Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Islamabad Blast: काश्मीरचा पाकिस्तानला शेवटचा सलाम? बारामुल्ला ते श्रीनगर.. रस्त्यावर फक्त एकच घोषणा, ‘पाकिस्तान मुर्दाबाद’

Anti Pakistan Slogans in Kashmir: काश्मीरमधील शिया समुदाय पाकिस्तानविरुद्ध संतप्त, इस्लामाबाद मशिदीवरील हल्ल्याचा निषेध, 'पाकिस्तान मुर्दाबाद' च्या घोषणा, सामान्य जनतेच्या संताप आणि भीतीमुळे निर्माण झालेली प्रतिक्रिया.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Feb 07, 2026 | 11:12 AM
kashmir protests islamabad mosque blast anti pakistan slogans shia community

kashmir protests islamabad mosque blast anti pakistan slogans shia community

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानचा खरा चेहरा उघडा
  • असीम मुनीर यांची कोंडी
  • उत्स्फूर्त जनआक्रोश

Anti Pakistan slogans in Kashmir 2026 : पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद(Islamabad mosque blast 2026) शुक्रवारी एका भीषण आत्मघाती स्फोटाने हादरली. एका शिया मशिदीबाहेर झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत ६९ जणांचा मृत्यू झाला असून १७० हून अधिक जण मृत्यूशी झुंज देत आहेत. या अमानवीय कृत्याचे पडसाद केवळ पाकिस्तानमध्येच नाही, तर भारताच्या काश्मीर खोऱ्यातही तीव्रतेने उमटले आहेत. शनिवारी सकाळी काश्मीरमधील शिया बहुल भागात लोकांनी रस्त्यावर उतरून पाकिस्तानचा उघड निषेध केला आणि “पाकिस्तान मुर्दाबाद”च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

काश्मीरमध्ये संतापाची लाट: कुठे झाली निदर्शने?

हल्ल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला, श्रीनगर आणि बांदीपोरा या जिल्ह्यांमध्ये निदर्शने सुरू झाली. बारामुल्लामधील चनाबल पट्टन आणि डायव्हर परिहासपोरा येथे संतप्त तरुणांनी रस्ते रोखून धरले. श्रीनगरमधील इमामबारा झाडीबल आणि हरवान भागात पाकिस्तान सरकार आणि त्यांच्या दहशतवादी धोरणांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. बांदीपोराच्या इंदरकोट-सुंबलमध्ये रात्रीच्या वेळी मेणबत्त्या पेटवून मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली, मात्र यावेळी लोकांच्या डोळ्यात दुःखापेक्षा पाकिस्तानविरुद्धचा संताप जास्त दिसून आला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trade Deal: ‘मेक इन इंडिया’ला मिळाले जागतिक पंख; मोदींच्या एका ‘ट्विट’ने बदललं जागतिक समीकरण अन् India-US मैत्री आणखी घट्ट

पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांना मोठा धक्का

हे निदर्शने पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्यासाठी एका मोठ्या आंतरराष्ट्रीय नामुष्कीसारखे आहेत. गेली अनेक दशके पाकिस्तान जागतिक व्यासपीठावर आपण काश्मिरी मुस्लिमांचे कैवारी आहोत असा ढोल बडवत आला आहे. मात्र, त्यांच्याच राजधानीत जेव्हा एका विशिष्ट समुदायाच्या मशिदीला लक्ष्य केले जाते, तेव्हा पाकिस्तानचा हा मुखवटा गळून पडतो. काश्मिरी जनतेने आता उघडपणे प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे की, “जो देश स्वतःच्या नागरिकांचे आणि मशिदींचे संरक्षण करू शकत नाही, तो इतरांचे रक्षण काय करणार?”

Protest erupts in Bandipora J&K, as Shia residents condemn the killing of Shia Muslims in a bomb blast during Friday prayers in Islamabad, Pakistan.@ajaykraina @ChinarcorpsIA @HBjournalist @KashmirAhead @LtGenDPPandey pic.twitter.com/B1O2SnUxLL — Zubair chowdhary (@ZubairChowdhary) February 6, 2026

credit – social media and Twitter

राजकारण नाही, तर हा माणुसकीचा टाहो आहे!

या निदर्शनांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा फुटीरतावादी संघटनेने आयोजित केलेले नव्हते. ही सामान्य लोकांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. काश्मीरचा शिया समुदाय अनेक वर्षांपासून पाकिस्तानमध्ये होणाऱ्या लक्ष्यित हत्यांमुळे (Targeted Killings) अस्वस्थ आहे. इस्लामाबादमधील या ताज्या घटनेने त्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. “आम्ही आता पाकिस्तानला आमचा शुभचिंतक मानत नाही, तर तो केवळ अस्थिरता आणि रक्तापाताचा स्रोत आहे,” अशी भावना एका निदर्शकाने व्यक्त केली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Global Teacher Prize: भारताची लेक दुबईत चमकली! भारतीय शिक्षिकेला शेखने दिले 8 कोटी; डोळ्यांत पाणी आणणारी रुबल नागींची ‘मिसाल’

धार्मिक कट्टरतावादाला चपराक

काश्मीरमध्ये गेल्या काही वर्षांत विकासाची प्रक्रिया सुरू असताना, सीमेपलीकडून धार्मिक भावना भडकवण्याचे अनेक प्रयत्न झाले. मात्र, या निदर्शनांनी हे सिद्ध केले आहे की, काश्मीरमधील मुस्लिम बांधव आता पाकिस्तानच्या दुटप्पी धोरणाला बळी पडणार नाहीत. हा जनआक्रोश त्या लोकांसाठी इशारा आहे जे धर्माच्या नावाखाली काश्मीरमध्ये अशांतता पसरवण्याचे स्वप्न पाहतात. पाकिस्तानची अर्थव्यवस्था आधीच कोलमडली असताना, आता त्यांच्या अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न आणि काश्मीरमधील हा विरोध मुनीर सरकारची डोकेदुखी वाढवणारा ठरणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: इस्लामाबादमधील मशिदीवर झालेल्या हल्ल्यात किती जणांचा मृत्यू झाला?

    Ans: या भीषण आत्मघाती हल्ल्यात आतापर्यंत ६९ जणांचा मृत्यू झाला असून १७० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत.

  • Que: काश्मीरमध्ये पाकिस्तानविरुद्ध निदर्शने का होत आहेत?

    Ans: पाकिस्तानमधील शिया समुदायावर वारंवार होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमुळे काश्मीरमधील शिया समुदाय संतप्त आहे आणि त्यांनी पाकिस्तानच्या दुटप्पी धोरणाचा निषेध केला आहे.

  • Que: काश्मीरच्या कोणत्या भागांत हे निदर्शने झाली?

    Ans: मुख्यत्वे श्रीनगरमधील झाडीबल, बारामुल्लामधील पट्टन आणि बांदीपोराच्या सुंबल भागात हे उत्स्फूर्त जनआंदोलन पाहायला मिळाले.

Web Title: Kashmir protests islamabad mosque blast anti pakistan slogans shia community

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 11:12 AM

Topics:  

  • india pakistan war
  • kashmir news
  • Pakistani Terrorist
  • viral video

संबंधित बातम्या

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या
1

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या

Mumbai Women Safety:  ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!
2

Mumbai Women Safety: ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत;  VIDEO VIRAL
3

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत; VIDEO VIRAL

iPhone 18 Pro Price in India: आयफोन 18 Pro ची किंमत ऐकून ग्राहकांना धक्का; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!
4

iPhone 18 Pro Price in India: आयफोन 18 Pro ची किंमत ऐकून ग्राहकांना धक्का; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.