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2024 | 03:15 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.