Share Market Today: १०० रुपयांपेक्षा कमी किंंमतीत खरेदी करा हे शेअर्स, बाजार तज्ज्ञांनी केली शिफारस
२२ ऑगस्ट रोजी आज शुक्रवारी भारतीय शेअर बाजार घसरणीसह उघडण्याची शक्यता आहे. जॅक्सन होल इकॉनॉमिक सिम्पोजियममध्ये यूएस फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या भाषणापूर्वी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, घसरणीसह उघडतील अशी शक्यता बाजार तज्ज्ञांनी वर्तवली आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकाची सुरुवात मंद असल्याचे दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २५,०८४ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ ३८ अंकांनी कमी होता.
गुरुवारी, २१ ऑगस्ट रोजी देशांतर्गत शेअर बाजाराने सलग सहाव्या सत्रात तेजी नोंदवली, बेंचमार्क निफ्टी ५० २५,००० च्या वर राहिला. सेन्सेक्स १४२.८७ अंकांनी म्हणजेच ०.१७% ने वाढून ८२,०००.७१ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ३३.२० अंकांनी म्हणजेच ०.१३% ने वाढून २५,०८३.७५ वर बंद झाला. गुरुवारी बँक निफ्टी निर्देशांक ५६.९५ अंकांनी किंवा ०.१०% ने वाढून ५५,७५५.४५ वर बंद झाला. भारतीय शेअर बाजाराने सलग सहाव्या दिवशीही तेजीचा कल कायम ठेवला. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये निफ्टी आयटी, एफएमसीजी आणि रिअॅल्टीमध्ये वाढ पाहायला मिळाली. निफ्टी मीडिया, फार्मा आणि फायनान्शियल सर्व्हिसेस यासारख्या क्षेत्रांना दिवसभरात मोठे नुकसान झाले. (फोटो सौजन्य – Pinterest)
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या वेल्थ मॅनेजमेंटमधील डेरिव्हेटिव्ह्ज अँड टेक्निकल्स हेड चंदन टपारिया यांनी आज गुंतवणूकादारांना एक्साइड इंडस्ट्रीज , कमिन्स इंडिया आणि एल अँड टी फायनान्सचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. प्रभुदास लिल्लाधर येथील तांत्रिक संशोधनाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख आणि लक्ष्मीश्री इन्व्हेस्टमेंटचे संशोधन प्रमुख अंशुल जैन यांनी आज गुंतवणूकादारांना १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्यासाठी तीन इंट्राडे स्टॉकची शिफारस केली आहे. यामध्ये सेंट्रम कॅपिटल , डीसीडब्ल्यू आणि जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस यांचा समावेश आहे.
प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकादारांना खरेदी-विक्रीसाठी तीन स्टॉक्सची शिफारस केली आहे. यामध्ये आयसीआयसीआय बँक , कोफोर्ज आणि सुला व्हाइनयार्ड्स यांचा समावेश आहे. चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी आज गुंतवणूकादारांना खरेदी करण्यासाठी पाच ब्रेकआउट स्टॉकची शिफारस केली आहे. यामध्ये संघवी मूव्हर्स , सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजी , टेक्नो इलेक्ट्रिक अँड इंजिनिअरिंग कंपनी, गोदावरी पॉवर अँड इस्पात लिमिटेड आणि गो डिजिट जनरल इन्शुरन्स लिमिटेड यांचा समावेश आहे.
आज खरेदी करायच्या स्टॉकबाबत, बाजार तज्ञांनी काही माहिती दिली आहे. चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया, आनंद राठी येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे आणि प्रभुदास लिल्लाधर येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपलक्कल यांनी आज खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांना आठ इंट्राडे स्टॉकची शिफारस केली आहे. यामध्येस कॅपलिन पॉइंट लॅबोरेटरीज लिमिटेड, लँडमार्क कार्स लिमिटेड, पतंजली फूड्स लिमिटेड, आयसीआयसीआय बँक लिमिटेड, बॉम्बे डाईंग अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड, स्वान एनर्जी लिमिटेड आणि सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजी लिमिटेड यांचा समावेश आहे.