नवी दिल्ली: डेन्मार्कचे (denmark ) प्रिन्स फेडरिक आंद्रे हेनरिक (Frederik Andre Henrik Christian)) आणि डेन्मार्कची राजकुमारी मेरी एलिझाबेथ (Mary Elizabeth) यांचे सोमवारी भारतात आगमन झाले. ते 26 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत येथे असतील. या जोडप्याने ताजमहालला भेट दिली. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते, अरिंदम बागची यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर या शाही जोडप्याच्या आगमनाची माहिती दिली. शाही दाम्पत्याच्या भेटीमुळे भारत आणि डेन्मार्कमधील घनिष्ठ आणि मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ होतील, असे ते म्हणाले.
प्रिन्स फेडरिक आंद्रे हेनरिक आणि डेन्मार्कची राजकुमारी मेरी एलिझाबेथ
[read_also content=”भारतातही बसू शकतो भूकंपाचा मोठा धक्का? देशाच्या ‘या’ राज्यातील लोक भीतीपोटी झोपतात घराबाहेर! https://www.navarashtra.com/india/some-people-in-india-are-forced-to-sleep-outside-the-house-because-of-earthquake-fear-nrps-372450.html”]
डेन्मार्कचे प्रिन्स फेडरिक आंद्रे हेनरिक आणि राजकुमीरी मेरी एलिझाबेथ यांनी आग्रा येथील ताजमहालला भेट दिली. आपल्या दौऱ्यादरम्यान डेन्मार्कचे प्रिन्स फेडरिक आंद्रे हेनरिक उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांची भेट घेणार आहेत. CII द्वारे आयोजित भारत-डेन्मार्क: पार्टनर्स फॉर ग्रीन अँड सस्टेनेबल प्रोग्रेसच्या उद्घाटन सत्राला ते संबोधित करतील. ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांचीही भेट घेणार आहेत.
डेनमार्क के क्राउन प्रिंस फ्रेडरिक आंद्रे हेनरिक क्रिश्चियन और क्राउन प्रिंसेस मैरी एलिजाबेथ आगरा में ताजमहल का दौरा किया। (तस्वीर सौजन्य: जिला सूचना विभाग) pic.twitter.com/YLEEuuERlL — ANI_HindiNews (@AHindinews) February 26, 2023