
ऐन निवडणुकीच्या रणसंग्रामात दिल्ली येथे भीषण स्फोट झाला. लाल किल्ला मेट्रो स्टेशन परिसरात झालेल्या या हल्ल्यामागे दशहतवादी कट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मेट्रो स्टेशन परिसरात असलेल्या गाडीचे स्फोट झाला असून ही गाडी नेमकी तिकडे आली कुठून, या गाडीचा मालक कोण याबाबत सखोल चौकशीचे आदेश दिले गेले आहेत. लाल किल्ला मेट्रो स्टेशन परिसरात उभी असलेल्या गाडीत स्फोट झाला आणि त्यानंतर लागोपाठ असलेल्या तीन ते चार गाड्यांना लागोपाठ आगा लागली, याबाबतची माहिती अग्नीशामन दलाला मिळाली. प्राथमिक तपास पाहता याबाबत ठोस कोणतीही माहिती नाही. सध्या याबाबत तपास जारी आहे आणि अग्नीशामन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
लाल किल्ला मेट्रो स्टेनश गेट नं 1 चा परिसर हा वर्दळीचा असून संवेदनशील देखील आहे. या ठिकाणी लोकांची सतत रेलचेल सुरु असते. त्यामुळे हा दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न तर नव्हता ना असा संशय देखील व्यक्त केला जात आहे. गेले काही दिवस पोलीसांकडून या ठिकाणी काही ना काही कारावाई केली जात होती त्यामुळे परिसरात भितीचं वातावरण आहे. लाल किल्ला हा तसा पाहिला गेला तर संवेदनशील परिसरत आहे.
लाला किल्ला परिसरात सुरक्षा रक्षक आणि पोलीसांची करडी गस्त असते. त्यामुळे कोणत्याही प्रकारे घातपात होण्याची शक्यता तशी कमीच आहे. या परिसरात नेमकी आग कशांमुळे लागली याबाबात तपास सुरु असला तरी दहशतवादी हल्याची शक्यता कमी आहे. सध्या पोलीस आणि अग्नीशामन दल हे स्फोटात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढत असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
गाडीतील काही तांत्रिक बिघाडामुळे आग लागली असावी असं म्हटलं जात आहे. तपास जारी असला तरी नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या बॉम्बस्फोटमध्ये २४ जण जखमी झाले असून जखमींना एलएनजेपी रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र हा स्फोट इतका भीषण होता की जखमी आणि मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.