Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ED Raid on Bhupesh Baghel House: छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या घरावर ईडीची छापेमारी

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या कार्यकाळात २००० कोटींपेक्षा जास्त रकमेचा दारू घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप ईडीने केला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 10, 2025 | 12:23 PM
ED Raid on Bhupesh Baghel House: छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या घरावर ईडीची छापेमारी
Follow Us
Close
Follow Us:

छत्तीसगड:  छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस भूपेश बघेल यांच्या घरावर सकाळी ईडीने छापा टाकला. कथित दारू घोटाळा, कोळसा कर आणि महादेव सट्टा अॅपशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी ईडीच्या पथकाने छत्तीसगडमधील १४ ठिकाणी छापे टाकले, ज्यामध्ये भिलाई येथील बघेल यांच्या निवासस्थानाचाही समावेश आहे. याशिवाय भूपेश बघेल यांचा मुलगा चैतन्य बघेल याच्या संशयित ठिकाणीही छापे टाकण्यात आले आहेत.

ईडीची तपासणी आणि पोलिस बंदोबस्त

चार वाहनांमधून आलेल्या ईडीच्या पथकाने घरातील कागदपत्रे आणि अन्य महत्त्वाच्या दस्तऐवजांची तपासणी केली. छाप्यादरम्यान घराबाहेर कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, काँग्रेस कार्यकर्त्यांनी या कारवाईचा तीव्र निषेध नोंदवला. भूपेश बघेल यांच्या निवासस्थानासोबतच भिलाईतील नेहरूनगर येथील मनोज राजपूत, चारोडा येथील अभिषेक ठाकूर आणि संदीप सिंग, दुर्ग येथील कमल अग्रवाल यांच्या किशोर राईस मिल, सुनील अग्रवाल यांच्या सहेली ज्वेलर्स आणि बिल्डर अजय चौहान यांच्या घरांवरही छापेमारी करण्यात आली.

Congress-Shivsena Politics: काँग्रेसला पुन्हा धक्का! धंगेकरांपाठोपाठ आणखी एक बडा नेता शिंदे शिवसेनेच्या गळाला

भूपेश बघेल यांची प्रतिक्रिया – ‘खोटा खटला’

ईडीच्या कारवाईनंतर भूपेश बघेल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी लिहिले, “सात वर्षांपासून सुरू असलेला खोटा खटला न्यायालयाने फेटाळल्यानंतर आता ईडीच्या पथकाने माझ्या घरावर छापा टाकला आहे.”तसेच, “जर कोणी या कटाद्वारे पंजाबमध्ये काँग्रेसला रोखण्याचा प्रयत्न करत असेल, तर तो मोठा गैरसमज आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

राजकीय संघर्ष तीव्र – पुढील काय?

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईडीची कारवाई आणि काँग्रेसचा विरोध यामुळे छत्तीसगडमधील राजकीय वातावरण तापले आहे. भूपेश बघेल यांना या छाप्यांमुळे अडचणीत आणण्याचा प्रयत्न आहे का? आणि याचा काँग्रेसच्या निवडणुकीच्या रणनीतीवर काय परिणाम होईल? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या कार्यकाळात २००० कोटींपेक्षा जास्त रकमेचा दारू घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप ईडीने केला आहे. या घोटाळ्यात आयएएस अधिकारी अनिल तुतेजा, उत्पादन शुल्क विभागाचे एमडी एपी त्रिपाठी आणि उद्योगपती अन्वर ढेबर यांचा समावेश असल्याचे ईडीने स्पष्ट केले आहे.

Oscar नाही पण IIFA २०२५ मध्ये Laapataa Ladies ने मिळवले स्थान, जाणून घ्या कोणत्या चित्रपटाला मिळाले

ईडीच्या आरोपांनुसार तीन प्रकारे घोटाळा

ईडीच्या तपासानुसार, दारू घोटाळा तीन वेगवेगळ्या मार्गांनी करण्यात आला:

1. डिस्टिलरी चालकांकडून मोठ्या प्रमाणात कमिशन वसूल

  • प्रत्येक दारूच्या केसवर ७५ ते १०० रुपये कमिशन घेतले जात होते.
  • दारूच्या किमती कृत्रिमरित्या वाढवून आणि जास्त बिलिंगवर सूट देऊन डिस्टिलरी चालकांना मोठ्या तोट्यापासून वाचवण्यात आले.
2. सरकारी दुकानांतून बनावट होलोग्राम असलेली दारू विक्री
  • बनावट होलोग्रामसाठी विधू गुप्ता यांच्याशी संपर्क साधण्यात आला.
  • अरविंद सिंग आणि अमित सिंग यांच्या मार्फत बनावट होलोग्राम असलेल्या रिकाम्या दारूच्या बाटल्या आणि दारूची वाहतूक केली जात होती.
  • १५ जिल्ह्यांमध्ये हा व्यवसाय सुरू होता आणि तब्बल ४० लाखांहून अधिक बनावट दारूच्या काड्या विकल्या गेल्या.
  • या प्रकरणात सरकारी दुकानांचे कर्मचारी आणि उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचा आरोप आहे.
3. डिस्टिलरींच्या पुरवठा क्षेत्रात फेरफार करून बेकायदेशीर वसुली
  • छत्तीसगडमध्ये ८ झोनमध्ये विभागलेल्या पुरवठा क्षेत्रात दरवर्षी मोठ्या प्रमाणात कमिशनच्या माध्यमातून घोटाळा करण्यात आला.
  • या घोटाळ्यातून ५२ कोटी रुपयांची बेकायदेशीर कमाई झाल्याचा दावा ईडीने केला आहे.

Web Title: Ed raids former chhattisgarh chief minister bhupesh baghels house nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2025 | 12:00 PM

Topics:  

  • Bhupesh Baghel

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.