Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

…अखेर अरविंद केजरीवाल यांना अटक; मद्य घोटाळ्याप्रकरणी अनेक तासांच्या चौकशीनंतर ईडीची मोठी कारवाई

  • By युवराज भगत
Updated On: Mar 21, 2024 | 09:34 PM
'अरविंद केजरीवाल यांची सीबीआयने केलेली अटक योग्य'; कोर्टाने फेटाळली जामीन याचिका

'अरविंद केजरीवाल यांची सीबीआयने केलेली अटक योग्य'; कोर्टाने फेटाळली जामीन याचिका

Follow Us
Close
Follow Us:

ED Team Reaches Arvind Kejriwal’s House : अखेर ईडीचे पथक दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी पोहचल्यानंतर अनेक तासांच्या चौकशीनंतर ईडीने त्यांना अटक केली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कारवाईपासून संरक्षण देण्यास नकार दिल्यानंतर ईडीचे पथक चौकशीसाठी केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यानंतर दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी ईडीचे पथक मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचले. यानंतर त्यांच्या चौकशीनंतर अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे.

कारवाईपासून दिलासा देण्यास नकार

आज दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना कारवाईपासून दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर लगेचच ईडीचे पथक चौकशीसाठी हजर झाले आहे. यानंतर ‘आप’चे नेते सौरभ भारद्वाज यांनी ईडीच्या पथकाला घरात येण्यापासून रोखले. मात्र, दिल्ली पोलिसांनी घराचा ताबा घेतला असून, तिथे कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. दरम्यान, ‘आप’च्या काही नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली आहे. आज रात्रीच या प्रकरणी सुनावणी घेऊन केजरीवाल यांची संभाव्य अटक टाळण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

‘आप’च्या नेत्यांची सर्वोच्च न्यायालयात धाव
ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ते केजरीवाल यांना समन्स बजावण्यासाठी निवासस्थानी आले आहेत. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ईडीच्या पथकाकडे छापेमारी करण्यासाठीचे वॉरंट असून त्यांनी निवासस्थानाची तपासणी सुरू केली आहे. केजरीवाल यांची चौकशी सुरू केली जाऊ शकते, असेही सांगण्यात येत आहे. मागच्यावर्षीपासून आतापर्यंत ईडीकडून केजरीवाल यांना नऊ वेळा समन्स बजावण्यात आलेले आहे. मात्र केजरीवाल यांनी एकदाही समन्सला उत्तर दिले नाही.

केजरीवाल यांच्या निवासस्थानी छापेमारी

सौरभ भारद्वाज माध्यमांना माहिती देताना म्हणाले की, केजरीवाल यांच्या निवासस्थानी छापेमारी सुरू असल्याचे दिसते. आम्हाला कुणालाही आतमध्ये जाऊ दिले जात नाही. कदाचित मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक करण्याची तयारी सुरू आहे.

लोकप्रिय मुख्यमंत्र्याला अटक करण्याचा प्रयत्न

‘आप’च्या नेत्या आणि मंत्री अतिशी यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, “दिल्लीची जनता केजरीवाल यांना आपला भाऊ, मुलगा समजते. त्यांनी दिल्लीकरांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला. यामुळेच पंतप्रधान मोदी केजरीवाल यांना घाबरतात. एका लोकप्रिय मुख्यमंत्र्याला अटक करण्याचा प्रयत्न कराल, तर असंख्य लोक त्यांच्या समर्थनार्थ पुढे येतील.”

केजरीवाल यांच्या निवासस्थानी ईडीचे ६ ते ८ अधिकारी पोहोचले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांनी आजच केजरीवाल यांना दहावे समन्स दिले आहे. याआधी नऊ समन्स देऊन झाले आहेत. तसेच अतिरिक्त पोलीस आयुक्त दर्जाचे अनेक पोलीस अधिकारीदेखील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. पीएमएलए कायद्याच्या कलम ५० अंतर्गत केजरीवाल यांची चौकशी केली जात असल्याचे सांगितले जाते.

Web Title: Ed team reaches arvind kejriwals house liquor scam investigation will be arrested today nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2024 | 09:11 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.