Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Letter to Sunita Williams: ‘तुम्ही दूर असलात तरी आमच्या हृदयाच्या जवळ..’; नरेंद्र मोदींचे सुनीता विल्यम्स यांना पत्र

अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांच्या लँडिंगसाठी हवामान अनुकूल राहणार आहे. नासा सतत परिस्थितीवर नजर ठेवून आहे. मंगळवारी (18 मार्च) भारतीय वेळेनुसार सकाळी 10:35 वाजता अंतराळयान ISSपासून वेगळे करण्यात आले आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 18, 2025 | 04:58 PM
PM Letter to Sunita Williams: ‘तुम्ही दूर असलात तरी आमच्या हृदयाच्या जवळ..’; नरेंद्र मोदींचे सुनीता विल्यम्स यांना पत्र
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली:  भारतीय अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांचे अंतराळयान आज पृथ्वीकडे रवाना झाले आहे. सुनीता विल्यम्स आणि तिचा साथीदार बुच विल्मोर यांचे अंतराळयान वेगाने पृथ्वीजवळ येत आहे. दोन्ही अंतराळवीर स्पेसएक्स क्रू कॅप्सूलमधून पृथ्वीवर परतत आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची ‘कन्या’ सुनीता विल्यम्स परतण्यापूर्वी त्यांना एक पत्र लिहिले आहे,  ते हजारो मैल दूर असले तरी ते अजूनही एकमेकांच्या हृदयाच्या जवळ आहेत. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी ट्विट केले की, ‘संपूर्ण जग सुनीता विल्यम्स यांच्या सुरक्षित परतीची आतुरतेने वाट पाहत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या या कन्येबद्दल चिंता व्यक्त केली आहे.’

सुनीता यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले

भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंतराळवीर माइक मॅसिमिनो यांच्यामार्फत प्रसिद्ध अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांना विशेष संदेश पाठवला आहे. “जरी तुम्ही हजारो मैल दूर असलात, तरी तुम्ही आमच्या हृदयाच्या अगदी जवळ आहात,” असे पंतप्रधान मोदींनी आपल्या पत्रात म्हटले आहे. या पत्रामध्ये १.४ अब्ज भारतीयांचे अभिमान आणि प्रेम व्यक्त करण्यात आले आहे.

सुनीता विल्यम्सला लागले पृथ्वीचे वेध! अंतराळातून जमिनीवर यायला

काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांची माइक मॅसिमिनो यांच्याशी भेट झाली. यावेळी त्यांनी विनंती केली की, भारत आणि त्यांच्या वतीने हे पत्र सुनीता विल्यम्स यांच्यापर्यंत पोहोचवावे. सुनीता विल्यम्स यांच्या सामर्थ्यासाठी आणि सुरक्षित परतीसाठी शुभेच्छा देत पंतप्रधान मोदींनी भारताच्या या “प्रतिभावान लेकीच्या” देशाशी असलेल्या दृढ नात्याची पुनःप्रचिती दिली. या संदेशाने भारावून जाऊन सुनीता विल्यम्स यांनीदेखील पंतप्रधान मोदी आणि संपूर्ण भारताबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

नासाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार,  अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांच्या लँडिंगसाठी हवामान अनुकूल राहणार आहे. नासा सतत परिस्थितीवर नजर ठेवून आहे. मंगळवारी (18 मार्च) भारतीय वेळेनुसार सकाळी 10:35 वाजता अंतराळयान ISSपासून वेगळे करण्यात आले आहे. म्हणजेच अनडॉक करण्यात आले आहे. पृथ्वीवर पोहचण्यासाठी या यानाला सुमारे 17 तास लागतील. पृथ्वीच्या वातावरण कक्षेत यान प्रवेश करण्यापूर्वी 19 मार्च रोजी पहाटे 02: 41 वाजता डीऑर्बिट बर्न प्रक्रिया करण्यात येईल. यानंतर यान हळहळू पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करेल. त्यानंतर 19 मार्च रोजी हे यान अमेरिकेच्या फ्लोरिडा किनाऱ्याजवळील समुद्रात लॅंड करेल. या अंतराळयानातून क्रू-9 चे अंतराळवीर नासाचे निक हेग, सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर आणि रशियन अंतराळ संस्था रोसकॉसमॉसचे अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह ड्रॅगन अंतराळयानातून पृथ्वीवर परत येणार आहेत.

NASA सुनीता विल्यम्स यांना किती पगार देतो? 9 महिन्यांच्या ओव्हरटाई

भारतीय वंशाच्या नासाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर पृथ्वीवर लवकरच परतणार आहेत. दोघेही गेल्या वर्षी 5 जून 2024 रोजी बोईंगच्या स्टारलाइन कॅप्सूलमधून आठ दिवसांच्या मोहीमेवर अंतराळ स्थानकावर गेले होते. मात्र, बोईंग अंतराळयानाच्या तांत्रिक बिघाडीमुळे त्यांचा हा आठ दिवसांचा प्रवास लांबवणीवर पडला. दोन्ही अंतराळवीरांना सुरक्षित पृथ्वीवर परत आणण्याची जबाबदारी स्पेसएक्सवर ट्रम्प यांनी सोपवली होती. अखेर 15 मार्च रोजी स्पेसएक्सचे फाल्कन 9 रॉकेट ISS वर जाण्यासाठी निघाले आणि 16 मार्च रोजी पोहोचले. आता हे स्पेस क्राफ्ट दोन्ही अंतराळवीर आणि क्र-9 च्या टीम मेंमबर्सला घेऊन परत येणार आहे.

As the whole world waits, with abated breath, for the safe return of Sunita Williams, this is how PM Sh @narendramodi expressed his concern for this daughter of India.
“Even though you are thousands of miles away, you remain close to our hearts,” says PM Sh Narendra Modi’s… pic.twitter.com/MpsEyxAOU9

— Dr Jitendra Singh (@DrJitendraSingh) March 18, 2025

Web Title: Even though you are far away you are close to our hearts narendra modis letter to sunita williams nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2025 | 04:45 PM

Topics:  

  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

पंतप्रधान मोदींकडून ‘RSS’ चं कौतुक! त्रास मात्र काँग्रेसला; खासदाराने संघाला दिली ‘तालिबान’ची उपमा
1

पंतप्रधान मोदींकडून ‘RSS’ चं कौतुक! त्रास मात्र काँग्रेसला; खासदाराने संघाला दिली ‘तालिबान’ची उपमा

Vice President Elections: उपराष्ट्रपतीपदासाठी भाजपची उद्या दिल्लीत खलबतं; ‘या’ नावांवर होणार चर्चा
2

Vice President Elections: उपराष्ट्रपतीपदासाठी भाजपची उद्या दिल्लीत खलबतं; ‘या’ नावांवर होणार चर्चा

Trump-Putin Alaska Meeting : पुतिन-ट्रम्प भेटीत भारतच ‘गुप्त घटक’? जाणून घ्या अलास्का चर्चेचं सत्य
3

Trump-Putin Alaska Meeting : पुतिन-ट्रम्प भेटीत भारतच ‘गुप्त घटक’? जाणून घ्या अलास्का चर्चेचं सत्य

Akhilesh Yadav: पंतप्रधान मोदींच्या ‘RSS’च्या कौतुकावर अखिलेश यादव यांचा पलटवार, ‘हा संघ तोंडाने स्वदेशी, पण मनाने परदेशी’
4

Akhilesh Yadav: पंतप्रधान मोदींच्या ‘RSS’च्या कौतुकावर अखिलेश यादव यांचा पलटवार, ‘हा संघ तोंडाने स्वदेशी, पण मनाने परदेशी’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.