Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिल्लीत बेबी केअर हॉस्पिटला आग, 7 नवजात बालकांचा मृत्यू

Delhi New Born Baby Care Hospital Fire: दिल्लीतील न्यू बॉर्न बेबी केअर हॉस्पिटलला शनिवारी रात्री भीषण आग लागली. या भीषण अपघातात 7 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 26, 2024 | 09:51 AM
दिल्लीत बेबी केअर हॉस्पिटला आग, 7 नवजात बालकांचा मृत्यू
Follow Us
Close
Follow Us:

डोंबिवली एमआयडीसीतील बॉयलर स्फोटक प्रकरण ताजे असताना आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. दिल्लीतील विवेक विहारमध्ये नवजात बालकांच्या तीन मजली खासगी रुग्णालयात शनिवारी (25 मे 2024) रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. या भीषण अपघातात 7 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला. तर इतर 5 नवजात बालके अजूनही जीवन-मरणाची लढाई लढत आहेत. आग एवढी भीषण होती की, हॉस्पिटलच्या आजूबाजूची दुकाने आणि इमारतींना आग लागली.

दिल्ली अग्निशमन सेवा (DFS) कडून मिळालेल्या माहितीनुसार, विवेक विहार येथील न्यू बॉर्न बेबी केअर हॉस्पिटलमध्ये शनिवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी एकूण 12 नवजात बालकांना वाचविण्यात यश आले. यापैकी 7 गंभीर भाजलेल्या नवजात बालकांचा मृत्यू झाला, तर इतर 5 नवजात अजूनही रुग्णालयात दाखल आहेत. घटनास्थळी अजूनही बचावकार्य सुरू आहे.

नवजात मुलांची नोंद सापडली नाही

विवेक विहार फेज-1 आयटीआय चौकाजवळ सुमारे 120 स्क्वेअर यार्डवर बांधलेल्या सी-54 या इमारतीच्या तळमजला आणि पहिल्या मजल्यावर सुरू असलेल्या बेबी केअर सेंटरमध्ये शनिवारी रात्री आग लागल्याचे वृत्त आहे. त्यामुळे 12 नवजात बालकांना रुग्णवाहिका आणि पीसीआरद्वारे उपचारासाठी जवळच्या अन्य रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टर रामजी भारद्वाज यांनी 6 नवजात बालकांना मृत घोषित केले. गंभीररीत्या भाजलेल्या नवजात अर्भकासह अन्य 5 बाळांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. यापैकी गंभीर अवस्थेत असलेल्या बाळाचाही नंतर मृत्यू झाला. आगीत नष्ट झालेल्या बेबी केअर सेंटरमध्ये नवजात अर्भकांची नोंद सापडलेली नाही.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी व अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. अग्निशमन अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आग पूर्णपणे विझवण्यात आली आहे. घटनास्थळावरून सुटका करण्यात आलेल्या नवजात बालकांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या नऊ गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या असून बचावकार्य सुरू आहे. डीएफएस प्रमुख अतुल गर्ग यांनी सांगितले की, मध्यरात्री एक फोन आला होता. आगीचे कारण कळू शकलेले नाही.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 25 मे रोजी रात्री 11.30 च्या सुमारास विवेक विहार पोलिस स्टेशनला आग लागल्याचा पीसीआर कॉल आला होता. कॉल मिळताच विवेक विहारचे एसीपी आणि एसएचओ तात्काळ पोलिस दलासह घटनास्थळी पोहोचले, जेथे न्यू बॉर्न बेबी केअर हॉस्पिटल आणि शेजारील इमारतीला आग लागल्याचे दिसले. इमारतीच्या वरच्या मजल्यावरून इतर लोकांच्या मदतीने 11 नवजात बालकांची सुटका करण्यात आली आणि रुग्णवाहिकेद्वारे त्यांना पूर्व दिल्ली प्रगत एनआयसीयू हॉस्पिटल, डी-237, विवेक विहार येथे उपचारासाठी हलवण्यात आले. ही तीन मजली इमारत असून आगीमुळे संपूर्ण इमारत जळून खाक झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Delhi breaking news in marathi 7 babies killed as massive fire breaks out at children hospital

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2024 | 09:51 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.