अमेरिकेत 5 डिसेंबरला राष्ट्राध्यक्ष पदासाठी मतदान होणार असल्याने सध्या निवडणूकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. रिपब्लिकन पक्षाकडून माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तर डेमोक्रेटिक पक्षाकडून उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. डोनाल्ड ट्रम्प हे जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. त्यामुळे त्यांच्या संपत्तीबद्दल नेहमीच चर्चा केली जात असते. जाणून घेऊया त्यांच्यासंपत्ती विषयी.
डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती
फोर्ब्सनुसार डोनाल्ड ट्रम्प यांची सध्या एकूण संपत्ती 8 अब्ज डॉलर आहे. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात म्हणजे ऑक्टोबर 2024 मध्ये त्यांची संपत्ती दुप्पट झाली. ऑक्टोबरच्या सुरुवातीला त्यांची संपत्ती ही 4 अब्ज डॉलर इतकी होती. मात्र ऑक्टोबर 29 मध्ये त्यांची संपत्ती ही 8 अब्ज डॉलर झाली. फोर्ब्सच्या रिअल-टाइम अब्जाधीश ट्रॅकरनुसार माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीमंध्ये 357 व्या क्रमांकावर आहेत. ट्रम्प यांच्या संपत्तीत ही वाढ मुख्यत: मीडिया कंपनी ट्रम्प मीडिया अँड टेक्नॉलॉजी ग्रुप (टीएमटीजी) च्या शेअर्समध्ये झालेलया जबरदस्त वाढीमुळे झाली आहे.
ट्रम्प यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’ ची मूळ कंपनी असलेल्या ट्रम्प मीडियाचे शेअर्स हे मंगळवारी जवळपास 9 टक्क्यांनी वाढले आणि 51.51 अमेरिकन डॉलरवर बंद झाले. सोमवारी या शेअर्समध्ये 21.6% चा नफा नोंदवला गेला होता. TMTG चे बाजारमूल्य 10 बिलियन डॉलर पेक्षा जास्त आहे, जे जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतीपैकी एक असणाऱ्या एलोन मस्कच्या कंपनी X च्या बरोबरीचे आहे. ऑक्टोबरमध्ये ट्रम्प यांची संपत्ती दुप्पट झाली, तर ट्रम्प मीडियाच्या शेअरची किंमत ही ऑक्टोबरच्या सुरुवातीला 16.16 डॉलर होती. आता 51.51 डॉलर असून यामध्ये तिप्पट वाढ झाली आहे. न्यूयॉर्क टाईम्सच्या रिपोर्ट्नुसार डॉनाल्ड ट्रम्प यांना त्याच्या वडिलांकडून तब्बल 413 दशलक्ष डॉलरची संपत्ती वारसाहक्काने मिळाली आहे.
ट्रम्प यांची भारतात गुंतवणूक
डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही वर्षात भारतात मोठ्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केली आहे. देशात त्याच्या ब्रँडचे रिअल इस्टेट प्रकल्प वेगाने विस्तारत आहेत. आत्तापर्यंत त्यांच्या रिअल इस्टेट कंपनीने भारतात दोन ट्रम्प टॉवर पूर्ण केले आहेत. जे पुणे आणि मुंबई येथे आहेत. दरम्यान दोन ट्रम्प टॉवरचे बांधकाम गुरुग्राम आणि कोलकाता येथे सुरू आहे. मीडिया रिपोर्ट्नुसार आणखी किमान चार टॉवर उभारण्याचे कंपनीने नियोजन केले आहे. भारत ही भविष्यात ट्रम्प ब्रँडसाठी सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ बनणार आहे. ट्रिबेका डेव्हलपर्स हे भारतातील ट्रम्प ब्रँडचे विशेष परवानाधारक आहेत. यांनी यापूर्वी मॅक्रोटेक डेव्हलपर्स आणि पंचशील रियल्टी यांना ट्रम्प टॉवर्सच्या विकासाचे कंत्राट दिले होते. परंतु आता, ट्रिबेका पुढील सर्व ट्रम्प टॉवर प्रकल्प स्वतंत्रपणे व्यवस्थापित करण्याची आणि तयार करण्याची योजना आखली आहे.