Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘नरसिंह रावांना ना जमिनीचा एक तुकडा मिळाला ना भारतरत्न’; माजी पंतप्रधानांच्या भावाचे काँग्रेसवर गंभीर आरोप

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मृतीस्थळासाठी काँग्रेसने राजघाटावर जागेची मागणी केली होती. त्यावरून माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांचे भाऊ मनोहर राव यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Dec 29, 2024 | 06:15 PM
'नरसिंह रावांना ना जमिनीचा एक तुकडा मिळाला ना भारतरत्न'; माजी पंतप्रधानांच्या भावाचे काँग्रेसवर गंभीर आरोप

'नरसिंह रावांना ना जमिनीचा एक तुकडा मिळाला ना भारतरत्न'; माजी पंतप्रधानांच्या भावाचे काँग्रेसवर गंभीर आरोप

Follow Us
Close
Follow Us:

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं नुकताच निधन झालं. त्यांच्या स्मृतीस्थळासाठी काँग्रेसने राजघाटावर जागेची मागणी केली होती. त्यावरून माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांचे भाऊ मनोहर राव यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.’काँग्रेसने २० वर्षे मागे वळून पाहावं आणि त्यांनी त्यांचे नेते पीव्ही नरसिंह राव यांना किती आदर दिला ते पाहावं. काँग्रेसने त्यांना जमिनीचा तुकडाही दिला नाही की साधा पुतळा उभे केला. कॉंग्रेसच्या काळात त्यांना भारतरत्नही मिळालं नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.

वर्षाअखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली ‘मन की बात’; विविधेतील एकता दाखवणाऱ्या महाकुंभचा केला विशेष उल्लेख

पीव्ही नरसिंह राव यांच्या अंत्यसंस्कारालाही सोनिया गांधी उपस्थित नव्हत्या. काँग्रेसने नरसिंह राव यांच्यासाठी पक्ष कार्यालयाचं दार कधीही उघडलं नाही. डॉ.मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी भाजप नक्कीच जमीन देईल. काही औपचारिकता आहेत ज्या काँग्रेसने पूर्ण केल्या पाहिजेत. स्मारकासाठी भाजप नक्कीच जमीन देईल. नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांची जोडी गुरु-शिष्याची जोडी असल्याचं ते म्हणाले.

काँग्रेसने नरसिंहरावांना किती मान दिला?

मनमोहन राव म्हणाले की, नरसिंह राव यांनी डॉ.मनमोहन सिंग यांना पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. मनमोहन सिंग यांना त्यांच्या कार्यकाळात खूप प्रसिद्धी मिळाली कारण त्यांनी (नरसिंह राव) मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री म्हणून काम करण्याचं स्वातंत्र्य दिले होते. या काळात मनमोहन सिंग यांनी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढलं. पण मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये त्यांचे गुरू नरसिंह राव यांना काय मिळालं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

Delhi Assembly Election : दिल्लीच्या प्रचारसभेत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार; जागांबाबत केली मोठी भविष्यवाणी

मनोहर राव पुढे म्हणाले की, मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कावेळी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान… संपूर्ण मंत्रिमंडळ उपस्थित होतं. मात्र नरसिंह राव यांच्या अंत्यसंस्काराला कोणीही हजेरी लावली नाही. ते हैदराबादला आले नसते का? त्यावेळी सोनिया गांधी एआयसीसीच्या अध्यक्षा होत्या. त्यांना हैदराबादला जाता आलं नसतं का? त्या इतर ठिकाणी जायच्या, पण ती इथे आल्या नाहीत.

मनमोहन सिंग यांच्या स्मृतीस्थळासाठी भाजप जागा देणार

मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल आम्ही शोक व्यक्त करतो. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल आमच्या संवेदना व्यक्त करतो. त्यांचे स्मारक उभारण्यासाठी भाजप जागा देणार आहे. ट्रस्ट स्थापन करण्याची चर्चा आहे. त्यानंतर स्मारकासाठी जमीन दिली जाईल. मनमोहन सिंग यांचे स्मारक उभारण्यासाठी काँग्रेसला राजघाटाजवळ जमीन हवी होती. तिथेचं अंत्यसंस्कार करून समाधी बांधण्यात यावी, असं ते म्हणाले.

Web Title: Former pm pv narasimha rao brother manohar rao serious allegation on congress on manmohan shing memorial land demand on raj ghat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2024 | 05:35 PM

Topics:  

  • Manmohan singh

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.