Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! कांद्यावरची निर्याद बंदी रद्द

कांदा निर्यात बंदी केंद्र सरकारने उठवली आहे. 31 मार्च 2024 पर्यंत ही निर्यात बंदी लागू करण्यात आली होती. पण ही मुदत संपण्यापूर्वीच केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदीचा निर्णय हटवला आहे. त्यामुळे देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 18, 2024 | 03:35 PM
शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! कांद्यावरची निर्याद बंदी रद्द
Follow Us
Follow Us:

दिल्ली:  केंद्र सरकारने (Central Govt) शेतकऱ्यांच्या दृष्टीने मोठा निर्णय घेतला आहे. यापूर्वी लावण्यात आलेली कांद्यावरील निर्यात बंदी उठविण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली मंत्र्यांच्या समितीने कांद्याच्या निर्यातीला हिरवा झेंडा दाखवला आहे. देशातील कांद्याच्या किंमतींना लगाम घालण्यासाठी सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणली होती. 31 मार्च 2024 पर्यंत ही निर्यात बंदी लागू करण्यात आली होती. पण ही मुदत संपण्यापूर्वीच केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदीचा निर्णय हटवला आहे. त्यामुळे देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्रासह गुजरातमध्ये कांद्याचा मुबलक साठा उपलब्ध आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी हटवली आहे. केंद्र सरकारने 3 लाख मॅट्रिक टन कांदा निर्यातीला मंजूरी दिली आहे. तर बांगलादेशातून 50,000 टन कांद्याच्या निर्यातीला मंजुरी देण्यात आली. या निर्णयाचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना देशातील कांद्याचे उत्पादन आणि साठ्याविषयी माहिती दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व  मनसुख मांडविया या दोघांमधील चर्चेनंतर बंदी हटविण्याचा निर्णय घेण्यात आला.

40 टक्के निर्यात शुल्क

जगात भारत हा काद्यांच्या मोठा निर्यातकांपैकी एक आहे. देशातंर्गत स्वस्तात कांदा मिळावा यासाठी कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच 40 टक्के निर्यात शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. बफर स्टॉकमधून 25 रुपये प्रति किलो दराने कांदा विक्रीचा निर्णय घ्यावा लागला होता. निर्यात बंदी घातल्याने महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यातील कांद्याच्या किंमती आटोक्यात आल्या. दरम्यान होलसेल बाजारात कांद्याची आवक वाढल्याने कांद्याच्या किंमती स्वस्त झाल्या. त्यामुळे आता कांद्याची निर्यात बंदी उठविण्यात आली.

Web Title: Farmer on the delhi border another big decision has been taken by the modi government regarding the export of onions nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2024 | 03:35 PM

Topics:  

  • Amit Shah

संबंधित बातम्या

Abhijeet Dipke : ‘अमित शहांसारखी चूक तुम्ही करू नका,’ अभिजित दीपकेंचा फडणवीसांना इशारा; शिवाजी पार्क आंदोलनावर CJP आक्रमक
1

Abhijeet Dipke : ‘अमित शहांसारखी चूक तुम्ही करू नका,’ अभिजित दीपकेंचा फडणवीसांना इशारा; शिवाजी पार्क आंदोलनावर CJP आक्रमक

Rahul Gandhi on Gyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मोदीच घेतील’; राहुल गांधींचा मोठा दावा, देशव्यापी आंदोलनाची तयारी
2

Rahul Gandhi on Gyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मोदीच घेतील’; राहुल गांधींचा मोठा दावा, देशव्यापी आंदोलनाची तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.