Independence Day 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ध्वजारोहण; देशवासियांना दिल्या शुभेच्छा
नवी दिल्ली : भारताचा स्वातंत्र्यदिन हा केवळ राष्ट्रीय उत्सव नसून, तो एकात्मतेचा, अभिमानाचा आणि जनतेच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्याचा दिवस आहे. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ध्वजारोहण केले. यावेळी त्यांनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छाही दिल्या. तिरंग्याला दिलेली सलामी आणि देशासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव आता केला जाणार आहे.
देशाच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणार आहेत. लाल किल्ल्यावर होणाऱ्या कार्यक्रमात ऑपरेशन सिंदूर यांसारख्या काही महत्त्वाच्या बाबींची माहिती दिली जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी हे सलग बाराव्यांदा ध्वजारोहण करुन संबोधित करतील. यावेळी पंतप्रधानांचे स्वागत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ आणि संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी केले.
हेदेखील वाचा : Independence Day 2025: UP चे 33 ग्रामप्रमुख बनले स्वातंत्र्यदिनाचे ‘हिरो’; लाल किल्ल्यावर होणार सन्मान
दरम्यान, उत्तर प्रदेशातील फक्त ३३ ग्रामप्रमुखांना लाल किल्ल्यावर होणाऱ्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमासाठी विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. हे केवळ सन्मानाचे आमंत्रण नाही, तर ग्रामीण भारताच्या प्रगतीचा आणि पंचायत शक्तीच्या सामर्थ्याचा अभिमानास्पद गौरव आहे. 15 ऑगस्ट रोजी भारत स्वातंत्र्यदिन मोठ्या अभिमानाने आणि उत्साहाने साजरा करतो. या दिवशी पंतप्रधान दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवतात आणि देशवासियांना संबोधित करतात.
उत्तर प्रदेशातील 33 गावांची निवड
योगी आदित्यनाथ सरकारच्या विविध योजनांमध्ये आणि धोरणांमध्ये या ग्रामप्रमुखांनी आपल्या क्षेत्रात अनुकरणीय कार्य केले आहे. ग्रामीण विकास, स्वच्छता अभियान, महिला सक्षमीकरण, डिजिटल पंचायत सचिवालयाची उभारणी, तसेच लोकसहभाग वाढविणे या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी उत्तम नेतृत्व दाखवले आहे. त्यामुळे आता या ३३ गावांची निवड केली गेली.