Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानातून तोंड काळं करून आलेल्या अंजूसाठी वडिलांच्या घराचे दरवाजे बंद, मुलीचे नाव ऐकताच संतापले अन् म्हणाले….

  • By युवराज भगत
Updated On: Nov 30, 2023 | 05:29 PM
पाकिस्तानातून तोंड काळं करून आलेल्या अंजूसाठी वडिलांच्या घराचे दरवाजे बंद, मुलीचे नाव ऐकताच संतापले अन् म्हणाले….
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : अंजूचं काय करायचं आहे ते आता अरविंद आणि पोलीस ठरवतील. माझा आणि अंजूचा काही संबंध नाही. पाकिस्तानात जाऊन ती तोंड काळं करुन आली आहे असं म्हणत अंजूच्या वडिलांनी तिच्याविषयी प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या फेसबुकवरच्या प्रियकराला भेटण्यासाठी गेलेली अंजू चार महिन्यांनी भारतात परतली आहे. तिच्याविषयी तिच्या वडिलांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. अंजू दिल्ली विमानतळावरुन तिच्या ग्वाल्हेर येथील घरी जाणार आहे. तिचे वडील गयाप्रसाद यांनी मात्र माझा आणि अंजूचा काही संबंध नाही आणि तिला घरातही घेणार नाही असं म्हटलं आहे.

अंजूचे वडील काय म्हणाले?
अंजूचे वडील म्हणाले, अंजू ज्या दिवशी पाकिस्तानात गेली त्याच दिवशी माझ्यासाठी ती मेली. आता पाकिस्तानात तोंड काळं करुन ती आली आहे. मी तिला माझ्या घरात घेणार नाही. अरविंदने तिला घरात घ्यायचं आहे की नाही हा सर्वस्वी त्याचा प्रश्न आहे. त्याला जो निर्णय घ्यायचा आहे तो त्याने घ्यावा. गयाप्रसाद यांनी म्हटलं आहे की माझा मुलगा कामाच्या निमित्ताने बाहेर गेला आहे. मी सध्या घरात एकटा आहे आणि माझी प्रकृती चांगली नाही. आता जो काही निर्णय घ्यायचा आहे तो अरविंदने घ्यायचा आहे. अंजूने चूक केली नाही तर तो अपराध आहे आणि तो असा अपराध आहे ज्याला माफी नाही. मला माहीत आहे की ती माझ्याकडे येणारच नाही कारण मी तिच्याशी कुठलंही नातं ठेवलेलं नाही. आज तकशी बोलत असताना अंजूच्या वडिलांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
काय आहे प्रकरण?
राजस्थानमधील ३४ वर्षीय अंजू राफेल या मुलीने जुलै महिन्यात पाकिस्तानात पळून जाऊन तिच्या फेसबुकवरील मित्राशी लग्नगाठ बांधली होती. हे लग्न झाल्यानंतर अंजू चर्चेत आली होती. इंटरनेटवर दोघांच्याही प्रेमकथेबद्दल चवीने चर्चा झाली. मात्र अवघ्या काही महिन्यातच अंजू भारतात परतली आहे. लाईव्ह

मी खूश आहे, मला यापेक्षा अधिक काही बोलायचे नाही

हिंदुस्तान या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, अंजू वाघा बॉर्डरवरून भारतात आली. तिथे सीमा सुरक्षा दलाच्या चौकीत तिची चौकशी करण्यात आली. त्यानंतर पुढीच चौकशीसाठी तिला दिल्ली येथे नेण्यात आले. बुधवारी भारतात आल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधिंनी तिला याबाबत प्रश्न विचारला. “मी खूश आहे, मला यापेक्षा अधिक काही बोलायचे नाही”, अशी प्रतिक्रिया अंजूने दिली.

फेसबुक फ्रेंडला भेटण्यासाठी गेली पाकिस्तानला

अंजूने जुलै महिन्यात पाकिस्तानच्या व्हिसाच्या आधारे वाघा बॉर्डर-अटारी बॉर्डर येथून पाकिस्तानात प्रवेश केला होता. तिचा फेसबुकवरील मित्र आणि खैबर जिल्ह्यातील रहिवासी नसरुल्लाह (वय २९) याला भेटण्यासाठी ती पाकिस्तानात गेली होती. तिथे गेल्यानंतर तिने नसरुल्लाहशी लग्न करत इस्लाम धर्म स्वीकारला आणि फातिमा नाव धारण केले, असे सांगितले जात होते.

Web Title: Doors of fathers house were closed for anju who came from pakistan with a black face he got angry on hearing name of girl and said nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2023 | 05:27 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.