सोलापुरातील एमआयडीसीत कारखान्याला भीषण आग; तिघांचा होरपळून मृत्यू
कोलकाता: पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. कोलकातामधील एका हॉटेलला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. हि आग इतकी भीषण होती कि संपूर्ण हॉटेल आणि आजूबाजूचे काही बिल्डिंग या आगीच्या कचाट्यात सापडले. या घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक जण या हॉटेलच्या आत अडकल्याचे समोर येत आहे.
आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि अग्निशमनदलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अथक प्रयत्न केल्यानंतर या गवार नियंत्रण मिळवण्यात यश आले. या घटनेत अनेक लोक हॉटेलमध्ये फसली होती. तातडीने अशा लोकांना बाहेर काढण्यात आले. रुग्णवाहिका दाखल होताच त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या भीषण आगीच्या घटनेमुळे १४ जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे.
हॉटेलमध्ये अजूनही बचावकार्य सुरु आहे. पश्चिम बंगालच्या कोलकाता येथील ऋतुराज हॉटेलमध्ये भीषण आग लालग्याची घटना घडली. थोड्याच वेळात आगीने भयाण रूप धारण केले. अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासन बचावकार्य करत आहे. याचवेळेस १४ लोकांचे मृतदेह देखील बाहेर काढण्यात आले आहे. मृत पावलेल्यांची अजून ओळख पटलेली नाही.
कोलकाता येथील हॉटेलमध्ये आग काशमउळे लागली याची चौकशी केली जाणार आहे. शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याचे प्राथमिक कारण समोर येत आहे. सध्या हॉटेल सीज करण्यात आले आहे. तर भाजपने या प्रकरणात जो कोणी आरोपी असेल त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर जखमी झालेल्या आणि मृत पावलेल्या लोकांना योग्य ती मदत करावी अशी मागणी देखील केली आहे.
रेस्टॉरंटमधील आगीत 22 जणांचा होरपळून मृत्यू
चीनमध्ये भीषण दुर्घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चीनच्या उत्तरेकडील लिओयांग शहरात एका रेस्टॉरंटमध्ये भीषण आग लागील. या आगीत 20 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये खिडक्या दरवाज्यांमधून आगीच्या ज्वाला बाहेर पडताना दिसत आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
चीनमधे भीषण दुर्घटना; रेस्टॉरंटमधील आगीत 22 जणांचा होरपळून मृत्यू
या महिन्यात चीनमध्ये आगीची ही दुसरी मोठी घटना आहे. यापूर्वी 9 एप्रिल रोजी उत्तर चीनमधील हेबेई प्रांतातील लोंगहुआ काऊंटीमधील एका नर्सिंग होममध्ये आग लागील होती. या आगीत 20 वृद्धांचा मृत्यू झाला होता. आगी लागली त्यावेळी नर्सिंग होममध्ये एकूण 39 वृद्ध उपस्थित होते. यापूर्वी 2025 च्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात देखील अशीच एक घटना घडली होती. चीनच्या उत्तरेकडील हेबेई प्रांतातील झांगजियाकौ शहरातील एका बाजारपेठेत लागलेल्या भीषण आग लागली होती. यामध्ये आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
लियाओयांग हे शहर लियाओनिंग प्रांतात आहे. हे शहर चीनच्या गंजलेल्या पट्ट्याचा भाग आहे. यापूर्वी हे शहर एक औद्योगिक शहर म्हणून ओळखले जायचे. पण गेल्या काही काळात मोठ्या संख्येने लोक स्थलांतरित झाले आहेत.