Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahmedabad plane crash : आयुष्यभर केले 1206 नंबरवर प्रेम…; पण विजय रूपाणींच्या मृत्यूनेही साधला हाच दिवस

Vijay Rupani lucky number 1206 : अहमदबाद अपघातामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांचा मृत्यू आणि लकी नंबरमध्ये गूढ रहस्य दिसून आले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 13, 2025 | 01:10 PM
Vijay Rupani's lucky number 1206 died on same date in Ahmedabad Plane Crash

Vijay Rupani's lucky number 1206 died on same date in Ahmedabad Plane Crash

Follow Us
Close
Follow Us:

Vijay Rupani lucky number: अहमदाबाद : गुजरातमध्ये मृत्यूचे तांडव झाले आहे. गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये एकूण 265 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी 241 प्रवासी विमानात होते, तर अपघातग्रस्त परिसरातील 24 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा देखील मृत्यू झाला आहे. मात्र त्यांच्या मृत्यदिनाचे त्यांच्या लकी नंबरसोबत गूढ रहस्य समोर आले आहे.

अहमदाबाद अपघात दुर्घटनेमध्ये माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार त्यांची पत्नी अंजली रुपानी यांना घेण्यासाठी विजय रुपाणी लंडनला निघाले होते. रुपानी यांचा सीट नंबर 2D असा होता. दरम्यान विजय रुपाणी यांचा मृत्यू, त्यांची विमानातील जागा याचा संबंध त्यांच्या भाग्यवान संख्येशी लावला जात आहे. असे म्हटले जात आहे की विजय रुपानी यांचा 1206 हा त्यांचा लकी क्रमांक मानला होता. आता याला नियतीचा खेळ म्हणा किंवा आणखी काही. पण याच नंबरच्या तारखेने मृत्यूने देखील विजय रुपाणी यांना गाठले.

अहमदाबाद अपघात प्रकरणाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा 

माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या आपेष्ट आणि मित्रपरिवाराला त्यांच्या या लकी नंबरची सर्व कहानी माहिती आहे. विजय रुपाणी यांच्यासाठी 1206 हा फक्त एक आकडा नव्हता तर तो नशिब चमकवणारा आकडा होता. त्यांना या नंबरवर एवढा विश्वास होता की, त्यांच्या संबंधित अनेक नंबरमध्ये 1206 या नंबरचा समावेश होता. माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या पहिल्या स्कूटीचा नंबर देखील हाच लकी नंबर होता.

माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या मालकीच्या सर्व गाड्यांच्या 1206 हीच नंबरप्लेट होती. त्यांच्या मित्रांच्या मते, हा आकडा त्यांच्यासाठी नेहमीच भाग्यवान राहिला होता. पण कदाचित दैवावर कोणाचेही नियंत्रण नसते आणि १२/०६ अर्थात 12 जून रोजी झालेल्या भीषण विमान अपघातामध्ये विजय रुपाणी यांचा मृत्यू झाला.  आयुष्यभर विजय रुपानींसाठी भाग्यवान ठरलेला 1206 हा आकडा त्यांच्या आयुष्याचा शेवटचा दिवस बनला.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

पंतप्रधान मोदी अहमदाबादमध्ये दाखल

अहमदाबाद अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील लक्ष ठेवून होते. त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत चर्चा करुन योग्य ती कार्यवाही करण्यास सांगितले. त्यानंतर आज (दि.13) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमधील दुर्घटना ठिकाणीची पाहणी केली आहे. 20 मिनिटे त्यांनी ही पाहणी केली. याचबरोबर या अपघातग्रस्तांमधील जखमींची देखील पंतप्रधानांनी भेट घेतली आहे. त्यांनी जखमींना धीर दिला आहे. त्याचबरोबर अहमदाबाद विमानतळावर देखील पंतप्रधान मोदी दाखल झाले आहेत. त्यांची विमानतळाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे. यामध्ये अपघाताचे कारण आणि यापुढे अशा दुर्घटना होणार नाहीत यासाठी उपाययोजना यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

Web Title: Former gujarat cm vijay rupani lucky number 1206 died on same day ahmedabad plane crash news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2025 | 11:19 AM

Topics:  

  • Ahmedabad
  • air india
  • Plane Accident

संबंधित बातम्या

Air India च्या मागे पनवती? टेकऑफनंतर काही मिनिटांतच विमानाच यू टर्न, हवेत बंद पडलं इंजिन
1

Air India च्या मागे पनवती? टेकऑफनंतर काही मिनिटांतच विमानाच यू टर्न, हवेत बंद पडलं इंजिन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.