Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बंगालच्या उपसागरात धडकणार रेमल चक्रीवादळ, ‘या’ राज्यांना बसणार फटका, पाहा हवामान विभागाचा रेड अलर्ट

भारतातवर नवीन संकट आले असून हवामान विभागाकडून रेमल चक्रीवादळाबाबत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले चक्रीवादळ ताशी 110-120 किलोमीटर वेगाने जमिनीवर धडकू शकते. हवामान विभागाने कोणत्या भागात रेड अलर्ट जारी केला ते जाणून घ्या...

  • By श्वेता झगडे
Updated On: May 26, 2024 | 10:39 AM
बंगालच्या उपसागरात धडकणार रेमल चक्रीवादळ, ‘या’ राज्यांना बसणार फटका, पाहा हवामान विभागाचा रेड अलर्ट
Follow Us
Close
Follow Us:

भारतीय हवामान विभागाकडून रेमल चक्रीवादळाबाबत अलर्ट जारी करण्यात आला. हे वादळ काही तासांत भारताच्या पूर्व किनारपट्टीवर धडकणार असून आज (26 मे) आणि उद्या (२७) कोलकाता तसेच पश्चिम बंगालमधील इतर जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे. या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार ते जाणून घ्या…

या भागात पावसाचा इशारा 

बंगालच्या उपसागरावरील खोल दाब रविवारी संध्याकाळपर्यंत चक्री वादळात बदलू शकते आणि 26 मेच्या रात्री पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टीवर धडकू शकते. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले चक्रीवादळ ताशी 110-120 किलोमीटर वेगाने जमिनीवर धडकू शकते. तसेच ताशी 135 किलोमीटरचा वेग गाठू शकते. परिणामी हवामान विभागाने २६-२७ मे रोजी पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशाच्या किनारी जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. ईशान्य भारताच्या काही भागांमध्ये 27-28 मे रोजी अतिवृष्टी होऊ शकते, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

[read_also content=”दिल्लीत बेबी केअर हॉस्पिटला आग, 7 नवजात बालकांचा मृत्यू https://www.navarashtra.com/india/delhi-breaking-news-in-marathi-7-babies-killed-as-massive-fire-breaks-out-at-children-hospital-538424.html”]

मच्छीमारांना बंदी

रेमल चक्रीवादळ येण्यापूर्वी समुद्रात 1.5 ते 2 मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे किनारपट्टीवरील पश्चिम बंगाल आणि बांगलादेशातील सखल भाग पाण्याखाली जाऊ शकतात. बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील भागात 27 मेच्या सकाळपर्यंत मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान विभागाने 26 आणि 27 मे रोजी पश्चिम बंगालच्या किनारी जिल्ह्यांसाठी (दक्षिण आणि उत्तर 24 परगणा) रेड अलर्ट जारी केला आहे. येथे काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

महाराष्ट्रावर काय परिणाम?

रेमल चक्रीवादळामुळे पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा, मिझोराम, त्रिपुरा आणि दक्षिण मणिपूरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर महाराष्ट्रावर या चक्रीवादळाचा कोणताही परिणाम होणार नसल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.

‘या’ चक्रीवादळा नेमकं नाव कसं पडलं?

उष्णकटिबंधीय भागातून तयार होणाऱ्या वादळाच्या प्रकारात मोडत असलेलं हे चक्रीवादळ, सर्वात प्रथम ओमानमध्ये २०२४ च्या मान्सून हंगामापूर्वीच दाखल होणार आहे. त्यामुळं ओमान देशाच्या हवामानखात्याने या वादळाला एक नाव द्यायचं ठरवलं आणि ‘रेमल’ असं नाव त्यांनी या चक्रीवादळाला दिलं आहे. अरबी भाषेत ” या नावाचा अर्थ ‘वाळू’ असा होतो.

Web Title: Cyclone remal storm intensified to severe cyclonic storm says imd expected to hit bengal today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2024 | 10:39 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.