Indigo Flight Emergency Landing: मुंबई एअरपोर्टवर इंडिगोच्या फ्लाईटचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. दिल्लीवरून गोव्याला जाणारे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. दिल्ली-गोवा फ्लाईटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने फ्लाईटचे इमर्जन्सी लँडिंग मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आले आहे. फ्लाईटने टेकऑफ केल्यानंतर बराच कालावधी विमान आकाशात घिरट्या घालत होते. मात्र पायलटच्या सावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.
इंडिगोची फ्लाईट 6E 6271 चे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. पायलटची सावधानता आणि योग्य निर्णय यामुळे १९१ प्रवाशांचा जीव वाचला आहे. पायलटने पॅन..पॅन..पॅन असा कॉल दिला. जो एक इमर्जन्सी सिग्नल असतो. त्यानंतर फ्लाईटचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे.
पॅन..पॅन..पॅन चा काय आहे अर्थ?
पॅन..पॅन..पॅन हा एक प्रकारचा इमर्जन्सी सिग्नल असतो. जो विमानाच्या उड्डाण झाल्यावर काही इमर्जन्सी असल्यास वापरला जातो. हा सिंगल दिल्यास फ्लाईटमध्ये काहीतरी अडचण असल्याचे समजले जाते. त्यामुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करणेच योग्य ठरते. त्यामुळे दिली ते गोवा या इंडिगोच्या फ्लाईटचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. पायलटच्या सावधनतेमुळे १९१ प्रवासी सुखरूप असून, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. विमानात नेमका काय बिघाड झाला आहे याचा तपास केला जात आहे.
टेकऑफच्या काही सेकंदातच दोन्ही इंजिन बंद
एअर इंडियाच्या विमानाच्या भयानक अपघाताचा प्राथमिक तपास अहवाल समोर आला आहे. उड्डाण होताच विमान कोसळले, ज्यामध्ये २६० लोकांचा मृत्यू झाला. एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) ने जारी केलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, उड्डाणानंतर काही सेकंदात दोन्ही इंजिनचे इंधन अचानक बंद पडले. त्यामुळे विमान नियंत्रणाबाहेर गेले आणि क्रॅश झाले. याचा अर्थ असा की दोन्ही इंजिन टेकऑफच्या काही सेकंदातच बंद पडले, अशी धक्कादायक माहिती अहवालातून समोर आली.
अहवालात नोंदवलेल्या कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डिंगवरून असे दिसून आले की, टेकऑफच्या वेळी एका पायलटने एका सहकाऱ्याला विचारले, “तुम्ही इंधन का कमी केले?” उत्तरात, दुसऱ्या पायलटने म्हटले, “मी हे केले नाही. यावरून हे स्पष्ट होते की पायलटने इंधन बंद केले नव्हते. यामुळे दोन्ही इंजिनांचे इंधन कटऑफ एकाच वेळी कसे झाले असा प्रश्न उपस्थित होतो. इंजिन १ आणि इंजिन २ यांना इंधन पुरवठा करणारे स्विचेस बंद झाल्यानंतर इंजिन बंद झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.