दिल्ली : हिजाब प्रकरणाची लवकर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाने गुरुवारी नकार दिला. या प्रकरणावरून कुणीही सनसनाटी निर्माण करू नये, असा सल्लाही सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने दिला. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्यास परवानगी देण्याच्या विनंतीची याचिका कर्नाटक उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी फेटाळली होती. या विरोधात सुप्रीम कोर्टात असंख्य याचिका दाखल झालेल्या आहेत. सदर प्रकरणावरून सनसनाटी निर्माण करू नका,असा सल्ला सरन्यायाधीश रमण्णा यांनी याचिकाकर्त्यांना दिला(Don’t create a sensation! Immediate refusal of Supreme Court hearing in Hijab case).
विद्यार्थ्यांच्या 28 मार्चपासून परीक्षा आहेत. त्यांना हिजाब घालून वर्गात प्रवेश दिला जाणार नाही. आता सुनावणी घेतली नाहीतर विद्यार्थिनी परीक्षांपासून वंचित राहतील. त्यांचे एक वर्ष वाया जाईल, असा युक्तीवाद करत ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी सुप्रीम कोर्टाला विनंती केली. मात्र, न्यायालयाने वकिलांना सुनावले. परीक्षांचा या मुद्यासोबत काहीही संबंध नाही. तुम्ही संवेदनशील होऊ नका, असे सरन्यायाधीश म्हणाले.
गेल्या काही महिन्यांपासून कर्नाटकात हिजाबवरून वातावरण तापलेलेच आहे. कर्नाटक हायकोर्टाने शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्यच असून इस्लाममध्ये हिजाब ही अत्यावश्यक धार्मिक प्रथा नाही, असा निकाल दिला होता. त्यानंतर या निकालावर विविध स्तरावरून प्रतिक्रिया उमटल्या होत्या. दरम्यान, हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश रितू राज अवस्थी, न्यायमूर्ती कृष्णा दीक्षित आणि न्यायमूर्ती खाझी एम जैबुन्निसा यांना जिवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना वाय श्रेणीची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.
[read_also content=”घरात-दुकानात, वाहनांना ‘लिंबू-मिरची’च का बांधतात? अध्यात्म आणि विज्ञान काय सांगते? https://www.navarashtra.com/religion/religion/nimbu-mirchi-totka-nrvk-257586.html”]
[read_also content=”येथे लग्नानंतर नविन नवरा-नवरीच्या प्रायव्हेट पार्टची पूजा करतात; पूजेच्या नावावर होतात वधू-वरावर अत्याचार https://www.navarashtra.com/viral/here-after-the-wedding-the-newlyweds-worship-the-private-part-of-the-bride-the-bride-and-groom-are-tortured-in-the-name-of-worship-256616.html”]
[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]