INS VIKRANT (फोटो सौजन्य- SOCIAL MEDIA)
भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या चोक प्रत्युत्तर दिले. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तानातील दहशतवाद्यांची 9 ठिकाणं उद्ध्वस्त केली. मात्र पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. त्याला भारतानेही चोख प्रत्युत्तर दिले आहे. गुरुवारी रात्री दोन्ही देशांकडून हल्ले-प्रतिहल्ले सुरु करण्यात आले होते. भारताने पाकिस्तानला रात्रभर मोठा दणका दिला आहे. ड्रोन आणि हवाई हल्ल्यांद्वारे इस्लामाबादपर्यंत थेट धडक दिली गेली. कानठळ्या बसवणाऱ्या स्फोटांनी संपूर्ण राजधानी हादरून गेली. फक्त इस्लामाबादच नव्हे, तर लाहोर, पेशावर आणि आणखी 16 शहरांमध्ये हल्ल्यांची मालिका सुरू झाली. पाकिस्तान सरकारला काही शहरांत ब्लॅकआऊट करावा लागला त्यामुळे जनतेत घबराटीचं वातावरण आहे.
India Vs Pakistan War Live: पाकिस्तानवर दुहेरी संकट; इकडून भारत तर दुसरीकडून BLA ने केले भीषण हल्ले
या भारत पाकिस्तानच्या तणावादरम्यान आता भारताच्या आयएनएस विक्रांतची (INS Vikrant) एन्ट्री झाली आहे. भारताने समुद्रामार्गे पाकिस्तानवर आणखी एक मोठा घाव घातला. आकाशानंतर समुद्रातूनही भारतानं पाकिस्तानचं कंबरडं मोडलं. INS Vikrant (IAC-1) या भारतातच बनवलेल्या पहिल्या विमानवाहू युद्धनौकेने कराची बंदरावर तुफानी हल्ले चढवले. कराची बंदरावर 14 पेक्षा अधिक स्फोट झाले त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असल्याचं सांगितलं जात आहे. नौदलाच्या कारवाईनंतर पाकिस्तानने बंदर परिसरातही ब्लॅकआउट जाहीर केला. 1971 नंतर प्रथमच भारताने कराचीवर असा थेट हल्ला चढवला.
INS Vikrant– गेम चेंजर
आयएनएस विक्रांतच्या स्ट्राइक ग्रुपमध्ये समाविष्ट असलेले एमआयजी-29के लढाऊ विमान 850 किलोमीटरपर्यंत हल्ला करू शकतात. त्यात 64 बराक आणि 16 ब्रह्मोस क्षेपणास्त्रे आहेत, जी हवेत आणि जमिनीवर अचूकपणे लक्ष्य गाठण्यास सक्षम आहेत. ही जेट्स आणि क्षेपणास्त्रे काही मिनिटांत पाकिस्तानचे नौदल तळ, विमानतळ किंवा इतर महत्त्वाची ठिकाणे नष्ट करू शकतात. जर आयएनएस विक्रांत पाकिस्तानसमोर उभी राहिली तर ती सहजपणे हल्ला करू शकते. उपग्रह प्रतिमांनुसार, पाकिस्तानकडे फक्त दोन जुन्या पाणबुड्या आहेत, ज्या आयएनएस विक्रांतशी स्पर्धा करू शकत नाहीत, उर्वरित दुरुस्त्या सुरू आहेत. जर युद्ध झाले तर आयएनएस विक्रांत गेम चेंजर ठरेल.
आयएनएस विक्रांत (IAC-1) ची महत्वपूर्ण माहिती
ऐतिहासिक पार्श्वभूमी
1961 मध्ये भारताने ब्रिटीश-निर्मित ‘INS Vikrant’ खरेदी केली होती, जी 1971 च्या युद्धात पाकिस्तानविरुद्ध वापरली गेली. आता त्याच नावाने सजलेली ‘नवीन विक्रांत’ भारतीय नौसेनेला अधिक आधुनिक ताकद देते. ही युद्धनौका आत्मनिर्भर भारत अभियानाचा एक महत्त्वाचा भाग आहे. भारत हे विमानवाहू युद्धनौका बनवणाऱ्या निवडक देशांपैकी एक बनले आहे. यामुळे भारतीय नौदलाची हिंद महासागर व प्रदेशातील ताकद वाढली आहे.
पाकिस्तानकडून हल्ले अन् भारताकडून चोख प्रत्युत्तर; आत्तापर्यंत ‘या’ महत्त्वपूर्ण घडल्या घडामोडी…