सुनीता विल्यम्सला लागले पृथ्वीचे वेध! अंतराळातून जमिनीवर यायला लागणार नेमका किती वेळ? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नवी दिल्ली: भारतीय वंशाच्या नासाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर पृथ्वीवर लवकरच परतणार आहेत. दोघेही गेल्या वर्षी 5 जून 2024 रोजी बोईंगच्या स्टारलाइन कॅप्सूलमधून आठ दिवसांच्या मोहीमेवर अंतराळ स्थानकावर गेले होते. मात्र, बोईंग अंतराळयानाच्या तांत्रिक बिघाडीमुळे त्यांचा हा आठ दिवसांचा प्रवास लांबवणीवर पडला. दोन्ही अंतराळवीरांना सुरक्षित पृथ्वीवर परत आणण्याची जबाबदारी स्पेसएक्सवर ट्रम्प यांनी सोपवली होती. अखेर 15 मार्च रोजी स्पेसएक्सचे फाल्कन 9 रॉकेट ISS वर जाण्यासाठी निघाले आणि 16 मार्च रोजी पोहोचले. आता हे स्पेस क्राफ्ट दोन्ही अंतराळवीर आणि क्र-9 च्या टीम मेंमबर्सला घेऊन परत येणार आहे.
किती वेळात पृथ्वीवर परतणार सुनिता विल्यम्स?
मंगळवारी (18 मार्च) भारतीय वेळेनुसार सकाळी 10:35 वाजता अंतराळयान ISSपासून वेगळे करण्यात आले आहे. म्हणजेच अनडॉक करण्यात आले आहे. पृथ्वीवर पोहचण्यासाठी या यानाला सुमारे 17 तास लागतील. पृथ्वीच्या वातावरण कक्षेत यान प्रवेश करण्यापूर्वी 19 मार्च रोजी पहाटे 02: 41 वाजता डीऑर्बिट बर्न प्रक्रिया करण्यात येईल. यानंतर यान हळहळू पृथ्वीच्या वातावरणा प्रवेश करेल. त्यानंतर 19 मार्च रोजी हे यान अमेरिकेच्या फ्लोरिडा किनाऱ्याजवळील समुद्रात लॅंड करले. या अंतराळयानातून क्रू-9 चे अंतराळवीर नासाचे निक हेग, सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर आणि रशियन अंतराळ संस्था रोसकॉसमॉसचे अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह ड्रॅगन अंतराळयानातून पृथ्वीवर परत येणार आहेत.
लॅंडिग नंतरची प्रक्रिया
अंतराळयानाचे सुरक्षितपण लॅंडिंग झाल्यानंतर सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मार यांना नासाच्या जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये पाठवण्यात येईल. या ठिकाणी त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाईल.अंतराळात दिर्घकाळ राहिल्यामुळे अंतराळवीरांच्या हाडांची घसरण, स्नायूंमध्ये कमकुवतपणा येण्याची शक्यता आहे. यामुळेसंपूर्ण वैद्यकीय तपासणी या ठिकाणी करण्यात येईल. नासा या संपूर्ण मिशनचे थेट प्रक्षेपण करणार आहे. हे अंतराळप्रवासातील एक महत्त्वाचे यश मानले जात आहे.
ISS वर 280 दिवसांपासून अडकलेले होते अंतराळवीर
सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर जून 2024 मध्ये बोईंगच्या स्टारलाईनर स्पेसक्राफ्टमधून ISS वर गेले होते. त्यांचा हा प्रवास फक्त 8 दिवसांचा होता. मात्र, बोईंगच्या तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा प्रवास लांबला. स्टारलाईनरमध्ये हायड्रोजन गळती आणि थ्रस्टरच्या बिघडामुळे दोन्ही अंतराळवीरांना परत येण्यास विलंब झाला. नंतर सप्टेंबर 2024 मध्ये स्टारलाईनर रिकामे अवस्थेत पृथ्वीवर परत पाठवण्यात आले. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर ISS वरच राहिले.