तिहार तुरुंगात अफजल गुरूला देण्यात आलेली फाशी
अफजल गुरूची कबर हटवण्यासाठी हायकोर्टात याचिका
कोर्टात पार पडली सुनावणी
Delhi Highcourt: तिहार जेलमध्ये दहशतवादी अफजल गुरूला फाशी देण्यात आली होती. तिहार तुरुंगात त्याची कबर बांधण्यात आलेली आहे. दरम्यान दिल्ली हायकोर्टात तिहार जेल परिसरात असणारी अफजल गुरुची कबर हटवण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती.
मोहम्मद अफजल गुरु आणि मोहम्मद मकबुल भट यान दोन्ही दहशतवाद्यांना तिहार जेल परिसरात फाशी देण्यात आली होती. दरम्यान हायकोर्टात याचिका दाखल करून या दोन्ही दहशतवाद्यांच्या कबरी हटवण्याची मागणी करण्यात आली होती. दरम्यान दिल्ली हायकोर्टाने या याचिकेवर विचार करण्यास नकार दिला आहे.
हायकोर्टाचे मत पाहता याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी कोर्टासमोर याचिका मागे घेण्याची व पुन्हा काही तपशील समाविष्ट करून दाखल करू देण्याची विनंती केली. दिल्ली हायकोर्टाच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांना याचिका मागे घेण्याची परवानगी दिली. तसेच ‘याचिका मागे घेतली असे समजून’ फेटाळून लावली.
हायकोर्टाचे खंडपीठ काय म्हणाले?
जनहित याचिका दाखल करून त्यामध्ये दिलासा मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला एखाद्या विषयात सांविधानिक, मूलभूत अधिकारांचे
उल्लंघन झालेले दाखवावे लागेल. कोणताही नियम किंवा कायदा हा जेल परिसरात अंत्यसंस्कार किंवा दफन करण्यास मनाई करत नाही.
धमकीच्या ईमेलनंतर दिल्ली उच्च न्यायालय रिकामे
दिल्ली उच्च न्यायालयात शुक्रवारी दुपारी बॉम्ब धमकीची माहिती मिळाल्याने खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार सुमारे ४० मिनिटांपूर्वी एक धमकीचा ईमेल आला होता, ज्यामध्ये न्यायालयाच्या आवारात तीन बॉम्ब ठेवण्यात आले होते आणि दुपारी २ वाजेपर्यंत उच्च न्यायालय रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले होते. मेलमध्ये काही प्रसिद्ध नेत्यांची नावे आणि राजकीय विधाने देखील होती.
मेलमध्ये दावा करण्यात आला होता की, उच्च न्यायालयाच्या आवारात ३ बॉम्ब ठेवण्यात आले आहेत आणि दुपारी २ वाजेपर्यंत सर्व बॉम्ब काढून टाकावेत.
या मेलमध्ये एक असामाजिक/आक्रमक राजकीय संदेश देखील होता ज्यामध्ये काही राजकारण्यांना लक्ष्य करणारे कठोर शब्द होते; काही विशिष्ट नावे देखील नमूद करण्यात आली होती. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की मेलची भाषा आणि संदर्भ या घटनेला “अंतर्गत काम” असे दाखवण्याचा प्रयत्न करतात.
सर्वात धक्कादायक म्हणजे, मेलमध्ये तामिळनाडूच्या राजकीय पक्ष द्रमुकचा देखील उल्लेख आहे. मेलमध्ये म्हटले आहे की, “आम्ही प्रस्तावित करतो की डॉ. एझिलन नागनाथन यांनी द्रमुकची सूत्रे हाती घ्यावीत.” यासोबतच, मेलमध्ये उदयनिधी स्टॅलिन यांचे पुत्र इन्बानिधी उदयनिधी यांना अॅसिडने जाळण्याची धमकी देखील देण्यात आली आहे.