Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अर्थतज्ज्ञ आणि PM मोदींच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष विवेक देबरॉय यांचं निधन; नव्या संविधानाच्या मागणीमुळे होते चर्चेत

अर्थतज्ज्ञ आणि पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार मंडळाचे अध्यक्ष विवेक देबरॉय यांचं शुक्रवारी सकाळी दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते. गुरुवारी रात्री एम्समध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं.

  • By संदीप गावडे
Updated On: Nov 01, 2024 | 05:40 PM
अर्थतज्ज्ञ आणि PM मोदींच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष विवेक देबरॉय यांचं निधन

अर्थतज्ज्ञ आणि PM मोदींच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष विवेक देबरॉय यांचं निधन

Follow Us
Close
Follow Us:

प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आणि पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार मंडळाचे अध्यक्ष विवेक देबरॉय यांचं शुक्रवारी सकाळी दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते. गुरुवारी रात्री १० वाजता एम्सच्या आपत्कालीन विभागात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान शुक्रवारी ७ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. पंतप्रदान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे.

Dr. Bibek Debroy Ji was a towering scholar, well-versed in diverse domains like economics, history, culture, politics, spirituality and more. Through his works, he left an indelible mark on India’s intellectual landscape. Beyond his contributions to public policy, he enjoyed… pic.twitter.com/E3DETgajLr

— Narendra Modi (@narendramodi) November 1, 2024

विवेक देबरोय यांनी भारतीय आर्थिक निती ठरवण्यात महत्त्वाची भूमिका होती. नरेंद्र मोदी म्हणाले की, ”देबरॉय, एक विद्वान होते. अर्थशास्त्र, इतिहास, संस्कृती, राजकारण, आध्यात्मिकता आणि इतर विविध क्षेत्रांमध्ये प्रवीण होते. त्यांच्या कार्यांमुळे त्यांनी भारताच्या बौद्धिक क्षेत्रात एक वेगळा ठसा सोडला आहे. सार्वजनिक धोरणातील त्यांच्या योगदानांबरोबरच, त्यांना प्राचीन ग्रंथांवर काम करणं आवडत असे”, असं त्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा-डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती एका महिन्यात झाली दुप्पट ! भारतामध्येही केली आहे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक

१४ ऑगस्ट रोजी मिंट वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या आपल्या लेखात देबरोय यांनी भारतासाठी नवीन संविधानाची मागणी केली होती.  विद्यमान संविधानाचा आधार १९३५ च्या भारत सरकार अधिनियमावर आहे आणि २०४७ साठी नवीन संविधानाची आवश्यकता आहे, असा दावा त्यांनी केला होता. त्यांचा हा दावा मोठा चर्चांचा विषय बनला.

देबरोय २०१७ च्या सप्टेंबरपासून EAC चे अध्यक्ष होते. त्यांना २०१५ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. देबरोय यांनी रामकृष्ण मिशन स्कूल, नरेंद्रपूर आणि प्रेसिडेंसी कॉलेज, कोलकाता यांमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ट्रिनिटी कॉलेज, कॅम्ब्रिज येथे शिक्षण घेतले.

हेही वाचा-भारत-चीन ‘LAC’ करार: सैन्य माघारी घेण्याची प्रक्रिया सुरू होताच भारतीय लष्कराने उचलले ‘हे’ मोठे पाऊल

त्यांनी प्रेसिडेंसी कॉलेज, कोलकाता (१९७९-८३), गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, पुणे (१९८३-८७), आणि भारतीय विदेश व्यापार संस्थान, दिल्ली (१९८७-९३) येथे काम केले. त्यानंतर त्यांनी वित्त मंत्रालय/UNDP प्रकल्पाच्या कायदा सुधारणा (१९९३-९८) येथे संचालक म्हणून काम केले, त्यानंतर आर्थिक व्यवहार विभाग (१९९४-९५), राष्ट्रीय लागू आर्थिक संशोधन परिषद (१९९५-९६), राजीव गांधी समकालीन अभ्यास संस्थान (१९९७-२००५), PHD चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (२००५-०६) आणि निती आयोगात (२००७-२०१५) काम केले आहे.

Web Title: Economist dr bibek debroy passed was part of pm modi core team demanded a new constitution

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2024 | 05:36 PM

Topics:  

  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी
1

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी

सी पी राधाकृष्णन यांनी केला उपराष्ट्रपती पदाचा उमेदवारी अर्ज दाखल; PM मोदी बनले प्रस्तावक
2

सी पी राधाकृष्णन यांनी केला उपराष्ट्रपती पदाचा उमेदवारी अर्ज दाखल; PM मोदी बनले प्रस्तावक

Online Gaming Bill: ऑनलाइन सट्टेबाजीवर केंद्र सरकारचा मोठा प्रहार! ‘या’ नवीन कायद्यामुळे खेळाडू आणि सेलिब्रेटींनाही बसेल चाप
3

Online Gaming Bill: ऑनलाइन सट्टेबाजीवर केंद्र सरकारचा मोठा प्रहार! ‘या’ नवीन कायद्यामुळे खेळाडू आणि सेलिब्रेटींनाही बसेल चाप

नरेंद्र मोदींना नाही राहिले नेहरुंचे स्मरण; म्हणून शरद पवारांना नाही भावले पंतप्रधानांचे भाषण
4

नरेंद्र मोदींना नाही राहिले नेहरुंचे स्मरण; म्हणून शरद पवारांना नाही भावले पंतप्रधानांचे भाषण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.