Photo Credit- Social Media धंगेकरांपाठोपाठ आणखी एक बडा नेता शिंदे शिवसेनेच्या गळाला
पुणे: पुण्यातील कसबा पेठचे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर, आता काँग्रेसमधील आणखी एक बडा नेता भाऊराव पाटील गोरेगावकर हेही शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. ते हजारो कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. या पक्षांतरामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा आहे. आधीच महायुती आणि महाआघाडी यांच्यात राजकीय कुरघोड्या सुरू असताना, काँग्रेसला लागलेली गळती पक्षासाठी अडचणीची ठरणार आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही आघाड्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महायुतीमध्ये काँग्रेस आणि इतर पक्षातील नेत्यांना समाविष्ट करून पक्ष वाढवण्याची रणनीती दिसत आहे. तर काँग्रेसकडेही पक्षातील गळती रोखण्याचे मोठे आव्हान आहे. रविंद्र धंगेकर यांच्यानंतर भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या पक्षत्यागाने काँग्रेसची आणखी अडचण वाढली असून, यानंतरही काँग्रेसमधून आणखी मोठे राजकीय फेरबदल होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्याने बंडखोरी करणारे भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी अखेर काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी निवडणुकांसाठी जोरदार तयारी करत ते हजारो समर्थकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती आणि लक्षावधी मते घेतली होती. मात्र, पराभवानंतर त्यांनी भविष्यातील राजकीय वाटचालीसाठी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
Dream Science: स्वप्नात स्वतःला होळी खेळताना पाहणे शुभ की अशुभ
महायुती आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस व इतर पक्षातील बंडखोर नेत्यांना आपल्या गटात सामील करून घेत मजबूत होत आहे. रविंद्र धंगेकर यांच्यानंतर आता भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या जाण्याने काँग्रेससाठी आणखी अडचण निर्माण होणार आहे. यामुळे काँग्रेसमधून आणखी नेते बाहेर पडणार का? आणि आगामी निवडणुकीत याचा किती मोठा परिणाम होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर लवकरच काँग्रेसला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते पक्षात नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. अखेर त्यांनी आज माध्यमांसमोर येत काँग्रेसमधून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले. तसेच आज सायंकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आपला अधिकृत निर्णय जाहीर करतील असेही त्यांनी स्पष्ट केले.