Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ED Raid: अबब! ED कडून गेल्या वर्षभरात इतक्या कोटी रुपयांची जप्त; आकडा पाहून व्हाल थक्क…

ED Raid News: ईडीने गेल्या आर्थिक वर्षात ८१,४२२ कोटींची मालमत्ता जप्त केली असून ९४% कनविक्शन रेट गाठला आहे. गुन्हेगारांकडून जप्त केलेले ६३,१४२ कोटी रुपये पीडितांना परत करण्यात आले आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 01, 2026 | 06:20 PM
ED कडून गेल्या वर्षभरात इतक्या कोटी रुपयांची जप्त (Photo Credit-AI)

ED कडून गेल्या वर्षभरात इतक्या कोटी रुपयांची जप्त (Photo Credit-AI)

Follow Us
Follow Us:

  • अबब!
  • ED कडून गेल्या वर्षभरात इतक्या कोटी रुपयांची जप्त
  • आकडा पाहून व्हाल थक्क…
Enforcement Directorate: अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) ७० व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात संचालकांनी एजन्सीच्या यशाचा लेखाजोखा मांडला. यावेळी संचालक राहुल नवीन यांनी माहिती दिली की, गेल्या एका वर्षात ईडीने भ्रष्टाचार आणि मनी लॉन्ड्रिंग विरोधात कठोर कारवाई (ED Raid) करत तब्बल ८१,४२२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. हा आकडा मागील वर्षाच्या तुलनेत १७० टक्क्यांनी अधिक आहे.

बदलत्या गुन्हेगारी स्वरूपाचे मोठे आव्हान

स्थापना दिनाच्या कार्यक्रमाला केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी, महसूल सचिव अरविंद श्रीवास्तव आणि अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एसव्ही राजू यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना राहुल नवीन म्हणाले की, “देशातील आर्थिक गुन्ह्यांचे स्वरूप आता वेगाने बदलत आहे. पूर्वी आमचे लक्ष बँक फ्रॉड आणि रिअल इस्टेट घोटाळ्यांवर असायचे; मात्र आता क्रिप्टोकरन्सी फ्रॉड, सायबर गुन्हे, टेरर फंडिंग आणि ड्रग्स तस्करी ही मोठी आव्हाने आमच्यासमोर आहेत.”

तपासाचा वेग दुप्पट; ९४% प्रकरणांत यश

ईडीच्या कामगिरीवर प्रकाश टाकताना संचालकांनी सांगितले की, आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये PMLA अंतर्गत ८१२ आरोपपत्रे (Charge Sheets) दाखल करण्यात आली, जी गेल्या वर्षाच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहेत. ईडीचा कनविक्शन रेट (दोषसिद्धीचे प्रमाण) सध्या ९४ टक्के इतका असून, न्यायालयात प्रलंबित असलेल्या २४०० हून अधिक प्रकरणांमध्ये आरोपींना कठोर शिक्षा होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. गेल्या दोन वर्षांत एजन्सीने आपल्या एकूण प्रकरणांपैकी ४१ टक्के गुन्हे नोंदवले आहेत, जे तपासाचा वाढलेला वेग दर्शवते.

Ashok Kharat Case : ‘अशोक खरात तू तो गियो’ ED च्या एन्ट्रीनंतर आता मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल

गुन्हेगारांची मालमत्ता जप्त करून पीडितांना दिलासा

केवळ शिक्षा देणे हे ईडीचे उद्दिष्ट नसून, गुन्ह्यातून कमावलेला पैसा जप्त करणे हे देखील महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत ईडीने एकूण २.३६ लाख कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. २०१९ च्या कायद्यातील बदलानंतर, फसवणूक झालेल्या सामान्य गुंतवणूकदारांना पैसे परत मिळवून देणे सोपे झाले आहे. या अंतर्गत आतापर्यंत बँका, गुंतवणूकदार आणि घरखरेदीदारांना ६३,१४२ कोटी रुपये परत करण्यात आले आहेत. यामध्ये पीएसीएल (PACL) आणि उदयपूर रिअल इस्टेट प्रकरणातील पीडितांचा समावेश आहे.

२१ जण ‘भगोडा आर्थिक अपराधी’ घोषित

भगोडा आर्थिक अपराधी कायद्यांतर्गत (FEOA) ३१ मार्च २०२६ पर्यंत ५४ जणांविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे. यापैकी २१ जणांना न्यायालयाने भगोडा आर्थिक अपराधी घोषित केले असून, या कायद्यांतर्गत २,१७८ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

जागतिक स्तरावर भारताचे वाढते महत्त्व

आर्थिक गुन्ह्यांविरुद्धच्या जागतिक लढाईत भारत आता महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. भारत सध्या ‘एशिया-पॅसिफिक अॅसेट रिकव्हरी नेटवर्क’च्या स्टिअरिंग ग्रुपचे अध्यक्षपद भूषवत असून, २०२६ मध्ये होणाऱ्या या नेटवर्कच्या वार्षिक बैठकीचे यजमानपद भारताकडे असेल, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

Nashik Crime: इगतपुरीतील बनावट कॉल सेंटर प्रकरणात ईडीची एन्ट्री! मनी लाँड्रिंगचा तपास; चार वरिष्ठ पोलीस आणि बँक अधिकारी रडारव

Web Title: Ed 70th anniversary rs 81000 crore assets attached conviction rate 94 percent

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 06:20 PM

Topics:  

  • Central Governement
  • Enforcement Directorate

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.