Tej Pratap Yadav : बिहारचे राजकारणात दिवसेंदिवस काहीना काही नवीन गोष्टी समोर येत असतात. अशातच माजी राजद नेते आणि बिहार सरकारचे माजी मंत्री तेज प्रताप यादव यांनी सोशल मीडियावर खळबळजनक आरोप केले आहेत. त्यांच्या कुटुंबातील पाच लोक त्यांच्याविरुद्धच्या त्यांचे राजकीय आणि कौटुंबिक जीवन संपवण्याचा कट रतच आहेत. हे लोक आरएसएस आणि भाजपकडून पैसे घेऊन त्यांची प्रतिमा खराब करत आहेत. तसेच, या संपूर्ण प्रकरणासाठी आपण न्यायालयात जाणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
तेज प्रताप यादव म्हणाले की, या पाच लोकांनी त्यांचे संपूर्ण सुखी आयुष्य उद्ध्वस्त केले. या लोकांनी माझी प्रतिमा खराब केली आहे, ते जनतेत आणि तरुणांमध्ये माझी लोकप्रियता पचवू शकत नाहीत. तसेच, आज या लोकांना त्यांच्या फोटो आणि नावांसह त्यांची पोलखोल करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
Share Market Today: १०० रुपयांपेक्षा कमी किंंमतीत खरेदी करा हे शेअर्स, बाजार तज्ज्ञांनी केली शिफारस
१० वर्षांच्या राजकीय आयुष्य
तेज प्रताप यादव यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘मी माझ्या १० वर्षांच्या राजकीय आयुष्यात कधीही कोणाविरुद्ध कट रचला नाही, परंतु या पाच कुटुंबांनी मिळून त्यांना बर्बाद करण्याचा प्रयत्न केला. या लोकांनी माझ्या कारकिर्दीला कलंकित करण्याचे काम केले आहे. या सर्व लोकांची नावे आणि त्यांचे संपूर्ण कट जनतेसमोर उघड करतील, जेणेकरून सत्य जनतेसमोर आणणार आहोत.
तेज प्रताप यांचा थेट हल्ला आणि न्यायालयीन तयारी
तेज प्रताप यादव यांनी म्हटले आहे की, मी हे संपूर्ण प्रकरण न्यायालयात घेऊन जाणार आहे. आता आपण गप्प राहणार नाहीत आणि हा संपूर्ण खोटारडेपणा उघड करतील. पाच जणांनी मिळून माझे आयुष्य उद्ध्वस्त केले. आता मी त्यांचा चेहरा आणि चारित्र्य सर्वांसमोर आणेन.असा इशारा त्यांनी दिला आहे. या ट्विटमुळे बिहारच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून तेजप्रताप आता कुणाची पोलखोल करणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. .
भाजप जिल्हाध्यक्षांच्या घरात चोरट्यांचा डल्ला; तब्बल चार लाखांची रोकड पळवली
आरएसएस आणि भाजप कनेक्शनवर प्रश्न उपस्थित
ही पाच कुटुंबे आरएसएस आणि भाजपकडून पैसे घेऊन त्यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे माझ्याविरोधात “मोठे षड्यंत्र” आहे आणि आता ते संपूर्ण तपशील उघड करतील असे सांगितले. तेज प्रताप यांच्या या विधानामुळे बिहारच्या राजकारणात एक नवीन गोंधळ निर्माण झाला आहे. आता सर्वांच्या नजरा ते उघड करणार असलेली नावे कोण असतील आणि त्यामुळे आरजेडीमध्ये काय खळबळ उडाणार आहे याकडे आहेत.