काँग्रेसने शशी थरूर यांना सभागृहातील मुख्य वक्त्यांच्या यादीतून वगळलं, नक्की काय आहे कारण?
संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असून आज ऑपरेशन सिंदूरवर चर्चा झाली. सरकारने आपली भूमिका मांडली तर विरोधकांनी, कडक सुरक्षा व्यवस्था असताना दहशतवादी पहलगामध्ये कसे आले? त्यांनी अद्याप का पकडण्यात आलं नाही? ट्रम्प यांनी भारत पाकिस्तान युद्धबंदी का केली आणि त्यावर सरकार गप्प का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले. मात्र या चर्चेत प्रमुख वक्त्यांच्या यादीतून कॉंग्रेसने शशी थरूर यांना वगळलं असल्याची माहिती समोर आली आहे.
.तर मोदींना डोक्यावर घेऊन नाचलो असतो; ठाकरेंचे अरविंद सावंत संसदेत कडाडले
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ऑपरेशन संदर्भातील तपशील सादर करत केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट केली.चर्चेनंतर विरोधकांच्या वतीने काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी पुढाकार घेत मोदी सरकारवर कडाडून टीका केली आणि अनेक प्रश्न उपस्थित करत केंद्र सरकारची धोरणे आणि कृतीवर सवाल उपस्थित केला.मात्र या सर्व घडामोडींमध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे शशी थरूर यांची शांतता. संसदेत या मुद्द्यावर चर्चेच्या दिवशी सर्वांची अपेक्षा होती की शशी थरूर हे काँग्रेसकडून महत्त्वाची भूमिका बजावतील, मात्र तसं घडलं नाही. थरूर यांना बोलण्याची संधीच दिली गेली नाही, कारण काँग्रेसने त्यांना वक्त्यांच्या यादीतून वगळलं होतं.
काँग्रेसच्या यादीत कोणाची नावं
ऑपरेशन सिंदूर व पहलगाम हल्ल्यावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसने पाच खासदारांची निवड केली होती होती. त्यामध्ये
गौरव गोगोई
प्रियंका गांधी वाड्रा
दीपेंद्र हुड्डा
प्रणिती एस शिंदे
सप्तगिरी उल्का
बिजेंद्र एस ओला
माध्यमांनी शशी थरूर यांना ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेसंबंधी विचारणा केली. त्यावेळी त्यांनी हसत केवळ “मौनव्रत, मौनव्रत” असे दोन शब्द उच्चारले. या सूचक उत्तरामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. मुरलीधरन यांनी 21 जुलै रोजी शशी थरूर यांच्याविषयी प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले होते की, “थरूर आता आमचे राहिलेले नाहीत. त्यांच्या विरोधात कारवाई करायची की नाही, हे आता राष्ट्रीय नेतृत्व ठरवेल.” मुरलीधरन यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसच्या गोटात थरूर यांच्याबद्दल नाराजी असल्याचं स्पष्ट होत आहे.
शशी थरूर यांची मोदी सरकारप्रती सौम्य भूमिका. त्यांनी काही वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदींची उघडपणे प्रशंसा केली होती. तसंच भारत-पाकिस्तान संघर्षाच्या काळात आणि ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर थरूर यांनी भारत सरकारच्या भूमिकेचे समर्थन केले. त्यामुळे काँग्रेसमध्ये त्यांच्याविषयी नाराजी वाढली. एवढंच नाही तर, त्यांच्या भाजपमध्ये प्रवेशाच्या चर्चा देखील सुरू झाल्या. मात्र थरूर यांनी “माझी विचारसरणी काँग्रेसच्या अधिकृत भूमिकेशी कधी कधी जुळत नाही, पण त्यामुळे मला काही फरक पडत नाही.” असं स्पष्ट मत मांडलं होतं.
पहलगाममध्ये दहशतवादी आलेच कसे? हल्ल्यानंतर पळून जाण्यास कोणी मदत केली? : गौरव गोगोईंचे संसदेत सवाल
भारत सरकारने शशी थरूर यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व सोपवले. थरूर यांनी अमेरिकेसह विविध देशांत जाऊन ऑपरेशन सिंदूर व भारताच्या भूमिका समर्थपणे मांडल्या. त्यांच्या या कामगिरीचे मोदी सरकारने उघडपणे कौतुक केलं. पण काँग्रेसमध्ये मात्र त्यांच्याविषयी नाराजी वाढत गेली.