मोठी बातमी! HIV वर औषध शोधण्यात वैद्यकीय तज्ज्ञांना यश; एका इंजेक्शने नियंत्रण शक्य
वैद्यकीय संशोधनात मोठी प्रगती झाली तरी एचआयव्ही सारख्या भयंकर रोगावर अद्याप ठोस औषध शोधता आलेलं नाही. मात्र वैद्यकीय शास्त्राने या विषाणूला रोखण्यात मोठं यश मिळवलं आहे. अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने (FDA) ‘लेनाकॅपाविर’ (Ztugo) या औषधाला प्री-एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस (PrEP) म्हणजेच संभाव्य संसर्गापूर्वी प्रतिबंधक उपचारासाठी मंजुरी दिली आहे.
Heart Attack च्या 5 मिनिट्स आधी दिसतात 8 लक्षणं, त्वरीत करा 4 काम नाहीतर यमराज घेईल प्राण
वैद्यकीय क्षेत्रात ही क्रांतिकारी बाब मानला जात आहे. लेनाकॅपाविर हे असं पहिले इंजेक्शन आहे, जे दर सहा महिन्यांनी एक डोस घेतल्याने एचआयव्हीच्या संसर्गापासून बचाव करू शकतं. विशेष म्हणजे, हे औषध एचआयव्हीचा उपचार नसून केवळ संसर्ग होण्यापूर्वी प्रतिबंध करण्यासाठी वापरलं जातं. जे सध्या एचआयव्ही निगेटिव्ह असून त्यांना भविष्यात संसर्गाचा धोका आहे, अशाच व्यक्तींना हे इंजेक्शन दिलं जातं.
अमेरिकेतील एका बायोफार्मा कंपनीने हे औषध विकसित केले असून, तीन प्रमुख ट्रायलमध्ये त्याचे अत्यंत सकारात्मक परिणाम दिसून आले. महिलांमध्ये या इंजेक्शनमुळे संसर्गाचे प्रमाण 100% टळले, तर पुरुषांमध्ये फक्त 0.1% संसर्गाचे प्रमाण आढळले. त्यामुळे या औषधाची परिणामकारकता उच्च दर्जाची असल्याचे स्पष्ट झाले आहे.
लेनाकॅपाविर हे एक ‘कॅप्सिड इनहिबिटर’ आहे, जे एचआयव्ही विषाणूच्या बाहेरील कवचावर (capsid) परिणाम करून त्याच्या शरीरात प्रसाराची प्रक्रिया थांबवते. हे इंजेक्शन त्वचेखाली दिले जाते, जे हळूहळू शरीरात रिलीज होत राहते आणि सहा महिने प्रभावी राहते. सहा महिन्यानंतर पुन्हा डोस देणे आवश्यक असते. मात्र, प्रत्येक डोस घेण्यापूर्वी एचआयव्ही निगेटिव्ह चाचणी आवश्यक आहे.
कोण घेऊ शकतं इंजेक्शन?
फक्त एचआयव्ही निगेटिव्ह व्यक्तींना
ज्यांचे वजन 35 किलोपेक्षा जास्त आहे
ज्यांना एचआयव्हीचा संसर्ग होण्याचा धोका आहे
एचआयव्ही पॉझिटिव्ह व्यक्तीने हे औषध घेतल्यास शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात आणि औषध प्रतिकारक्षमता निर्माण होण्याचा धोका संभवतो.
पब्लिक हेल्थ एक्सपर्ट डॉ. जुगल किशोर यांनी या औषधाच्या मान्यतेला एक वैज्ञानिक आणि सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील मैलाचा दगड म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, हे औषध जर सामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध झाले, तर एचआयव्हीचा प्रसार रोखण्यात मोठी मदत होईल. मात्र, लोकांनी हे समजून घेतले पाहिजे की, औषध आले म्हणून खबरदारी बाळगणे बंद करणे धोकादायक ठरू शकते.
लेनाकॅपाविरच्या वापरला परवानगी हे एचआयव्ही प्रतिबंधासाठी एक मोठे पाऊल आहे. पण याचा प्रभावी वापर तेव्हाच शक्य होईल, जेव्हा ते सर्वांना सहज आणि स्वस्तात मिळेल. त्याचबरोबर, यामुळे एचआयव्हीविषयी जागरुकता आणि खबरदारी आवश्यकच राहील.