Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CAG Report : ‘CAG च्या अहवालात मद्य धोरणाचं कौतुक, मग २००० कोटींचं नुकसान कसं झालं? आप नेत्या आतिशींनी सांगितलं

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज सभागृहात १४ प्रलंबित कॅग अहवालांपैकी नवीन उत्पादन शुल्क धोरण बनवताना झालेल्या अनियमिततेशी संबंधित अहवाल मांडला. हे धोरण मागील आम आदमी पक्षाच्या सरकारने आणलं होतं.

  • By संदीप गावडे
Updated On: Feb 25, 2025 | 07:22 PM
'CAG च्या अहवालात मद्य धोरणाचं कौतुक, मग २००० कोटींचं नुकसान कसं झालं? आप नेत्या आतिशींनी सांगितलं

'CAG च्या अहवालात मद्य धोरणाचं कौतुक, मग २००० कोटींचं नुकसान कसं झालं? आप नेत्या आतिशींनी सांगितलं

Follow Us
Close
Follow Us:

दिल्ली विधानसभेच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी, उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांच्या अभिभाषणाने सभागृहाचे कामकाज सुरू झाले. यानंतर, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज सभागृहात १४ प्रलंबित कॅग अहवालांपैकी नवीन उत्पादन शुल्क धोरण बनवताना झालेल्या अनियमिततेशी संबंधित अहवाल मांडला. हे धोरण मागील आम आदमी पक्षाच्या सरकारने आणलं होतं. नवीन उत्पादन शुल्क धोरण तयार करताना नियमांचे उल्लंघन, अनावश्यक सवलती आणि धोरणातील त्रुटींमुळे राज्याच्या तिजोरीला २,००२ कोटी रुपयांचे नुकसान झालं, असे कॅगच्या अहवालातून ताशेरे ओढण्यात आले आहेत. त्यावर विरोधी पक्षनेत्या आतिशी यांनी यावर पत्रकार परिषद घेत खुलासा केला आहे.

आतिशी यांनी अरविंद केजरीवाल यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात तयार केलेल्या नवीन उत्पादन शुल्क धोरणाचं समर्थन केले आहे. भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर जे अनियमिततेच्या आरोपांनंतर तत्कालीन सरकारने मागे घेतले होते. अतिशी म्हणाल्या की, २०१७ ते २०२१ पर्यंतचा उत्पादन शुल्क लेखापरीक्षण अहवाल सभागृहात सादर करण्यात आला. यामध्ये जुन्या मद्य धोरणातील त्रुटी उघड झाल्या आहेत. मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू असल्यामुळे जुने उत्पादन धोरण  बाहेर काढले. उत्तर प्रदेश आणि हरियाणा येथून दिल्लीत दारूची तस्करी केली जात होती. नवीन मद्य धोरणामुळे या काळाबाजाराला आळा बसला आणि दिल्ली सरकारला होणारे महसुली नुकसान टाळता आलं.

आतिशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, कॅगच्या अहवालातील आठव्या प्रकरणात म्हटले आहे की नवीन धोरण पारदर्शक होते, त्यात काळाबाजार रोखण्यासाठी तरतुदींचा समावेश होता आणि त्यामुळे महसूल वाढला पाहिजे होता. पंजाबमध्येही हेच धोरण लागू करण्यात आले तेव्हा तेथेही अबकारी महसूल वाढला. या धोरणामुळे २०२१ ते २०२५ पर्यंत पंजाबच्या अबकारी कराच्या महसुलात ६५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अहवालात असे म्हटले आहे की जर नवीन धोरण योग्यरित्या अंमलात आणले गेले असते, तर केवळ एका वर्षात महसूल ४,१०८ कोटी रुपयांवरून ८,९११ कोटी रुपयांपर्यंत वाढला असता.

नवीन उत्पादन शुल्क धोरण लागू न झाल्यामुळे दिल्लीच्या उत्पादन शुल्क महसूलात २००० कोटी रुपयांची घट झाली. ते कोणी लागू करू दिलं नाही याची चौकशी झाली पाहिजे. यासाठी तीन लोक जबाबदार आहेत: दिल्लीचे एलजी, सीबीआय आणि ईडी… या धोरणावरून हे स्पष्ट होते की ‘आप’ सरकारने जुने धोरण काढून योग्य निर्णय घेतला. या कॅग अहवालाच्या आधारे दिल्लीचे उपराज्यपाल, सीबीआय आणि ईडी यांची चौकशी करावी, एफआयआर नोंदवावा आणि कारवाई करावी अशी आमची मागणी आहे.

आता पुढे काय?

जर सूत्रांवर विश्वास ठेवला तर, दिल्ली विधानसभेची सार्वजनिक लेखा समिती (पीएसी) उत्पादन शुल्क धोरणावरील कॅग अहवालाची दखल घेऊ शकते. गरज पडल्यास, पीएसी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री, माजी मंत्री आणि दारू धोरण प्रकरणात इतर आरोपींना समन्स बजावू शकते. याआधी, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि दिल्ली उत्पादन शुल्क धोरण बनवणाऱ्या मंत्र्यांच्या गटाच्या अडचणी वाढू शकतात.

Web Title: Delhi vidhan sabha opposition leader atishi claims cag report glorifies aap government liquor policy calls it good

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2025 | 07:03 PM

Topics:  

  • Aam Aadmi Party
  • Atishi Marlena
  • Delhi Liquor Policy Case

संबंधित बातम्या

Asia cup 2025 : ‘सूर्यकुमार यादवमध्ये हिंमत आहे?’ भारत-पाकिस्तान सामन्यावरुन ‘आप’ झाली आक्रमक, दिले ‘हे’ आव्हान 
1

Asia cup 2025 : ‘सूर्यकुमार यादवमध्ये हिंमत आहे?’ भारत-पाकिस्तान सामन्यावरुन ‘आप’ झाली आक्रमक, दिले ‘हे’ आव्हान 

Bigg Boss 19 मध्ये होणार राजकीय नेत्यांची एंट्री? ‘ही’ दोन नाव चर्चेत
2

Bigg Boss 19 मध्ये होणार राजकीय नेत्यांची एंट्री? ‘ही’ दोन नाव चर्चेत

AAP News : ‘आप’ला मोठा धक्का! आमदार अनमोल गगन मान यांचा राजीनामा, राजकारणही सोडले
3

AAP News : ‘आप’ला मोठा धक्का! आमदार अनमोल गगन मान यांचा राजीनामा, राजकारणही सोडले

Gujarat Politics : गुजरातमध्ये ‘आप’ चा उदय कोणासाठी धोक्याची घंटा? भाजप की कॉंग्रेस? वाचा सविस्तर
4

Gujarat Politics : गुजरातमध्ये ‘आप’ चा उदय कोणासाठी धोक्याची घंटा? भाजप की कॉंग्रेस? वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.