Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुजरातमध्ये लाजिरवाणी घटना, परदेशी विद्यार्थ्यांवर सशस्त्र जमावाचा हल्ला; पाच जण जखमी!

गुजरात विद्यापीठातील परदेशी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहावर सशस्त्र जमावाने हल्ला केला. या घटनेत किमान पाच जण जखमी झाले आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 18, 2024 | 08:54 AM
गुजरातमध्ये लाजिरवाणी घटना, परदेशी विद्यार्थ्यांवर सशस्त्र जमावाचा हल्ला; पाच जण जखमी!
Follow Us
Close
Follow Us:

गुजरात मधून एक मोठी बातमी समोर येत आहे. गुजरात विद्यापीठातील वसतिगृहात शनिवारी रात्री जमावाने परदेशी विद्यार्थ्यांवर हल्ला केला. आफ्रिकन देश, अफगाणिस्तान आणि उझबेकिस्तानमधील विद्यार्थी नमाज पठण करत असताना जमावाने त्यांच्यावर हल्ला (Foreign students attacked in Gujarat University) केला. काठ्या आणि चाकूने सज्ज झालेल्या जमावाने परदेशी विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यात किमान पाच परदेशी विद्यार्थी जखमी झाले आहेत. राज्याचे गृहमंत्री हर्ष संघवी म्हणाले की, लवकरच आरोपींना अटक करून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी केली जाईल.

[read_also content=”‘शैतान’ ला प्रेक्षकांची पंसती, अजय देवगण आणि आर माधवनच्या चित्रपटानं नवव्या दिवशी केली इतकी कमाई! https://www.navarashtra.com/movies/shaitaan-box-office-collection-day-9-is-8-crore-nrps-516028.html”]

नेमका प्रकार काय

विद्यार्थ्यांनी सांगितले की, अहमदाबाद येथील कॅम्पसमध्ये एकही मशीद नाही. त्यामुळे ते वसतिगृहात एका ठिकाणी रमजानमध्ये रात्री अदा करण्यात येणारी तरावीह नमाज अदा करण्यासाठी जमले होते. दरम्यान, काठ्या आणि चाकूने सज्ज झालेल्या जमावाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. जमावाने त्यांच्यावर हल्ला करत खोल्यांची तोडफोड केली. वसतिगृहाच्या सुरक्षा रक्षकांनी त्या लोकांना रोखण्याचा प्रयत्न केला पण त्यांची संख्या जास्त असल्याने ते शक्य झाले नाही.

एका अफगाण विद्यार्थ्याने सांगितले की, जमाव सतत घोषणा देत होता. वसतिगृहात नमाज अदा करण्यास कोणी परवानगी दिली, अशी विचारणा त्यांनी केली. जमावाने खोल्यांमध्ये घुसून विद्यार्थ्यांवर हल्ला केला. लॅपटॉप आणि फोन तोडले. बाहेर उभ्या असलेल्या दुचाकींच्या काचा फोडल्या. पोलिस पोहोचेपर्यंत जमाव पळून गेला होता.

पाच विद्यार्थी जखमी

या हल्ल्यात किमान पाच विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांमध्ये प्रत्येकी एक विद्यार्थी अफगाणिस्तान, श्रीलंका आणि तुर्कमेनिस्तानचा असून दोन विद्यार्थी आफ्रिकन देशांतील आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संबंधित दूतावासांनाही कळविण्यात आले आहे.

नमाज अदा करण्यावरुन वाद

अहमदाबाद शहराचे पोलिस आयुक्त जीएस मलिक म्हणाले की पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सुमारे 300 परदेशी विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. ते अफगाणिस्तान, श्रीलंका आणि आफ्रिकन देशांतील आहेत. काल काही जण गच्चीवर नमाज अदा करत होते. काही लोक आले आणि त्यांनी असे का करत आहात आणि त्यांनी मशिदीत नमाज अदा करावी असे विचारले. यावरून जोरदार वादावादी व हाणामारी झाली. यानंतर बाहेरील लोकांनी दगडफेक करत वसतिगृहाच्या खोल्यांची तोडफोड केली.

Web Title: Five foreign students injured after attacked by mob in gujarat university nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2024 | 08:54 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.