भारतासह तीन देशांमध्ये भूकंपाचे धक्के, उत्तराखंडमधील चमोली येथे तीव्रता 3.3
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत भारतासह इतर अनेक देशांत भूकंपाचे धक्के जाणवल्याचे पाहिला मिळत आहे. दोनच दिवसांपूर्वी अमेरिकेच्या अलास्का येथे मोठ्या तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्यानंतर शनिवारी (दि.19) पहाटेच्या सुमारास भारतासह मान्यमार, अफगाणिस्तान या तीन देशांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भारतात उत्तराखंडमधील चमोली येथे भूकंप झाला. त्याची तीव्रता 3.3 मोजण्यात आली.
राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या (एनसीएस) रिपोर्टनुसार, चमोलीत झालेला हा भूकंप 10 किलोमीटर खोलीवर झाला. दुसरीकडे, शनिवारी म्यानमारमध्ये 3.7 तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. ज्याची खोली 105 किलोमीटर होती. त्याच वेळी, अफगाणिस्तानात 4.2 तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपाने लोक घाबरले होते. शनिवारी पहाटे उत्तराखंडमधील चमोली भूकंपाची माहिती दिली. जिल्ह्यात 3.3 तीव्रतेचा भूकंप झाल्याचे सांगण्यात आले. हा भूकंप 10 किलोमीटर खोलीवर होता. यापूर्वी 8 जुलै रोजी उत्तराखंडमध्येही भूकंपाची नोंद झाली होती. उत्तरकाशी येथील या भूकंपाची तीव्रता ३.२ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली होती.
EQ of M: 4.0, On: 19/07/2025 02:11:14 IST, Lat: 36.28 N, Long: 71.26 E, Depth: 125 Km, Location: Afghanistan.
For more information Download the BhooKamp App https://t.co/5gCOtjdtw0 @DrJitendraSingh @OfficeOfDrJS @Ravi_MoES @Dr_Mishra1966 @ndmaindia pic.twitter.com/uU1jlt5q0f— National Center for Seismology (@NCS_Earthquake) July 18, 2025
दरम्यान, आता पुन्हा एकदा उत्तराखंड येथ भूकंप झाल्याची माहिती समोर आली आहे. अफगाणिस्तानात शनिवारी रात्री दोन भूकंपाचे धक्के जाणवले. पहिला भूकंप रात्री १:२६ जाणवला. त्याची तीव्रता ४.२ इतकी मोजण्यात आली. तर दुसरा भूकंप रात्री २:११ च्या सुमारास आला. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.० इतकी मोजण्यात आली. सलग दोन भूकंपांमुळे लोकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले.
म्यानमारमध्ये सलग दुसऱ्या दिवशी भूकंपाचे धक्के
शनिवारी पहाटे ३:२६ वाजता म्यानमारमध्ये भूकंपाचे धक्के आले. त्याची तीव्रता ३.७ इतकी मोजण्यात आली. त्याची खोली १०५ किलोमीटर होती. येथे सतत भूकंपाचे धक्के बसण्याचा हा दुसरा दिवस आहे. याच्या एक दिवस आधी, म्हणजे शुक्रवारी, म्यानमारमध्ये ४.८ रिश्टर स्केलचा भूकंप जाणवला. त्याची खोली ८० किलोमीटर होती.
EQ of M: 3.3, On: 19/07/2025 00:02:44 IST, Lat: 30.51 N, Long: 79.33 E, Depth: 10 Km, Location: Chamoli, Uttarakhand.
For more information Download the BhooKamp App https://t.co/5gCOtjdtw0 @DrJitendraSingh @OfficeOfDrJS @Ravi_MoES @Dr_Mishra1966 @ndmaindia pic.twitter.com/f5EM9Jy5iA— National Center for Seismology (@NCS_Earthquake) July 18, 2025