Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Congress Head quarter: काँग्रेससाठी 1999चे राजकीय वादळ अन् सध्याच्या मुख्यालयाचा तो जुना किस्सा, एकदा वाचाच

काँग्रेस मुख्यालय स्थलांतराची चर्चा सुरू झाल्यानंतर काँग्रेस मुख्यालयाशी संबंधित एक जुनी घटना पुन्हा चर्चेत आली आहे. मे 1999 मध्ये, दिल्लीतील 24 अकबर रोड येथील काँग्रेस मुख्यालयात वादळामुळे एक मोठे झाड कोसळले

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 10, 2025 | 05:26 PM
Congress Head quarter: काँग्रेससाठी 1999चे राजकीय वादळ अन् सध्याच्या मुख्यालयाचा तो जुना किस्सा, एकदा वाचाच
Follow Us
Close
Follow Us:

Congress Head quarter Story:   लोकसभा निवडणुकीतील यश आणि गेल्यावर्षी काही राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतील यशापयशानंतर काँग्रेस पडझड अद्यापही सुरूच आहे. काँग्रेसमध्ये काही पक्षांतर्गत बदल करण्यात येत आहे. अशातच काँग्रेसचे दिल्लीतील मुख्यालय स्थलांतरित होणार असल्याची माहितीही समोर आली आहे. काँग्रेसचे सध्याचे मुख्यालय 24 अकबर रोडवर आहे. ते 9 ए कोटला रोड येथील “इंदिरा भवन” येथे स्तलांतरित करण्यात येणार आहे. भूमिगत सुविधा असलेल्या या सात मजली आधुनिक इमारतीचे बांधकाम 2016 मध्ये सुरू झाले आणि आता ते पूर्णपणे तयार आहे. काँग्रेस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील दीड महिन्यात मुख्यालय स्थलातंराची प्रक्रिया पूर्ण होईल. खरंतर मुख्यालय पूर्वीच याठिकाणी स्थलांतरित करण्यात येणार होते. पण परंतु विविध कारणांमुळे ही प्रक्रिया पुढे ढकलली जात होती.

काँग्रेस मुख्यालय स्थलांतराची चर्चा सुरू झाल्यानंतर काँग्रेस मुख्यालयाशी संबंधित एक जुनी घटना पुन्हा चर्चेत आली आहे. मे 1999 मध्ये, दिल्लीतील 24 अकबर रोड येथील काँग्रेस मुख्यालयात वादळामुळे एक मोठे झाड कोसळले. या अपघातात एका 8 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आणि कार्यालयाच्या आत असलेले एक तात्पुरते मंदिरही उद्ध्वस्त झाले होते. हे झाड आणि मंदिर काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी आणि तिकीट इच्छुकांसाठी एक खास प्रतीक बनले होते. अनेक लोक त्यांच्या राजकीय इच्छा पूर्ण करण्यासाठी यायचे. 1978 मध्ये काँग्रेस कार्यालय या ठिकाणी हस्तांतरित झाल्यापासून हे झाड येथे होते आणि माहितीनुसार, हे मंदिर एका संताने बांधले होते.

Delhi Election 2025 : ‘गृहमंत्री अमित शाहांनी दिल्लीला गुन्हेगारीची राजधानी बनवले

सोनिया गांधींनी उपस्थित केला होता प्रश्न

एका इंग्रजी दैनिकात प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, हे झाड आणि मंदिर काँग्रेस कार्यालयात एक प्रतीक होते जिथे राजकारणी त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पूजा करायचे. 1999 मध्ये झाड पडणे हा पक्षासाठी मोठा धक्का होता. कारण त्याच्याशी संबंधित भावना आणि श्रद्धा खूप खोलवर होत्या, लोकांचा असा विश्वास होता. पण अशा परिस्थितीत, झाड पडणे हे काही कार्यकर्त्यांसाठी अशूभ मानले जाऊ लागले.

जेव्हा झाड पडल्याची आणि मंदिर उद्ध्वस्त झाल्याची बातमी सोनिया गांधींना कळली तेव्हा त्यांनी वादळात इतके मजबूत दिसणारे जुने झाड कसे पडले हे जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली. यावर पक्षाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले की झाडाची मुळे आधीच कमकुवत आहेत. या घटनेमुळे पक्षात असंतोष आणि चिंता निर्माण झाली. काही पक्ष नेत्यांनी या घटनेचा संबंध पक्षाच्या भविष्याशी जोडताना, पक्षाची मुळेही आता कमकुवत झाली, असल्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या.

OTT Release: अखेर समजलेच! राम चरणचा ‘गेम चेंजर’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार

1978 मध्ये काँग्रेस कार्यालयाचा वादग्रस्त मेकओव्हर

24 अकबर रोड आणि काँग्रेस पक्षासाठी तो अत्यंत कठीण काळ होता, परंतु 2004 आणि 2009 च्या विधानसभा निवडणुकीत अप्रतिम विजय मिळवून काँग्रेसने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. या मोठ्या विजयांनी काँग्रेसचे अस्तित्व बळकट केले. काँग्रेस पक्षाचे हे प्रमुख कार्यालय 1978 मध्ये एका वादग्रस्त वेळी अस्तित्वात आले होते. जेव्हा काँग्रेसमधील पक्षाच्या नेत्यांनी इंदिरा गांधींविरुद्ध बंड केले तेव्हा काँग्रेस कार्यालयाचे स्थान देखील बदलण्यात आले. इंदिरा गांधींच्या हकालपट्टीनंतर त्यांना पक्षातील शक्तिशाली नेत्यांचा पाठिंबा मिळाला आणि इंदिरा गांधींना पुन्हा पक्षात प्रवेश देण्यात आला. या घटनेने हे स्पष्ट केले की काँग्रेसच्या राजकारणात अनेक वळणे आहेत आणि पक्षात कधीही बदल होऊ शकतात.

Web Title: Congress headquarters tree fell political consequences indira gandhi congress roots nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2025 | 05:26 PM

Topics:  

  • Indira Gandhi

संबंधित बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोडला इंदिरा गांधींचा ‘हा’ विक्रम; पुढचे लक्ष्य असणार पंडित नेहरु
1

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोडला इंदिरा गांधींचा ‘हा’ विक्रम; पुढचे लक्ष्य असणार पंडित नेहरु

50 Years of  Emergency: १९७५ पूर्वीही देशात दोनदा लागू झाली होती आणीबाणी; कधी माहिती आहे का?
2

50 Years of Emergency: १९७५ पूर्वीही देशात दोनदा लागू झाली होती आणीबाणी; कधी माहिती आहे का?

बाळासाहेब ठाकरे अन् तत्कालीन RSS सरसंघचालकांचा आणीबाणीला पाठिंबा? शिवसेनेच्या नेत्याचा अजब दावा
3

बाळासाहेब ठाकरे अन् तत्कालीन RSS सरसंघचालकांचा आणीबाणीला पाठिंबा? शिवसेनेच्या नेत्याचा अजब दावा

50 years of Emergency: आणीबाणीची ५० वर्षे; आजच्याच दिवशी झाली होती आणीबाणीची घोषणा; कसा होता स्वतंत्र भारताचा काळा इतिहास
4

50 years of Emergency: आणीबाणीची ५० वर्षे; आजच्याच दिवशी झाली होती आणीबाणीची घोषणा; कसा होता स्वतंत्र भारताचा काळा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.