Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 29 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Raut News: मोदींसारखा क्रूर आणि अघोरी नेता देशात होऊच शकत नाही; संजय राऊतांचा भाजपवर घणाघाती हल्ला

Sanjay Raut News: भाजपमध्येही सध्या प्रचंड नाराजी असल्याचा दावा राऊत यांनी केला. ईडी आणि सीबीआयच्या भीतीपोटी आज भाजपमध्ये अनेक जण गप्प आहेत. ज्या दिवशी ही भीती संपेल, त्या दिवशी भाजपचे जहाज बुडेल. ५०-१०० कोटी रुपये नेमके कुठून येतात? राजेश मेहतासारखे १५ लाख कोटींचा घोटाळा करणारे लोक मोदींसोबत झळकतात.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 13, 2026 | 12:36 PM
Sanjay Raut, Sharad Pawar, Supriya Sule

Sanjay Raut, Sharad Pawar, Supriya Sule

Follow Us
Follow Us:
  • नरेंद्र मोदी यांच्यासारखा क्रूर आणि अघोरी नेता देशात होऊच शकत नाही- संजय राऊत
  • भाजपच्या हुकूमशाही आणि विकृतीच्या विरोधात लढण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज – संजय राऊत
  • ईडी आणि सीबीआयच्या भीतीपोटी आज भाजपमध्ये अनेक जण गप्प – संजय राऊत
Sanjay Raut News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा क्रूर आणि अघोरी नेता देशात होऊच शकत नाही. मोदी आणि अमित शाह यांचे राजकारण सुरू झाल्यापासून देशातील राजकीय विकृतीने कळस गाठला आहे, असा घणाघाती हल्ला शिवसेना (उबाठा) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केला. पक्ष आणि माणसे फोडणे हा भाजपचा एककलमी कार्यक्रम असल्याचा आरोप करत त्यांनी विविध राजकीय घडामोडींवर पक्षाची भूमिका मांडली.

खासदारांच्या संभाव्य फुटीच्या अफवांवर बोलताना राऊत म्हणाले, उद्या मातोश्रीवर पक्षाच्या खासदारांची बैठक होत आहे. आगामी लोकसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर, खासदारांचे प्रश्न, निधी आणि इतर विषयांवर पक्षप्रमुख चर्चा करणार आहेत. पावसाळ्यामुळे मुंबईत पोहोचण्यात अडचणी येत असल्याने ही बैठक आधीच बोलावली आहे. पक्षात अशा बैठका सतत होत असतात, त्यामुळे फुटीच्या वावड्या केवळ अफवा आहेत. अमित शाह यांनी असे ऑपरेशन टायगर १०० वेळा करून झाले आहे.

Junnar Gram Panchayat Election: राजुरी ग्रामपंचायत आरक्षण सोडत जाहीर! १७ सदस्यांच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट;

भाजपच्या हुकूमशाही आणि विकृतीच्या विरोधात लढण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज राऊत यांनी व्यक्त केली. काँग्रेस कधीही बुडणारे जहाज नव्हते, आजही मोदी काँग्रेसला घाबरतात. ज्या नेत्यांनी पूर्वी काँग्रेस सोडली, त्यांनी पुन्हा एकत्र आले पाहिजे. शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून त्यांनी यासाठी पुढाकार घेतला तर हे नक्कीच शक्य आहे. आम्ही प्रादेशिक पक्ष म्हणून त्यांच्या सोबत ठामपणे राहू, असेही ते म्हणाले.

भाजपमध्येही सध्या प्रचंड नाराजी असल्याचा दावा राऊत यांनी केला. ईडी आणि सीबीआयच्या भीतीपोटी आज भाजपमध्ये अनेक जण गप्प आहेत. ज्या दिवशी ही भीती संपेल, त्या दिवशी भाजपचे जहाज बुडेल. ५०-१०० कोटी रुपये नेमके कुठून येतात? राजेश मेहतासारखे १५ लाख कोटींचा घोटाळा करणारे लोक मोदींसोबत झळकतात. भाजपचे अंतिम ध्येय देशात जातीय आणि धार्मिक वाद निर्माण करून देश व राज्य वाटण्याचे आहे, असा आरोप त्यांनी केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधताना, फडणवीस हे शिंदेंचे ऑपरेशन कधी करतील सांगता येत नाही, शिंदे सध्या प्रचंड तणावाखाली वावरत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

Calcium Deficiency: कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडांमधून सतत कटकट आवाज येतो? मग आहारात न चुक

आज आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना संजय राऊत यांनी त्यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. आदित्य यांच्यात नेतृत्व करण्याची मोठी क्षमता आहे. बाळासाहेबांच्या काळातील प्रश्न वेगळे होते, आजचे वेगळे आहेत. मराठी माणसाचा हा पक्ष आणि आवाज टिकवण्यासाठी ठाकरे यांनीच नेतृत्व केले पाहिजे. आदित्य ठाकरे यांनी पक्ष आणि राज्य पुढे नेण्यासाठी सक्षमपणे नेतृत्व करावे, हीच आमची शुभेच्छा आहे.

राज्याच्या अर्थखात्याबाबत बोलताना राऊत यांनी अनपेक्षित विधान केले. राज्याचे अर्थ खाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ठेवण्यातच राज्याचे शहाणपण आहे. सध्याच्या घडीला अर्थ खाते सांभाळू शकेल, असा एकही सक्षम नेता मला राज्यात दिसत नाही, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रशासकीय पकडीची प्रशंसा केली.

 

Web Title: Sanjay raut dismisses mp defection rumors ahead of crucial meeting at matoshree

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 12:36 PM

Topics:  

  • Amit Shah
  • Maharashtra Politics
  • narendra modi
  • pune news
  • sanjay raut
  • Shivsena UBT

संबंधित बातम्या

गुरुपौर्णिमेलाच उघडणारे ‘हे’ गुप्त तळघर! ‘त्रिशुंड गणपती’ मंदिरातील खास रहस्य, काय आहे रंजक इतिहास
1

गुरुपौर्णिमेलाच उघडणारे ‘हे’ गुप्त तळघर! ‘त्रिशुंड गणपती’ मंदिरातील खास रहस्य, काय आहे रंजक इतिहास

PMP चा उधळपट्टीविरोधात ‘सर्जिकल स्ट्राइक’! अनावश्यक खरेदीवर बंदी अन् २४ तासांत…
2

PMP चा उधळपट्टीविरोधात ‘सर्जिकल स्ट्राइक’! अनावश्यक खरेदीवर बंदी अन् २४ तासांत…

Priyanka Gandhi: विद्यार्थी काय दहशतवादी होते का? लोकसभेत प्रियंका गांधींचा थेट पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांवर हल्लाबोल!
3

Priyanka Gandhi: विद्यार्थी काय दहशतवादी होते का? लोकसभेत प्रियंका गांधींचा थेट पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांवर हल्लाबोल!

Satara Voter List Row: सातारा जिल्ह्यात ५६ हजार दुबार मतदार! काँग्रेसचा प्रशासनावर गंभीर आरोप, पुरावे सादर
4

Satara Voter List Row: सातारा जिल्ह्यात ५६ हजार दुबार मतदार! काँग्रेसचा प्रशासनावर गंभीर आरोप, पुरावे सादर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.