Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कर्ज वसुली करणाऱ्यांनी गर्भवतीला ट्रॅक्टरखाली चिरडले, फायनान्स कंपनीच्या ४ कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा

हजारीबागच्या सिजुआ गावातील दिव्यांग शेतकरी मिथिलेश प्रसाद मेहता यांनी महिंद्रा फायनान्सकडून २०१८ मध्ये ट्रॅक्टर फायनान्स केले होते. ते नियमितपणे हप्ते भरत होते. पण १ लाख २० हजार रुपयांचे ६ हफ्ते अजून पेंडिंग होते. आर्थिक चणचणीमुळे त्यांना ते फेडण्यास विलंब झाला. त्यामुळे त्यांच्यावरील कर्ज वाढून १ लाख ३० हजारांवर पोहोचले. फायनान्स कंपनीचे कर्मचारी काही दिवसांपूर्वी आले, तेव्हा त्यांनी मुदलाशिवाय १२ हजार रूपये अतिरिक्त मागितले.

  • By Sunil Chavan
Updated On: Sep 17, 2022 | 06:22 PM
कर्ज वसुली करणाऱ्यांनी गर्भवतीला ट्रॅक्टरखाली चिरडले, फायनान्स कंपनीच्या ४ कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली – झारखंडच्या हजारीबागमध्ये कर्ज वसुलीसाठी गेलेल्या एजंटांनी एका शेतकऱ्याच्या गरोदर मुलीला ट्रॅक्टरखाली चिरडल्याची संतापजनक गुरूवारी घटना घडली आहे. या घटनेत मुलीचा जागीच मृत्यू झाला. ती ४ दिवसांपूर्वीच आपल्या माहेरी आली होती. पोलिसांनी महिंद्रा फायनान्सच्या ४ कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. स्थानिकांनी या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी करत फायनान्स कंपनीच्या कार्यालयाला घेराव घातला आहे. चारही आरोपी सध्या फरार आहेत.

हजारीबागच्या सिजुआ गावातील दिव्यांग शेतकरी मिथिलेश प्रसाद मेहता यांनी महिंद्रा फायनान्सकडून २०१८ मध्ये ट्रॅक्टर फायनान्स केले होते. ते नियमितपणे हप्ते भरत होते. पण १ लाख २० हजार रुपयांचे ६ हफ्ते अजून पेंडिंग होते. आर्थिक चणचणीमुळे त्यांना ते फेडण्यास विलंब झाला. त्यामुळे त्यांच्यावरील कर्ज वाढून १ लाख ३० हजारांवर पोहोचले.
फायनान्स कंपनीचे कर्मचारी काही दिवसांपूर्वी आले, तेव्हा त्यांनी मुदलाशिवाय १२ हजार रूपये अतिरिक्त मागितले. मेहता यांनी ही रकम देण्यास नकार दिला. त्यानंतर ते परत गेले. गुरूवारी सकाळी ११.३० च्या वा. ते ट्रॅक्टर जबरदस्तीने घेऊन जाऊ लागले. इचाक ठाणे क्षेत्रातील बरियठ गावालगत नातेवाईक ट्रॅक्टरपुढे गोळा झाले. त्यांनी कर्जाचे १.२० लाख रुपये भरण्याची तयारी दर्शवली. त्यावर कर्मचाऱ्याने आणखी १२ हजार रुपये मागितले.

त्यांनी नकार दिल्यानंतर फायनान्स कंपनीचे कर्मचारी ट्रॅक्टरवर चढले. त्यांनी समोरून हटा नाही तर ट्रॅक्टर अंगावर घालण्याची धमकी दिली. त्यानंतरही नातेवाईक ट्रॅक्टरपुढून हटले नाही. त्यामुळे रिकव्हरी एजंटांनी ड्रायव्हरला ट्रॅक्टर पुढे नेण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी शेतकऱ्याच्या गरोदर मुलीला चिरडले. तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी ट्रॅक्टर घेऊन पळून गेले.

Web Title: Debt collectors crushed the pregnant woman under a tractor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2022 | 06:22 PM

Topics:  

  • Pregnant woman

संबंधित बातम्या

Jalna News : संतापजनक! गर्भवती महिलेच्या डॉपलर टेस्टवेळी जेली ऐवजी फिनायल वापरलं, जालन्यातील प्रकार
1

Jalna News : संतापजनक! गर्भवती महिलेच्या डॉपलर टेस्टवेळी जेली ऐवजी फिनायल वापरलं, जालन्यातील प्रकार

गजब Technology! AI मुळे झाली महिला गरोदर, 20 वर्षांनी घरात हलणार पाळणा
2

गजब Technology! AI मुळे झाली महिला गरोदर, 20 वर्षांनी घरात हलणार पाळणा

सोलापूरमध्ये माणुसकीला काळीमा! 7 महिन्यांच्या गर्भवतीला लाथाबुक्क्यांनी मारहाण; महिलेची प्रकृती…
3

सोलापूरमध्ये माणुसकीला काळीमा! 7 महिन्यांच्या गर्भवतीला लाथाबुक्क्यांनी मारहाण; महिलेची प्रकृती…

कल्याणमध्ये ‘दिनानथ मंगेशकर’च्या घटनेची पुनरावृत्ती, प्रसूतीगृहात महिलेचा मृत्यू
4

कल्याणमध्ये ‘दिनानथ मंगेशकर’च्या घटनेची पुनरावृत्ती, प्रसूतीगृहात महिलेचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.