पावसाळ्यात चेहऱ्यावर सतत पिंपल्स आणि फोड्या येतील असतील तर 'अशी' घ्या त्वचेची काळजी
राज्यासह संपूर्ण देशभरात मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्यासह त्वचेची जास्त काळजी घ्यावी. कारण सतत पडणाऱ्या पावसामुळे त्वचेचे नुकसान होण्याची जास्त शक्यता असते. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स, फोड, मुरूम कमी करण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. बदलेल्या वातावरणाचा परिणाम आरोग्यावर आणि चेहऱ्यावर लगेच दिसून येतो. त्वचा अधिक तेलकट आणि चिकट होऊन जाते. त्वचेवर अतिरिक्त तेल जमा झाल्यानंतर त्वचेच्या छिद्रांमध्ये तेल तसेच साचून राहते. यामुळे चेहऱ्यावर सतत पिंपल्स येतात. हे पिंपल्स फोडल्यानंतर त्वचा अधिकच लाल होऊन जाते.(फोटो सौजन्य – istock)
चेहऱ्यावर आलेले पिंपल्स बऱ्याचदा मोठे होतात. हे मोठे झालेले पिंपल्स फोडल्यामुळे त्वचेवर खाज येणे, रॅश येणे, त्वचा लाल होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचा स्वच्छ करणे महत्वाचे आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यात चेहऱ्यावर पिंपल्स येऊ नाय म्हणून त्वचेची कशी काळजी घ्यावी, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. त्वचा कायमच चमकदार आणि निरोगी ठेवण्यासाठी पाण्याने स्वच्छ करणे आवश्यक आहे.
पावसाळ्यातील वातावरणामुळे त्वचा अधिकच चिकट आणि तेलकट होऊन जाते. याशिवाय चेहऱ्यावर जास्त घाम आणि सेबम तयार होतात. यामुळे चेहऱ्याच्या रोम छिद्रांमध्ये धूळ, माती आणि घाणीचा चिकट थर जमा होतो. पावसाळ्यात वातावरणात जास्त आर्द्रता असते. यामुळे चेहरा चिकट, तेलकट होऊन जातो. यामुळे बॅक्टेरिया त्वचेवर सहज चिटकून जातात.त्यामुळे पावसाळ्यात चिकट झालेली त्वचा योग्य वेळी स्वच्छ करणे आवश्यक आहे. त्वचा फेशवॉशचा वापर करून स्वच्छ करून घ्यावी आणि त्यानंतर चेहऱ्यावर सूट होईल असे मॉइश्चरायझर लावावे. यामुळे त्वचा कायमच फ्रेश आणि निरोगी राहते.
चेहऱ्यावर आलेले पिंपल्स आणि मुरूम कमी करण्यासाठी AHA आणि BHA सारखे सॅलिसिलिक ॲसिड वापरावे. यामुळे त्वचेवर आलेले पिंपल्स मोठे होत नाहीत. ऋतुनुसार त्वचा अधिक संवेदनशील होत जाते. त्यामुळे ऋतूनुसार स्किन केअर प्रॉडक्टमध्ये बदल करणे आवश्यक आहे. स्किन केअर प्रॉडक्टमध्ये बदल न केल्यामुळे त्वचा कायम तेलकट आणि चिकट राहते. याशिवाय तेलकट त्वचा असलेल्या महिलांनी तेल-मुक्त, जेलबेस आणि नॉन- कॉमेडोजेनिक असलेले सनस्क्रीन वापरावे. यामुळे त्वचेची छिद्र बंद होत नाही.
World Vitiligo Day: विटिलिगोबाबत गैरसमज, जागरुकता महत्त्वाची; संसर्गजन्य आजार नाही तर…
त्वचेवर धूळ, माती प्रदूषणामुळे घाण तशीच साचून राहते. यामुळे त्वचा अधिकच निस्तेज आणि कोरडी पडते. त्यांची त्वचा अधिकच तेलकट आहे, अशांनी दिवसभरातून दोनदा त्वचा पाण्याने स्वच्छ कारवी. यामुळे त्वचेवरील घाण निघून जाईल. याशिवाय त्वचा स्वच्छ करून झाल्यानंतर चेहऱ्यावर त्वचेला मॉइश्चरायझर लावावे. घाम आल्यानंतर किंवा त्वचा पुसताना जास्त जोरात घासू नये. यामुळे त्वचेवर रॅश किंवा पुरळ येण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे चेहरा नेहमीच हलक्या हाताने पुसावा.