
तामिळनाडूत राजकीय वाद पेटला! CM विजय, अभिनेत्री त्रिशावर कथित आक्षेपार्ह टिप्पणी; उदयनिधी स्टॅलिन पोलिसांच्या ताब्यात
ही घटना कावेरी नदीच्या पाणीवाटपाच्या मुद्द्यावर तंजावूर येथे आयोजित डीएमकेच्या आंदोलनादरम्यान घडली. सभेत बोलताना उदयनिधी स्टालिन यांनी मुख्यमंत्री विजय यांच्यावर कथितरित्या द्विअर्थी आणि आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप करण्यात आला. त्याच रॅलीदरम्यान अभिनेत्री तृषाविरोधातही कथित आक्षेपार्ह घोषणा देण्यात आल्याचा आरोप आहे.
NEET Re-Exam Result 2026 : तामिळनाडूतील १२ विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी, ३९० हून अधिक गुण
या प्रकरणी विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम (TVK) पक्षाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर तंजावूर पोलिसांनी उदयनिधी स्टालिन यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला. अटकेची शक्यता लक्षात घेऊन उदयनिधी यांनी मद्रास उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली. मंगळवारी न्यायमूर्ती जी. के. इलंथिरैयन यांच्या खंडपीठासमोर याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली. न्यायालयाने ती मान्य करत दुपारनंतर जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास सहमती दर्शवली.
#WATCH | DMK leader and LoP Udhayanidhi Stalin detained by Police from his Chennai residence, following an FIR against him over his alleged defamatory remarks against CM Vijay. Slogans directed at actor Trisha were raised at his rally yesterday. pic.twitter.com/wTM6rABo85 — ANI (@ANI) August 4, 2026
दरम्यान, हा वाद राष्ट्रीय महिला आयोगापर्यंत (NCW) पोहोचला आहे. टीव्हीकेचे राष्ट्रीय प्रवक्ते पाझा सेल्वाकुमार यांनी आयोगाकडे तक्रार दाखल करून उदयनिधी स्टालिन यांनी महिलांचा अवमान करणारी, अश्लील आणि लैंगिक सूचक टिप्पणी केल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांनी उदयनिधी यांनी सार्वजनिकरित्या बिनशर्त माफी मागावी आणि संबंधित कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी आयोगाकडे केली आहे. या प्रकरणामुळे तमिळनाडूतील राजकारण पुन्हा एकदा तापले असून, न्यायालयीन सुनावणी आणि पुढील पोलिस कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, यापूर्वी, सोमवार, ३ ऑगस्ट रोजी, द्रमुकने शेतकऱ्यांचे कल्याण आणि कावेरी प्रश्नाबाबत राज्य टीव्हीके सरकारकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत तंजावरमध्ये आंदोलन केले. विरोधी पक्षनेते आणि द्रमुक राज्य युवा शाखेचे सचिव उदयनिधी स्टॅलिन यांनी या आंदोलनाचे अध्यक्षस्थान भूषवले आणि जमावाला संबोधित केले. या कार्यक्रमात विविध जिल्ह्यांतील द्रमुक कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते.
मुख्यमंत्री विजय यांच्यावर टीका महागात; डीएमकेचे माजी मंत्री अटकेत, माजी मुख्यमंत्री स्टालिन भडकले