(फोटो सौजन्य - एक्स अकाउंट)
जयपूरमध्ये झालेल्या आयफा अवॉर्ड्स २०२५ मध्ये बॉलिवूड स्टार्सची गर्दी पाहायला मिळाली. या निमित्ताने किरण राव यांच्या ‘लापता लेडीज’ या चित्रपटाने मोठा विजय मिळवला आहे. अतिशय कमी बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा किताब मिळाला आहे. तर चित्रपटातील अभिनेत्री नितांशी गोयल हिने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा किताब जिंकला आहे. एकूणच, ‘लापता लेडीज’ला ९ पुरस्कार मिळाले आहेत. याशिवाय, बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.
लेकीच्या प्रेग्नेंसीबद्दल सुनील शेट्टीचं महत्वाचं विधान, काय म्हणाला अभिनेता ?
कोणत्या चित्रपटाला किती पुरस्कार मिळाले?
‘लापता लेडीज’ हा चित्रपट २०२५ च्या ऑस्करसाठीही गेला होता पण त्याला नामांकन मिळू शकले नाही. आता या चित्रपटाने आयफा अवॉर्ड्समध्ये मोठे यश मिळवले आहे. या चित्रपटाला वेगवेगळ्या श्रेणींमध्ये अनेक पुरस्कार मिळाले आहेत. याशिवाय कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया ३’ या चित्रपटाला तीन पुरस्कार मिळाले आहेत. ‘आर्टिकल ३७०’ ला २ आणि ‘किल’ ला तीन पुरस्कार मिळाले आहेत.
‘लापता लेडीज’ने पटकावले एवढे पुरस्कार
सर्वोत्कृष्ट मुख्य अभिनेत्री – नितांशी गोयल (लापता लेडीज)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – किरण राव (लापता लेडीज)
सर्वोत्कृष्ट चित्रपट – (लापता लेडीज)
सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री – प्रतिभा रांता (लापता लेडीज)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक भूमिका – रवी किशन – (लापता लेडीज)
सर्वोत्कृष्ट कथा – बिप्लब गोस्वामी (लापता लेडीज)
सर्वोत्कृष्ट गीत – प्रशांत पांडे (लापता लेडीज ‘सजनी’)
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक – राम संपत (लापता लेडीज)
सर्वोत्कृष्ट पटकथा – स्नेहा देसाई – (लापता लेडीज)
‘अगं दिआ, थोडी तरी कर दया…’ दरवेळी इतके गोंडस दिसणे गरजेचे आहे का?
इतर चित्रपटांना मिळालेले पुरस्कार
कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया ३’ या चित्रपटासाठी श्रेया घोषाल (अमी जे तोमर ३.०) ला सर्वोत्कृष्ट गायिका महिला पुरस्कार मिळाला आहे. रेड चिलीज व्हीएफएक्सला सर्वोत्कृष्ट व्हीएफएक्सचा पुरस्कार मिळाला आहे. ‘किल’ चित्रपटासाठी लक्ष्य लालवाणीला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा (पुरुष) पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट ध्वनी डिझाइन पुरस्कार सुभाष साहू, बोलॉय कुमार दोलाई, राहुल कर्पे यांना देण्यात आला आणि सर्वोत्कृष्ट छायांकन पुरस्कार रफी महमूद यांना देण्यात आला आहे.