भोपाळ : अवघ्या तीन वर्षाच्या चिमुकलीसोबत स्कूलबसमध्ये अत्याचरा झाल्याती धक्कादायक घटना भोपाळमधून उघडकीस आली आहे. येथील एका नामांकित खासगी शाळेतील स्कूलबसमध्ये हा प्रकार झाल्याच उघडकीस आल्यानं शहरात एकच खळबळ उडाली आहे.
[read_also content=”कामाची बातमी! घराचा, वाहनाचा हप्ता महागणार? आरबीआय रेपो रेट वाढवण्याची शक्यता https://www.navarashtra.com/business/rbi-will-be-increase-repo-rate-this-month-325462.html”]
चिमुकली घरी आल्यावर तिचा बदलेला ड्रेस पाहून तिच्या पालकांना शंका आली. याबद्दल विचारताच मुलीनं स्कूलबसमधला प्रकार सांगितला. ‘ड्रायव्हर काका मला वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्श करतात आणि त्यांनी माझा ड्रेस बदललाय.’ असं तिनं तिच्या आईला सांगितलं. यानंतर कुटुंबीयांनी दुसऱ्या दिवशी शाळा व्यवस्थापनाकडे तक्रार दाखल केली. दरम्यान, कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर रातीबाद पोलीस ठाण्यात आरोपी चालक आणि एका महिलेविरुद्ध बलात्कार आणि पोक्सो कायद्यान्वये (POCSO Act) गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही अटक केली आहे. तर, शाळा व्यवस्थापनानं बसमधील महिला मदतनीसला बोलावून चौकशी केली. पाणी पितान मुलीच्या टी-शर्टवर पाणी पडल्यामुळे तिचा टी-शर्ट बदलावा लागला, असं सांगितलं. या प्रकरणी पोलिस तपास करत असून सीसीटीव्ही तपासण्यात येणार आहे.
[read_also content=”विमानाच्या आकाराच्या Asteroid 22 RQ ची पृथ्वीच्या दिशेने वाटचाल https://www.navarashtra.com/world/asteroid-22-rq-coming-towards-earth-nrsr-325456.html”]