नवी दिल्ली: संसदेच्या अधिवेशनात आज सलग दुसऱ्या दिवशी ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यात आली. आज संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली आहे. याच वेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.ऑपरेशन सिंदूर सुरु असताना भारताने पाकव्याप्त काश्मीर काबीज करायला हवे होते असे विरोधकांचे म्हणणे होते. यावर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भाष्य केले आहे.
संसदेत बोलताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, “आमच्या विरोधी पक्षातील काही नेते म्हणत आहेत कि, ऑपरेशन सिंदूर सुरु असताना भारताने पाकव्याप्तकाश्मीर काबीज करायला हवे होते. मात्र ते त्यांचा मांडले सांगत आहेत की केवळ दिखावा करत आहेत? हे मला समजत नाही. जे काही असेल माझा आणि माझ्या भारतीय जनता पक्षाचे नेहमी हेच धोरण राहिले आहे, ‘तो दिवस दूर नाही जेव्हा पाकव्याप्त काश्मीर भारतात असेल.’
राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानवर देखील भाष्य केले आहे. पाकिस्तान हा असा देश आहे जो कायम कोणत्या ना कोणत्या देशाच्या दबावाखाली काम करत असतो. आज पाकिस्तानवर एक नाही अनेकांचा दबाव आहे. जे त्याला प्रगतीच्या दिशेने जाऊ देत नाहीयेत. दहशतवाद पाकिस्तानमधून आणि जगभरातून नष्ट व्हावे अशीच भारताची इच्छा आहे.
संसदेतून राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला थेट इशारा
संसदेत ऑपरेशन सिंदूरवर बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, “आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये दहशतवादाचा सामना करण्यासाठी तयार आहोत. भारत आपल्या आत्मरक्षणासाठी सदैव तयार आहे. जर कोणी आमच्या नागरिकांना मारणार असेल तर, आमच्या मिसाईल्स सीमा पार करणारच. आमचे सैनिक शत्रू राष्ट्रात घुसून कारवाई करणारच. आम्ही दहशतवादाचा पूर्णपणे बिमोड करण्यासाठी पूर्णपणे तत्पर आहोत.”
“आमच्या नागरिकांना मारणार असाल तर मिसाईल्स…”; संसदेतून राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला थेट इशारा
पुढे बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, ” आम्ही पाकिस्तानच्या दबावाखाली युद्धबंदी केलेली नाही. ऑपरेशन सिंदूर थांबवले आहे, बंद केलेलं नाही. ऑपरेशन सिंदूरमध्ये १०० पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाले आहेत. संपूर्ण ऑपरेशन आम्ही २२ मिनिटात पूर्ण केले आहे. ऑपरेशन सिंदूर हे भारताचे यश आहे. तीनही सैन्य दलांनी एकत्रितपणे ही कारवाई केली आहे.”
अमित शहा कडाडताच संसदेत अखिलेश यादव गपगार
अमित शाह बोलत असताना समाजवाद पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी मध्येच उठून टिपण्णी केली. त्यावेळेस अमित शाह यांनी यादव यांना खाली बसण्यास सांगितले. ‘दहशतवाद्यांचा धर्म पाहून तुम्ही दुःखी होऊ नका’ असा सणसणीत टोला अमित शाह यांनी अखिलेश यादव यांना लगावला आहे.