भारत-नेपाळ सीमेवर प्रवासाला लागत नाही व्हिसा-पासपोर्ट
भारत-नेपाळ यांच्यात आहे जुनी मैत्री
1950 चा करार होता तरी काय?
Do You Know: भारत आणि नेपाळ हे शेजारी राष्ट्र आहेत. दरम्यान सध्या नेपाळमध्ये अस्थिर वातावरण पाहायला मिळत आहे. नेपाळमध्ये सत्तापालट झाले आहे. हिंसाचार सुरू आहे. दरम्यान भारत आणि नेपाळ सीमेवर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. भारत आणि नेपाळ देशांमध्ये एकूण 1,751 किलोमीटर लांब इतकी सीमा आहे. दरम्यान नेपाळ-भारत सीमेवर पासपोर्ट किंवा व्हिसा लागत नाही. याचे कारण तुम्हाला माहिती आहे का? चल तर मग आजच्या या लेखातून व्हिसा आणि पासपोर्ट का लागत नाही हे, जाणून घेऊयात.
नेपाळ आणि भारतामध्ये 1,751 किलोमीटर लांबीची सीमा आहे. बिहार, उत्तराखंड, सिक्कीम, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश या भारतातील राज्यांची सीमा नेपाळला लागून आहे. डोही देशांमध्ये व्यापाराचे संबंध देखील आहेत. मात्र दोन्ही देशांच्या नागरिकांना एकमेकांच्या देशात जाण्यासाठी व्हिसा दाखवावा लागत नाही. याला 1950 मध्ये भारत आणि नेपाळमध्ये झालेला करार महत्वाचा आहे.
भारत आणि नेपाळमध्ये चांगले सबंध निर्माण व्हावेत म्हणून 1950 मध्ये दोन्ही देशांमध्ये शांतता आणि मैत्री करार करण्यात आला होता. 75 वर्षांपूर्वी झालेला हा करार आजही अस्तित्वात आहे. त्यामुळे दोन्ही देशांच्या नागरिकांना एकमेकांच्या देशात जाण्यासाठी व्हिसा आणि पासपोर्टची गरज लागत नाही.
काय आहे 1950 चा करार?
भारत आणि नेपाळ या देशांमध्ये 31 जुलै 1950 मध्ये शांततेचा आणि मैत्रीचा द्विपक्षीय करार झाला होता. हा करार म्हणजे दोन्ही देशांमधील एक महत्वाचा भाग आहे. हा करार दोन्ही देशांना शांती, मैत्री आणि सर्वभौमत्व प्रदान करते. तसेच एकमेकांच्या जमिनीवर हस्तक्षेप न करण्याबाबत देखील सांगतो.
भारत आणि नेपाळमध्ये अनेक वर्षांपासून आर्थिक, धार्मिक, सामाजिक संबंध राहिले आहेत. नेपाळ बऱ्याच अंशी भारतावर अवलंबून आहे. हजारो नेपाळी नागरिक भारतात काम करतात. तर भारतीय देखील नेपाळमध्ये काम करतात. दरम्यान 1950 च्या करारानुसार, नेपाळ भारत सोडून जेव्हा दुसऱ्या देशाकडून शस्त्रे खरेदी करेल, तेव्हा त्याला भारताशी चर्चा करावी लागेल.
1950 च्या दोन्ही देशांमध्ये झालेल्या करारानुसार, नागरिकांना दोन्ही देशांत मालमत्ता बाळगणे, व्यापार करणे, राहण्याचा आणि स्थलांतरित होण्याचा अधिकार आहे. म्हणजेच नेपाळचा नागरिक भारतात व भारताचा नागरिक नेपाळमध्ये मालमत्ता खरेदी करू शकतो. भारताचा नागरिक नेपाळमध्ये कुठेही राहू शकतो. तसेच नेपाळी नागरिकाला कराराच्या अंतर्गत भारतात राहण्याचा अधिकार आहे. भारतीय नागरिक व्हिसाशिवाय नेपाळमध्ये प्रवास करू शकतात, असे 1950 च्या करारात नमूद करण्यात आले आहे. तसेच दोन्ही देश हा करारात बदल करण्याबाबत चर्चा करून शकतो.