केंद्र सरकार नेपाळमधील भारतीयांना परत आणणार (फोटो- ani)
नेपाळमध्ये लवकरच होणार सत्तापालट
केंद्र सरकार राबवणार विशेष अभियान
भारतीयांना मायदेशी आणले जाणार
Nepal Crisis: नेपाळमध्ये हिंसाचार उफाळून आला आहे. सरकारने सोशल मिडियावर बंदी घातली आणि त्यानंतर नेपाळमध्ये मोठे आंदोलन उभे राहिले. आंदोलन एवढे मोठे झाले की सरकारने सोशल मिडियावर घातलेली बंदी मागे घेतली. मात्र या आंदोलनाचे रूपांतर हिंसाचारात झाले. नेपाळमध्ये अस्तीवत असलेले सरकार बरखास्त झाले. तिथली परिस्थिती बिकट झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नेपाळमधील भारतीयांना मायदेशी परत आणले जाणार आहे.
नेपाळचे पंतप्रधान केपी ओली यांनी राजीनामा दिला. राजीनामा देताच ते दुबईत शरण घेण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. नेपाळमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारांमुळे विमानसेवा खंडीत झाली आहे. काठमांडू विमानतळ बंद आहे. भारत-नेपाळ सीमेवर बंदोबस्त वाढवला गेला आहे. पश्चिम बंगालमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान तिथे अडकलेल्या भारतीयांना आता मायदेशी परत आणले जाणार आहे.
नेपाळमध्ये असलेल्या परिस्थितीमुळे तेथील काठमांडू एअरपोर्ट कधी सुरू होणार हे कोणालाच सांगता येणार नाही. आता भारत सरकारने नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. काठमांडू एअरपोर्ट अनिश्चित काळासाठी बंद असल्याने शेकडो भारतीय नागरिक तिथे अडकून पडले आहेत.
नेपाळमधील अडकलेल्या बहरतीय नागरिकांना परत आणण्यासाठी भारतीय वायुसेनेचे दोन विशेष विमाने केंद्र सरकार नेपाळमध्ये पाठवणार आहेत. हवाई दलाच्या विमानाने नेपाळमधील भारतीयांना दिल्लीत आणले जाणार आहे. काठमांडू एअरपोर्टवर अडकलेल्या भारतीयांना दिल्लीत आणले जाणार आहे. भारत सरकार नेपाळमधील स्थितीवर लक्ष ठेवून आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथील आंदोलककाना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
४८ तासांच्या हिंसाचारानंतर नेपाळ लष्कराच्या हाती देशाची कमान
गेल्या दोन दिवसांपासून शेजारील देश नेपाळमध्ये हिंसाचार उफाळला आहे. नेपाळ सरकारने देशातील सोशम मीडियावर बंदी घातल्यामुळे नेपाळमध्ये सरकारविरोधात निदर्शने सुरू झाली. दुसऱ्या दिवशी सरकारविरोधी निदर्शनांमध्ये, निदर्शकांनी सरकारी इमारतींवर हल्ला केला आणि संसद भवनासह अनेक वरिष्ठ नेत्यांच्या घरांना आग लावली. पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी राजीनामा देत देशातून पलायन केले. पण त्यानंतर मात्र नेपाळ लष्कराने देशाची सुत्रे हाती घेतली आहेत. लष्कराकडून देशात परिस्थिती निंयत्रणात आणण्यासाठी काम सुरू आहे. तर दुसरीकडे नेपाळमध्ये अंतरिम सरकारसाठी नव्या नावांची चर्चाही सुरू झाली हे.