Chaitanya Baghel Arrested: छत्तीसगडमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या मुलाला ईडीने अटक केली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यानी ही मोठी कारवाई केली आहे. आज सकाळीच ईडीचे अधिकारी भूपेश बघेल यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. ईडीच्या अधिकाऱ्यानी भूपेंद्र बघेल यांच्या घरी छापेमारी सुरु केली. त्यानंतर ईडीने भूपेश बघेल यांचा मुलगा चैतन्य बघेल याला अटक केली आहे. त्यामुळे छत्तीसगडमध्ये एकच चर्चा सुरु झाली आहे.
छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या मुलाला कथित दारू घोटाळ्याप्रकरणी झाल्याचे समजते आहे. झारखंड विधानसभेच्या अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. आजच्या सत्रात तमनारमध्ये कापल्या जाणाऱ्या झाडांचा मुद्दा उपस्थित होणार होता. दरम्यान चैतन्य बघेल यांना अटक झाल्यावर काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. कार्यकर्त्यांनी ईडीच्या वाहनांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना दार केले.
VIDEO | Bhilai, Chhattisgarh: Congress workers clash with police personnel and try to stop ED vehicles after Chaitanya Baghel, son of former CM Bhupesh Baghel, was taken into custody by the Enforcement Directorate.
The Enforcement Directorate (ED) conducted fresh searches at the… pic.twitter.com/beb7Eq7Pnq
— Press Trust of India (@PTI_News) July 18, 2025
कथित दारू घोटाळ्याप्रकरणी मनी लॉन्ड्रींग प्रकरणी माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा मुलगा चैतन्य बघेलला अटक करण्यात आली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यानी बघेल यांच्या निवासस्थानी २१०० कोटी रुपयांच्या कथित दारू घोटाळ्याप्रकरणी छापेमारी केली. या प्रकरणात चैतन्य बघेल यांची सहभाग असल्याचे काही पुरावे समोर आले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
काय म्हणाले माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल?
विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्रास देण्यासाठी केंद्र सरकार आपल्या यंत्रणांचा चुकीचा वापर करत आहे. आम्ही घाबरणार नाही. आम्ही सत्याची लढाई लढत राहू.
ईडीचे म्हणणे काय?
भूपेश बघेल छत्तीसगडचे मुख्यमंत्री असताना सरकारी दुकानांच्या माध्यमातून दारू विक्रीसाठी बनावट होलोग्राम तथा बॉट्लसचा वापर करण्यात आला होता. यामुळं राज्याच्या सरकारी तिजोरीला मोठे नुकसान झाले असे ईडीचे म्हणणे आहे.
रॉबर्ट वाड्रांविरोधात आरोपपत्र दाखल, ईडीकडून १८ तास चौकशी
काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वड्रा यांचे पती आणि उद्योगपती रॉबर्ट वड्रा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. हरियाणातील शिकोहपूर येथील जमीन व्यवहाराशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) वड्रा यांच्याविरोधत आरोपपत्र दाखल केलं आहे. त्यांच्यासोबतच इतर अनेक लोक आणि कंपन्यांची नावेही त्यात समाविष्ट आहेत. हे प्रकरण सप्टेंबर २०१८ चे आहे, जेव्हा रॉबर्ट वड्रा, हरियाणाचे तत्कालीन मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुडा, रिअल इस्टेट कंपनी डीएलएफ आणि एका प्रॉपर्टी डीलरविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. एफआयआरमध्ये भ्रष्टाचार, बनावटगिरी आणि फसवणूकीचे आरोप करण्यात आले आहेत.