इमारतीच्या बांधकामादरम्यान खबरदारी न घेतल्याने अपघात (Accident) होण्याच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ झाल्याचं दिसत आहे. पाच दिवसापुर्वी ठाण्यात 40 मजली इमारतीची लिफ्ट कोसळल्याची दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत सहा मजूंराचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता ग्रेटर नोए़डा येथील एका निर्माणाधीन इमारतीची लिफ्ट (Noida Lift Accident) कोसळून चार मजूरांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत सहा जण जागीच ठार झाले आहेत. तर, दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. नेमकी दुर्घटना कशी घडली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.
[read_also content=”केरळमध्ये 6 जणांंना निपाह व्हायरसची लागण; 700 हून अधिक संक्रमित लोकांच्या संपर्कात, सावधगिरीसाठी ‘या’ ठिकाणी लॉकडाऊन! https://www.navarashtra.com/india/6-people-infected-with-nipah-virus-in-keral-aso-far-government-announced-lockdown-in-some-cities-nrps-457989.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, ग्रेटर नोएडा वेस्टमधील ड्रीम व्हॅली प्रोजेक्टच्या बांधकाम साइटवरील लिफ्ट तुटून खाली पडली. त्यामुळे लिफ्टमध्ये उपस्थित असलेले चार कामगार गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, तेथे उपचारादरम्यान चौघांचाही मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी दाखल होत आहेत.